Tuesday, September 9, 2008

Engineering Entrance Examinations

Engineering Entrance Examinations
इंजीनियरिंगच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणारयांना त्या- त्या वर्षीच्या परीक्षांसाठी एप्रिल महिन्यापासून अगदी सज्ज व्हावं लागतं .

पहिला मान असतो आयआयटी-जेईई चा आयआयटी मुंबई,दिल्ली ,गुवहाटी,कानपूर,खरगपुर, मद्रास,रुड़की,या सात जुन्या आणि यंदापासून म्हणजे २००८ पासून सुरु झालेल्या आयआयटी राजस्थान ,हैद्राबाद,पंजाब,गांधीनगर ,भुवनेश्वर,पटना या सहा नव्या अशा तेरा आयआयटीज् ,इंस्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलोजी,वाराणसी (आईटी- बीएचयू -IT-BHU) ,इंडियन स्कूल ऑफ़ माईन्स यूनिवर्सिटी ,धनबाद (ISMU) या संस्थांमध्ये इंजीनियरिंगच्या प्रवेशासाठीची ही परीक्षा एप्रिल महिन्याच्या दुसऱया रविवारी होते.जगातली सर्वात कठीण परीक्षा असा तिचा लौकिक आहे ।पूर्वी स्क्रीनिंग टेस्ट आणि मेन एक्झाम अशी दोन पातळयांवर ही परीक्षा होत असे.२००७ पासून ती एकाच पातळीवर घेतली जावू लागली .२००७ २००८ च्या आयआयटी-जेईई मध्ये पेपर-१ आणि पेपर-२ असे दोन स्वतंत्र पेपर होते. ओब्जेक्टिव्ह टाइपच्या या दोन्हीं पेपरांमध्ये प्रत्येकी Physics,Chemistry , Mathematics या तिन्ही विषयांचे विभाग होते।२००७ च्या परीक्षेत या तिन्ही विषयांना १६२ गुण होते आणि दोन्ही पेपर प्रत्येकी २४३ गुणांचे होते, तर २००८ मध्ये झालेल्या परीक्षेत या तिन्ही विषयांना प्रत्येकी १६३ गुण होते . पेपर- १ हा २४६ गुणांचा अन् पेपर-२ हा २४३ गुणांचा असे एकूण ४८९ गुण या परीक्षेसाठी होते .
आयआयटी-जेईई उत्तीर्ण करण्यासाठी तिन्हीच्या तिन्ही विषयांत कट ऑफ़-मार्क्स ही आणि aggregate cut -off marks ही प्राप्त करणे आवश्यक आहे .जरी aggregate कट ऑफ़ मार्क्स प्राप्त केले पण एखाद्या सुद्धा विषयात कट-ऑफ़ मार्क्स पेक्षा कमी गुण प्राप्त केले तर तो विद्यार्थी अनुत्तीर्ण ठरतो ।आयआयटी-जेईई - २००६ साठी १५४ आणि २००७ साठी २०६ हे aggregate कट ऑफ़ मार्क्स होते.तर २००८ मध्ये कॉमन मेरीट लिस्ट साठी १७२ हे aggregate कट ऑफ़ मार्क्स होतेअसे असले तरी आयआयटी मध्ये यंदा प्रवेश मिळालेल्या शेवटच्या उमेदवाराला १८० मार्क्स आहेत।
आयआयटी -जेईई २००६ मधले मॅथेमॅटिक्स ,फिजिक्स, केमिस्ट्री यांचे विषयवार कट-ऑफ़ मार्क्स अनुक्रमे ३७, ४८ व ५५ होते;तेच २००७ मध्ये १,४ आणि ३ होते ;तर २००८ मध्ये ५ , ० (होय! शून्य! )आणि ३ आहेत। माझ्यामते हा ' वाढत्या संख्येने जे ई ई देणारे विद्यार्थी ' असल्याचा परिणाम आहे।
अवघ्या चार वर्षांपूर्वी म्हणजे २००४ साली एकूण१,६८,९६७ विद्यार्थ्यांनी आयआयटी-जेईई स्क्रीनिंग टेस्ट दिली होती.त्यात उत्तीर्ण झालेल्या १९,१४८ विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षा दिली,त्यातले ४५३१ विद्यार्थी अंतत: जेईई उत्तीर्ण झाले.तोच आकडा वाढून २००७ मध्ये २,४३,०२९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली,त्यांपैकी ७१२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि २००८ मध्ये एकूण ३,११,२५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली,त्यांपैकी ७९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले । दरवर्षी विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढतेच आहे . तेही गेल्या वर्षी पासून नव्या नियम नुसार विद्यार्थ्याला आयआयटी-जेईई केवळ दोन वेळाच देता येते-बारावीची परीक्षा देतो त्या वर्षी आणि त्याच्या पुढल्या वर्षी .
दरवर्षी आयआयटी-जेईई देणारयांच्या संख्येत खूप वाढ होत असली तरी त्या प्रमाणात आयआयटी मधल्या जागा वाढलेल्या नाहीत .तसे बघितले तर यंदा सहा नव्या आयआयटींमध्ये प्रत्येकी १२० जागा मिळून एकूण ७२० जागांची भर पडली .परंतु वर उल्लेख केलेल्या सर्व संस्थांमध्ये मिळून एकूण ६९९२ जागा आहेत.त्यापैकी जनरल कॅटेगरी साठी केवळ ४६६२ जागा आहेत.त्या खचितच पुरेश्या नाहीत ।आरक्षित जागांसाठी यंदाचे मॅथेमॅटिक्स ,फिजिक्स, केमिस्ट्री साठीचे कट-ऑफ़ आहे OBC साठी ४.५,० व २.७ अनुक्रमे तर तेच SC व ST कॅटेगरी साठी अनुक्रमे ३,व १.८ असे कट-ऑफ़ आहे आणि aggregate कट-ऑफ़ मार्क्स आहेत १०४.आरक्षित सर्व जागा न भरल्यामुळे aggregate कट-ऑफ़ मार्क्स आणखी कमी (५७)करण्यात आले आहे .हा मात्र धडधडीतपणे बुद्धिमत्तेचा घोर अपमान आहे। देशातल्या या अत्त्युच्य शिक्षण संस्थांमध्ये योग्य उमेदवारांअभावी रिकाम्या राहिलेल्या आरक्षित जागा खुल्या वर्गातल्या उमेदवारांसाठी खुल्या करण्यात याव्यात.अन्यथा प्रवेशाअभावी व्यथित झालेली बुद्धिमान तरुणाई परदेशांत जाऊन दैदीप्यमान यश मिळवेल. बुद्धिमान तरुणाई देशात नसल्यावर त्या देशाचे भवितव्य काय राहील?

All IndiaEngineering Entrance Examination (AIEEE) ही आयआयटी-जेईई नंतरची दुसरी अत्यंत महत्वाची अशी स्पर्धापरीक्षा । प्रामुख्याने २० नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलोजी (NITs), IIIT हैदराबाद ,IIIT अलाहाबाद, IITM,ग्वालियर तसेच इतर संस्था -या ठिकाणी प्रवेश मिळवण्यासाठीची ही परीक्षा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या रविवारी होते। विद्यार्थ्यांनी या एका परीक्षेवर लक्ष केंद्रित करावं आणि निर्धास्त व्हावं एवढा तिचा आवाका आहे। २००२ सालीं पहिल्यांदा ती घेतल्या गेली.२००६ सालीं घेतल्या गेलेल्या पाचव्या AIEEE ला ५,२३,८११ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते,२००७ सालीं झालेल्या सहाव्या AIEEE ला ६,४१,२७६ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते, त्यापैकी ५,९९,०९६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.यंदाच्या-म्हणजे २००८ सालीं झालेल्या सातव्या AIEEE ला ८,६२,८४० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते,म्हणजे बघा,दरवर्षी विद्यार्थ्यांचा आकडा वाढतोच आहे,स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे.ही परीक्षा विद्यार्थ्याला तीन वेळा देता येते- बारावीची परीक्षा देतो त्या वर्षी आणि त्याच्या नंतर च्या दोन वर्षी .आतापावेतो विद्यार्थ्याला त्याच्या स्टेट रँक वर प्रवेश मिळत असे.प्रत्येक NIT मध्ये प्रत्येक राज्यासाठी ठराविक जागा असत.परंतु त्यामुळे आन्ध्र प्रदेश, उत्तर प्रदेश ,दिल्ली या राज्यांमध्ये AIEEE साठी खूप स्पर्धा ,जागा कमी असल्यामुळे All India Rank(AIR) चांगला असूनही इथून परीक्षा देणारया अनेकांना प्रवेश मिळत नसे. स्पर्धा नसलेल्या राज्यांतून परीक्षा देणारया अनेकांना चांगला AIR नसूनही प्रवेश मिळत असे .यंदापासून ही प्रवेशाची पद्धत बदलली. ज्या राज्यातून विद्यार्थी बारावीची परीक्षा देतोय, त्या राज्यातल्या NIT मध्ये त्याचा स्टेट rank तर इतर NITs मध्ये प्रवेशासाठी All India rank लागू झाला.विद्यार्थ्यांच्या निकालात त्यांचा स्टेट व All Inia rank आणि दोन्हीचे कट-ऑफ मार्क्स दिलेले असतात .२००७ च्या AIEEE चा Physics-Chemistry-Mathematics या तिन्ही विषयांचा पेपर-१ हा ३६० गुणांचा होता व All India कट-ऑफ मार्क्स होते १२४.यंदाचा २००८ चा पेपर-१ हा ३१५ गुणांचा होता आणि कट-ऑफ मार्क्स होते १०९.

त्यानंतर महत्वाची स्पर्धापरीक्षा आहे BITSAT .खाजगी क्षेत्रताल्या बिर्ला इंस्टिट्यूटऑफ़ टेक्नोलॉजी एंड सायन्स,पिलानी -अर्थात बिट्स-पिलानी (राजस्थान) या अग्रणीय कॉलेज मध्ये प्रवेश मिळावायाचा असेल तर ही ऑनलाइन -कंप्यूटर बेस्ड -परीक्षा द्यावी लागते. Physics-Chemistry-Mathematics यांच्याबरोबराच English proficiency व logical reasoning चीही हयात टेस्ट घेतली जाते.
२००५ मध्ये ४८,००० ,२००६ मध्ये ५३,०००,२००७ मध्ये ६८,००० विद्यार्थ्यांनी BITSAT दिली होती.यंदा लाखभर तरी मुले-मुली ह्या परीक्षेला बसली होती.यंदा बिट्स-पिलानी चे कट-ऑफ होते इंजीनियरिंग साठी २६४,तर बी.फार्म एम्एससी. बायोलोजिकल सायन्सेस साठी २३०. बिट्स चे पिलानी,गोवा,हैदराबाद असे तीन कैम्पस आहेत.
या तीन स्पर्धापरीक्षा आणि ज्या राज्यातून विद्यार्थी बारावीची परीक्षा देतोय,त्या राज्याची इंजीनियरिंग ची प्रवेश परीक्षा-म्हणजे महाराष्ट्र च्या बाबतीत MHT-CET इतक्या परीक्षा दिल्या तरी पुरे आहे.
आजच्या घडीला महत्वाच्या विद्यापीठातून बी.ए. ला प्रवेश मिलावान्यपेक्षा भूछत्र्याप्रमाणे उगवलेल्या इंजीनियरिंग कॉलेज मधून बी.इ. करणे खूप सोपे झाले आहे.परन्तु तुम्ही कुठून इंजीनियरिंग करता,हे सुद्धा खूप महत्वाचे आहे. तेव्हा मंडळी,उठा,अभ्यासाला लागा! आपल्या माजी राष्ट्रपतींनीच म्हटल आहे- SMALL AIM IS A BIG CRIME.तेव्हा छान अभ्यास करा आणि यशस्वी व्हा!
रश्मी घटवाई

गणपती बाप्पा झाला ग्लोबल

.आजच्या जगातिकीकरणाच्या काळात गणपती बाप्पा सुद्धा ग्लोबल झाला आहे.भारतातच नव्हे, तर भारताबाहेर सुद्धा गणेशोत्सव साजरा होतो आहे।
नुकतेच काही विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेले. त्यांनी तिथेही आपली परंपरा सोडली नाही .वर्जिनिया राज्यात तसे तर हे मूठभरच भारतीय विद्यार्थी ,यूनिवर्सिटी ऑफ़ वर्जिनिया मध्ये MS/PhD करणारे . जवळ भारतीय स्टोर नाही.मग जे काही उपलब्ध आहे,त्यात त्यांनी जोरदार सण साजरा केला. कुणीतरी decicated coconut- म्हणजे आपला खोबरयाचा कीस हो-आणला .त्यात साखर खालून चक्क मोदकांचा आकारदिला अन झाला प्रसाद तयार । अगदी एरिजोना स्टेट यूनिवर्सिटी मधल्या मराठी विद्यार्थ्यांनी सुद्धा छान गणेश पूजा केली.बे एरियात तर भरपूर मराठी लोक आहेत.त्यांनी अगदी साग्रसंगीत गणेश पूजा केली थेट अमेरिकेत .गणपतीबाप्पाचे रूप लहान -थोर सर्वांनाच भावणारे.गणपती बाप्पा ही आपल्या भक्तांची आर्त साद ऐकून मग त्यांच्यासाठी विश्व संचार करतो आहे ,हयात नवल ते काय?
रश्मी घटवाई