किमयागार
-रश्मी घटवाई
आपल्याला ज्ञानेश्वरी वाचता येणे हा माझ्यामते आपण मराठी असण्याचा सर्वोच्च मानबिंदू आहे आणि भगवद्गीता वाचता येणे हा माझ्यामते आपण भारतीय असण्याचा सर्वोच्च मानबिंदू आहे.
भगवद्गीता केवळ भारतीयांनाच भावते असे नाही,तर तिनं भारतीयेतरांनासुद्धा तेवढाच लळा लावला आहे.भगवद्गीता आधार असलेलं विदेशी लेखकांचं लेखन व काव्य साहजिकच उत्तुंग आणि रसपूर्ण झालं आणि त्या साहित्यानं जनमानसाचा ठाव घेतला.
रुडयार्ड किपलिंग ह्या भारतात ब्रिटीश सत्ता असतानाच्या काळात मुंबईत जन्मलेल्या ब्रिटीश लेखक-कवीची "इफ" ही अतिशय प्रसिद्ध कविता आहे. ती त्यानं १९०९ साली आपल्या मुलाला उद्देशून लिहिली होती,तरी ती आज एकशे पाच वर्षांनंतरही तितकीच प्रेरणादायी आहे.इफ मध्ये मला भगवद्गीता दिसते.(भगवद्गीतेतल्यासारखा)कवि तेतला उपदेश असल्यामुळे "यू विल बी अ गॉड ,माय मॅन" असं थट्टेनं विन्स्टन चर्चिल रुडयार्ड किपलिंगला म्हणाले होते.If you can meet with Triumph and Disaster And treat those two impostors just the same ह्या कवितेतल्या ओळी विम्बल्डन मध्ये टेनिस कोर्टवर पण लागलेल्या आहेत. इफ ह्या कवितेच्या प्रेमात पडावं! कविता अशी-
If—
If you can keep your head when all about you
Are losing theirs and blaming it on you,
If you can trust yourself when all men doubt you,
But make allowance for their doubting too;
If you can wait and not be tired by waiting,
Or being lied about, don’t deal in lies,
Or being hated, don’t give way to hating,
And yet don’t look too good, nor talk too wise:
If you can dream—and not make dreams your master;
If you can think—and not make thoughts your aim;
If you can meet with Triumph and Disaster
And treat those two impostors just the same;
If you can bear to hear the truth you’ve spoken
Twisted by knaves to make a trap for fools,
Or watch the things you gave your life to, broken,
And stoop and build ’em up with worn-out tools:
If you can make one heap of all your winnings
And risk it on one turn of pitch-and-toss,
And lose, and start again at your beginnings
And never breathe a word about your loss;
If you can force your heart and nerve and sinew
To serve your turn long after they are gone,
And so hold on when there is nothing in you
Except the Will which says to them: ‘Hold on!’
If you can talk with crowds and keep your virtue,
Or walk with Kings—nor lose the common touch,
If neither foes nor loving friends can hurt you,
If all men count with you, but none too much;
If you can fill the unforgiving minute
With sixty seconds’ worth of distance run,
Yours is the Earth and everything that’s in it,
And—which is more—you’ll be a Man, my son!
(Source: A Choice of Kipling's Verse (1943))
रुडयार्ड किपलिंग,सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ...जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ...असं कवितेतून आपल्या मुलाला म्हणाला असला,तरी भगवद्गीता जशी भगवंतानी जरी अर्जुनाला उद्देशून सांगितली असली ,तरी ती एकट्या अर्जुनासाठी नसून सबंध मानव समुदायासाठी होती,तशीच 'इफ' सगळ्यांनाच उद्देशून आहे.इतक्या वर्षांनंतरसुद्धा ती तेवढीच टवटवीत वाटण्याचं कारण म्हणजे तिचा मूलाधार भगवद्गीता आहे.मूलाधार भगवद्गीता असलेली Paolo Coelho पाओलो कोएल्हो ह्या प्रसिद्ध लेखकाची गीता ह्या शीर्षकाची कवितासुद्धा प्रसिद्ध आहे. त्याहीपेक्षा अधिक लोकप्रिय आहे त्यांनी लिहिलेली "द अॅलकेमिस्ट"(The Alchemist )ही सुप्रसिद्ध कादंबरी. तिचाही मूलाधार भगवद्गीता असल्याचा प्रत्यय वाचकाला शब्दागणिक येतो.अॅलकेमी म्हणजे काय,तर कुठल्याही धातूला सोन्यात रुपांतरीत करण्याची किमया अन अशी लोखंडाचेही सोने करण्याची किमया साधणारा तो किमयागार !अॅलकेमिस्ट!
एखाद्यानं उरस्फोड करून एखाद्या ध्येयाचा पिच्छा पुरवावा,आपल्याला वारंवार पडणाऱ्या स्वप्नाचा गूढ अर्थ शोधत वणवण फिरावं,वाटेत अनंत अडथळे यावेत,ते पार केल्यावर यशाचं फुलपाखरू अलगद आपल्या हातावर बसलंय असं वाटत असतानाच त्यानं सुळकन निसटावं, हवेतल्या हवेत गिरकी घेत सांगावंं -ज्याचा शोध घेत तू वणवण फिरतो आहेस,ते तर तुझ्याच जवळ आहे.तुझे आहे तुजपासी,परी तू जागा चुकलासी! "तैसी हे जाण माया ,तू भ्रमत आहासी वायां !"
ही कथा आहे स्पेनमधल्या अॅन्डेल्युसिया या प्रांतातल्या सँटियागो या तरुण मेंढपाळाची . त्याला वेडंच मुळी स्वच्छंद भटकंतीचं!तो धर्मगुरूच व्हायचा ,पण स्वच्छंद भटकंतीची आपली इच्छा त्यानं गरीब शेतकरी असलेल्या आपल्या वडिलांना सांगितली,तेव्हा आपल्याप्रमाणे निखळ भटकंतीची त्याची इच्छा अपुरी राहू नये ,म्हणून आपल्याजवळच्या तीन प्राचीन सुवर्णमुद्रा त्याला देत वडिलांनी त्याला सांगितलं ,दूरवरच्या डोंगरदऱ्या,कुरणं ,माळरानं पालथी घालशील,तरी आपली ही कुरणं,माळरानंच अखेरीस सर्वोत्कृष्ट असल्याचं तुला जाणवेल !केवढं गहन तत्वज्ञान !जे नाही,त्याचा हव्यास धरून लोक त्याच्या शोधार्थ फिरतात ,वर्तमानातल्या सुखालाही मुकतात आणि नंतर जे हाती लागतं ,तेव्हा हळहळतात ,की आधी जे होतं ,तेच किती चांगलं होतं !
वारंवार पडणाऱ्या स्वप्नाचा गूढार्थ जाणून घेण्यासाठी सँटियागो स्वप्नांचे गूढार्थ सांगणाऱ्या एका स्त्री कडे जातो . "माझ्या स्वप्नात एक लहान मुलगी माझ्या मेंढ्यांशी थोडा वेळ खेळून झाल्यावर माझे दोन्ही हात हाती घेते आणि पुढच्याच क्षणी मला इजिप्शियन पिरामिड्स जवळ आणून म्हणते,की तू जर इथे आलास तर तुला गुप्तधन मिळेल . ती ते गुप्तधन असलेली जागा मला दाखवणार तोच माझी दरवेळी झोपमोड होते . " सँटियागो तिला सांगतो .पुढे त्याला एक वृद्ध भेटतो. आपण सालेमचा राजा मेल्चीझेडेक (Melchizedek )आहोत असे सांगत तो वृद्ध त्याला म्हणतो, तुझ्याजवळ असलेल्या मेंढ्यांपैकी एकदशांश मेंढ्या मला दे,मग मी तुला ते गुप्तधन कसं मिळवायचं ते सांगतो .सालेमचा राजा जवळ पडलेल्या काटकीनं वाळूत सँटियागोच्या आई वडिलांचं ,शाळेचं आणि वर सँटियागोच्या मनात घर करून बसलेल्या मुलीचं नाव लिहितो,तेव्हा त्या मनकवड्या वृद्धाबद्दल सँटियागोच्या मनात आदरमिश्रित कुतूहल निर्माण होतं.ह्या राजाला आपल्या मेंढ्या हव्यात कशाला हे त्याला उमगत नाही .
"तुम्ही कुणीही असा,काहीही करीत असा, तुम्हाला एखादी गोष्ट व्हायला हवी असं तीव्रपणे वाटत असतं ,त्याला कारण म्हणजे ती इच्छा विश्वाच्या आत्म्यात ,गाभ्यात उमटलेली असते.पृथ्वीवरचं तुमचं अस्तित्वच मुळी त्या ध्येयपूर्तीसाठी असतं."तो सालेमचा वृद्ध राजा सँटियागोला सांगतो ,
"And when you want something,all the universe conspires in helping you to achieve it."("अगर किसी चीज को दिल से चाहो ,तो सारी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है ।" ह्या डायलॉगचा उगम हा आहे!)"All things are one...I always appear in one form or another.Sometimes I appear in the form of a solution or a good idea.At other times at a crucial moment,I make it easier for things to happen.There are other things,I do too,but most of the times,people don't realize,I have done them.
मीच ह्या विश्वाचं मूळ कारण ,सुतापासून बनलेल्या मण्यांची,सुतापासून बनलेल्या धाग्यात ओवलेली माळ जशी एकाच मूळ घटकाची असते,तसं !'मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव।' तुमच्या मनात इच्छा निर्माण करणारा मी ,ती इच्छा स्वयमेव मी, इच्छापूर्तीसाठी तुमच्याकडून धडपड करवणारा मी , ती धडपड स्वयमेव मी,कर्ता,कर्म मी आणि शेवटी त्या धडपडीची, कर्माची फलश्रुतीही मी !पण अज्ञ, अहंकारी मनुष्य विचार करतो,हे सर्व मीच केले !अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते।। म्हणूनच, 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽत्स्वकर्मणि।।तुला केवळ कर्म करण्याचाच अधिकार आहे,त्याच्या फळाचा नाही. तू केलेल्या कर्माच्या फळाची इच्छासुद्धा ठेवू नकोस,तू सर्व कर्मे माझ्यासाठी करतो आहे,असे समजून मला अर्पण कर,सर्व कर्मफलांचा त्याग करून सर्व कर्मफल मलाच अर्पण कर. माझ्याच ठायी मन गुंतव,म्हणजे तू मोक्ष प्राप्त करशील.मलाच येऊन मिळशील !मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु। मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायण:।।
मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय।निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशय:।।"भगवद्गीतेत भगवंतानं सांगितलंय. भगवद्गीतेतलंच तत् वज्ञान लेखकानं आपल्या कथानकातून ,त्यांतल्या पात्रांच्या संवादातून सोप्या शब्दांत वाचकांना सांगितलंय .
All things are one याचा प्रत्यय सँटियागोला ठायीठायी येत राहतो.अनेक संकटं पार करत अखेरीस सँटियागो पौर्णिमेच्या धवलशुभ्र चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेल्या इजिप्तच्या पिरामि ड्सच्या पुढ्यात राहून त्यांची भव्यता अनुभवतो,तेव्हा आनंदातिशयानी त्याच्या डोळ्यांतून आसवे ओघळू लागतात .त्याची स्वप्नपूर्ती होते अथवा नाही,झाल्यास कशी होते ,हे सगळे मुळातून वाचायला हवे. कारण सँटियागोच्या माध्यमातून आपल्यालाही परिसस्पर्श घडवण्याची किमया "द अॅलकेमिस्ट" नं, किमयागारानं साधली आहे.
------------------------------ -------------------
रश्मी घटवाई
०९८७१२४९०४७