Tuesday, June 5, 2012

"प्रॉब्लेम ऑफ प्लेन्टी" : आपण आणि पर्यावरण - रश्मी घटवाई

"प्रॉब्लेम ऑफ  प्लेन्टी" : आपण  आणि  पर्यावरण 
                                                                                - रश्मी घटवाई 
                                                                                      
५ जून रोजी दर वर्षी विश्व पर्यावरण दिवस साजरा केला जातो;वस्तुत:प्रत्येक दिवस हा पर्यावरण दिवस मानून आपण प्रत्येकानं अगदी आपल्यापुरती आणि आपल्या कुटुंबीयांपुरती म्हणजे आपापल्या पातळीवर जरी पर्यावरणाची काळजी घेतली,तरी खूप काही साध्य होण्यासारखे आहे.सुदैवाने आता समाजात पर्यावरण रक्षणाविषयी जागरुकता बऱ्यापैकी वाढीला लागलेली आहे.
                                                                    
१९७२ सालीं,५ जून ते  १६ जून या दरम्यान स्वीडनची राजधानी स्टॉकहोम(stockholm )इथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत ११३ (113 )देशांनी पर्यावरणाच्या संरक्षणार्थ, संवर्धनार्थ २६ principles -सव्वीस सूत्रांचा पुरस्कार केला.दर वर्षी ५ जून रोजी विश्व पर्यावरण दिवस साजरा करण्याचा निर्णयही याच बैठकीत झाला. वस्तुत:प्रत्येक दिवस हा पर्यावरण दिवस आहे.

आपले सगळे दैनंदिन व्यवहार पर्यावरणाला अनुकूल किंवा प्रतिकूल आकार देत असतात.किंबहुना आपल्या अस्तित्वाचा प्रत्येक भाग हा पर्यावरणाला समर्पित आहे,म्हटलं तर वावगं ठरू नये.असं असताना आपण जाणीवपूर्वक पर्यावरण रक्षणाविषयी किती विचार करतो,हा चिंतनाचा विषय आहे.मुळात पर्यावरणशास्त्राची व्याप्ती बघा केवढी मोठी आहे.अगदी भौतिकशास्त्र,जीवशास्त्र,रसायनशास्त्र, भूगोल, खगोलशास्त्र,एवढंच काय, कला,वाणिज्य अशा सगळ्या शाखा,सगळे सजीव आणि निर्जीव घटक पर्यावरणाच्या छत्राखाली येतात. मात्र पोल्युशन,कार्बन फूटप्रिंट्स,ग्लोबल वार्मिंग,ग्रीन हाउस gas एमिशन्स वगैरे भलेथोरले शब्द ऐकूनच बावचळून जाऊन अनेक व्यक्ती पर्यावरण हा आपला प्रांत नव्हे,असा समज करून घेतात.त्या शब्दांच्या पसाऱ्यात भांबावून नं जाता  आपली जीवनशैली पर्यावरणाला पूरक आहे की मारक आहे,एवढं चिंतन जरी प्रत्येकानं केलं नी ती  काही अंशी सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रत्येकानं केला तरी पुष्कळ काही साध्य होईल.

"ही पृथ्वी,ही जमीन,ही हवा,हे पाणी,हे आपल्या पूर्वजांनी आपल्याला वारसा म्हणून दिलेले नाही;तर आपल्याला आपल्या पुढच्या पिढीकडून मिळालेले ते ऋण आहे;त्यामुळे आपल्याला ज्या स्थितीत हे सारं मिळालं; किमान त्या स्थितीत ते पुढच्या पिढीच्या सुपूर्द करायचं आहे."गांधीजींच्या या वचनाची जाणीवही आपल्याला सतत व्हायला हवी."The earth does not belong to man;man belongs to the earth;"असं अमेरिकेतल्या सिएटलच्या रेड इंडियन आदिवासी जमातीच्या प्रमुखानं  अमेरिकेच्या राष्ट्रप्रमुखाला सन1800 च्या सुमारास लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.अमेरिकेच्या राष्ट्रप्रमुखानं त्यांची जमीन विकत घेण्याबद्दल त्याला पत्र लिहिलं होतं,त्याला उत्तर देताना त्यानं पुढे म्हटलं होतं,"कुणी आकाश किंवा जमीन कसं काय खरेदी करू शकतं किंवा विकू शकतं? ही पृथ्वी आमची माता आहे.तिच्यावर काही आपत्ती येणं म्हणजेच तिच्या मुलांवरही आपत्ती येणं! या नद्या आम्हाला बंधुतुल्य आहेत..."दोनशे वर्षांपूर्वीचं त्याचं ते सबंध विवेचन आजही तितकंच यथार्थ आहे.  त्याला तेव्हा जे कळलं,ते आज इतकी प्रगती होऊनही मनुष्याला उमगत नाहीये,ही खरी शोकांतिका आहे.
वायूप्रदूषण,पाण्याचे प्रदूषण,ध्वनी प्रदूषण,यांबरोबरच आजच्या घडीला पर्यावरण ऱ्हासासाठी "प्रॉब्लेम ऑफ  प्लेन्टी " सुद्धा तितकाच जबाबदार आहे.कसा तो बघा;आपल्या घरात दोन मुले असतात नी वीस मुलांना पुरतील, एवढे कपडे असतात.आज जवळ जवळ प्रत्येक मध्यमवर्गीय घरात,कपाटात मावणार नाहीत,एवढ्या साड्या असतात. प्रत्येक कार्य-प्रसंगाच्या वेळी ठेवायला जागा पुरत नसते,तरीही भेटवस्तू,साड्या ह्यांचे ढीग अहेर म्हणून येतात आणि कहर म्हणजे कुठल्या लग्नाला वगैरे जायचं असेल,तेव्हा तिथे घालण्यासाठी साजेशी साडीच आपल्याजवळ नसल्याचा साक्षात्कार बहुतेक वेळा बहुतेकींना होतो.कुणे एके काळी दोन घरातले नी दोन बाहेरचे आणि काहीच ठेवणीतले कपडे असायचे.लहान भावंडे मोठ्या भावंडांची दप्तरे,शालेय पुस्तके आणि इतर सामग्री वापरत.(अर्थात हा सगळा जमाना आमच्या आधीच्या पिढीचा होता.)पूर्वी दिवाळी वर्षातून एकदा यायची,आज वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस दिवाळी असते.कुठल्या वस्तूची गरज इतकीशी असली तरी -अन गरज नसली,तरीही ती कृत्रिमरीत्या निर्माण करून,ती पुरवायला हजार पर्याय उपलब्ध आहेत,वस्तू इवलीशी असली तरी तिचे वेष्टन भले थोरले...बहुतांश वेळा एखाद्या वस्तूचा पुरेसा वापर करून व्हायच्या आत ती टाकून देऊन तीच वस्तू नव्यानं  आणली जाते.लग्नाबिग्नांच्या पार्ट्यांत किंवा इतर पार्ट्यांत वाया जाणारे अन्न बघून, ह्या देशात दारिद्र्यरेषेखाली  असणारे किंवा ज्यांना दोन वेळचे अन्न मिळत नाही असेही लोक आहेत,ह्यावर विश्वास बसणार नाही.ह्यांतली कुठलीही गोष्ट आकाशातून तर टपकलेली नाही.ती निर्माण करायला साधनसामुग्री,मनुष्यबळ,उर्जा सगळं लागलेलं असताना तिचा पुरेसा वापर नं करताच जर ती टाकून दिली तर त्यासाठी लागलेला पैसा, सामुग्री, मनुष्यबळ,उर्जा तर वाया जातंच,पण त्याच नव्या वस्तूच्या निर्मितीसाठी -मागणी अधिक म्हणून  पुरवठा पण अधिक होऊन पर्यावरणावर अतिरिक्त ताण येतो.त्याची किंमत नंतर आपल्याला वा आपल्या नंतरच्या पिढ्यांना वेगळ्या प्रकारानं चुकती करावी लागेल,हे आपल्या मनातही येत नाही." 'Earth provides enough to satisfy every man's needs, but not every man's greed." असं गांधीजींनी अगदी समर्पक शब्दांत सांगितलं होतं. 

"अहिंसा,सत्य,अस्तेय,ब्रम्ह्चर्य,अपरिग्रह"या यम-नियमाला विसरून,पाश्चात्य जीवनशैलीला आपलेसे करून आपण आता कसे एकदम मॉडर्न झालो म्हणून स्वत:वरच खूष होतो आहोत.त्यांची 'यूज अ‍ॅन्ड थ्रो '-वापरा आणि फेका संस्कृती आपण चटकन आत्मसात केली.गेल्यावर्षी अमेरिकेतल्या आमच्या महिनाभरातल्या वास्तव्यात ठायी-ठायी त्यांचा ओव्हर कन्झ्युमेरीझम,पेपर प्लेट्स नी ग्लासेस,पेपर napkins यांचा नको इतका वापर प्रत्ययाला येत होता.(मात्र इतका कचरा निर्माण करूनही तो सगळा व्यवस्थित dustbims ,कचरा कुंडीत टाकलेला.इवला कागदाचा कपटा देखील अन्यत्र पडलेला नाही,मुलखाच्या स्वच्छतेबद्दल,नियम नं तोडण्याबद्दल    तर त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं!तेवढं आपण बरं नाही आचरणात आणलं!आपल्याकडे लोकांच्या सवयी ही घाणेरडया! आपल्या कुठल्याही शहरात,होय,इथे दिल्लीत तर खूपच- कित्येक असंस्कृत लोक भरधाव वेगानं, बेगुमानपणे गाड़ी चालवतानासुद्धा,मध्येच दार उघडून पचकन रस्त्यांवर थुंकताना दिसतात.बसच्या खिडकीतून डोके बाहेर काढून राजरोसपणे थुंकणारेही आहेत.कचरा कुठेही फेकावा हा अनेकांचा जणू जन्मसिद्ध हक्क असे ते वागतात. असो!) म्हणजे आधी तो भला थोरला कचरा-पक्षी पेपर प्लेट्स नी ग्लासेस,पेपर napkins वगैरे वस्तू-  निर्माण करायचा.त्यासाठी साधन सामुग्री,उर्जा वगैरे खर्ची घालायचं,लोकांनी त्या वस्तू पैसे खर्च करून विकत घ्यायच्या नी वापरून लगेच फेकून तो कचरा निर्माण करायचा आणि मग त्या कचऱ्याचं निर्मूलन करण्यासाठी, विल्हेवाट लावण्यासाठी करण्यासाठी पुन्हा साधन सामुग्री,उर्जा वगैरे खर्ची घालायचं.(आणि सशक्त अर्थव्यवस्थेच्या फुशारक्या मारायच्या!अमेरिकेत ट्वीन टॉवर वरच्या हल्ल्यानंतर लोक भीतीपोटी बाहेर पडेनासे झाले होते,वस्तू विकत घ्यायला,शॉपिंगसाठी  बाहेर पडत नव्हते,तेव्हा त्यांचे राष्ट्राध्यक्ष त्यांना मनात भीती 
बाळगू नका,बाहेर पडा,बाजारहाट करा,नाहीतर आपली इकॉनॉमी-अर्थव्यवस्था  कशी चालेल असं सांगत होते.) 

भल्या थोरल्या लोकसंख्येची भली थोरली बाजारपेठ म्हणून,ओव्हर कन्झ्युमेरीझमसाठी आता आपल्याला भलेही उद्युक्त केलं जात असलं तरी अमेरिकेसारखा ओव्हर कन्झ्युमेरीझम आपल्याला मुळीच परवडण्यासारखा नाही.अमेरिकेसारख्या प्रगत देशांच्या तुलनेत आपला उर्जेचा प्रतिमाणशी वापर भलेही कमी असेल.पण जो आहे तो निरर्थक गोष्टींसाठी व्हायला नको.जरा विचार करून पहा,आपली काही वर्षांपूर्वीची जीवनशैली काय टाकावू होती?आता मला वाटतं,अगदी लहानलहान मुलं सुद्धा पाटी-पेन्सिल वापरत  नसतील.खरं तर एवढ्या लहान मुलांना वह्यांची गरजच काय?यूज अ‍ॅन्ड थ्रो हवं तर थर्माकोलच्या वा पेपर प्लेट्स ना मजबूत पत्रावळीचा पर्याय अधिक पर्यावरण-स्नेही  नाही का?बुद्ध हा तर आद्य पर्यावरणवादी म्हणायला हवा.त्यानं यूज अ‍ॅन्ड थ्रो ऐवजी यूज अ‍ॅन्ड री-यूज ही संकल्पना तेव्हा दिली,आपल्या शिष्यांनी अंगावरची वस्त्रे जीर्ण झाल्यावर,त्यांचा अनेकवार वापर करून झाल्यावर त्यांची वात करून दिव्यात वापरण्याबद्दल त्याने सांगितले होते.

थोडक्यात, अनेक बाबतींत तर हा "प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी" टाळणं सर्वस्वी आपल्या हातात आहे.अजूनही वेळ गेलेली  नाही.पर्यावरणाच्या ऱ्हासाचा प्रश्न अधिक उग्र होऊन मानवाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होण्यापेक्षा आपल्या अति-चंगळवादाला मुरड घालणं केव्हाही अधिक श्रेयस्कर  ठरणार  नाही का?

Thursday, May 17, 2012


तो आला...त्यानं पाहिलं...त्यानं जिंकलं.
                                     
                                                                             -रश्मी घटवाई 

चित्रपट समजायला भाषेचे अडसर नसतात,ते किती खरं आहे,हे अनेक अमराठी प्रेक्षकांनी  दिल्लीमध्ये २०११ सालच्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात,पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपटांना हजेरी लावून आणि त्या चित्रपटांचं रसास्वादन करून सिद्ध केलं.
दिल्लीमध्ये काही महिन्यांपूर्वी  २०११ सालचा राष्ट्रीय चित्रपट महोत्सव-National Film Festival झाला होता. भारत सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधीनस्थ  डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिवल्सनं  आयोजित केलेल्या या चित्रपट महोत्सवात  २०१० चे पुरस्कारप्राप्त चित्रपट दाखवण्यात आले होते.२०१० सालच्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणाही मे महिन्यात करण्यात आली होती.या महोत्सवात जे पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपट  दाखवण्यात आले,त्यातले दोन मराठी चित्रपट अमराठी व्यक्तींनी दिग्दर्शित केले होते आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे मराठी चित्रपटांना अमराठी प्रेक्षक बहुसंख्येनं उपस्थित होते. 

चित्रपट हा माझा प्रांत नाही.पण मराठी चित्रपट एरवी दिल्लीत बघायला मिळत नाहीत म्हणून मग मी तिथे गेले होते.राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवले जाणारे चित्रपटही हृदयाला भिडणाऱ्या आणि विचारमंथनाला प्रवृत्त करणाऱ्या विषयाभोवती केंद्रित असल्यामुळे तिथल्या सुजाण,दर्दी प्रेक्षकांनी चित्रपट संपताच घरची वाट धरली नाही,तर उलट आपसात चर्चा केली,आपापल्या परीनं चित्रपटाची समीक्षा केली,"बाबू बॅंड बाजा " ह्या चित्रपटानंतर तर अनेक प्रेक्षकांनी आपापले अनुभव सांगत,त्यातल्या व्यक्तिरेखांमध्ये नी प्रसंगांमध्ये आपल्या जीवनातल्या व्यक्तींशी नी प्रसंगांशी साम्य शोधत,आवर्जून उपस्थित असलेल्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांशी जाहीर संवाद साधला.तो इतका हृद्य होता की त्याचं रसास्वादन दूरस्थ वाचकांना घडावं,म्हणून हा लेख प्रपंच.
  
जग्गू ह्या बॅंड पार्टीच्या मालकाला परिस्थितीपायी आपला बॅंड नी इतर वाद्ये गहाण टाकावी लागली आहेत,हाती हलगी धरावी लागली आहे.गावात  जन्म-मृत्यू घडल्यावर हलगी वाजवून कसाबसा आपला उदरनिर्वाह करण्यात त्याचं मन रमत नाहीये.त्याला आस लागलीय,ती आपली ती वाद्ये सोडवून पुन्हा एकदा  दमदार बॅंड पार्टी स्थापन करायची.तिचं नावही त्यानं ठरवून ठेवलंय- बाबू बॅंड बाजा ! बाबू ह्या आपल्या लेकानं शिक्षणाच्या मागे जाण्याऐवजी आपल्याबरोबर खुळखुळा वाजवावा नी चार पैसे मिळवायला लागावे असा त्याचा आग्रह आहे,तर त्याच्या बायकोला-शिरमीला- बाबूनं खूप शिकावं अशी तळमळ लागलीय.ती लेकाच्या शिक्षणासाठी यथाशक्ती तजवीज करण्यासाठी जिवाचं रान करतेय,पडतील ते कष्ट झेलतेय.जणू लेकाच्या रूपानं तिची अतृप्त राहिलेली शिकायची इच्छा ती पुरी करतेय.मात्र गरीब असले तरी ते लाचार नाहीयेत.गरीबीतही माणुसकी जपत,जे काही हाती आहे त्या बळावर नाकाच्या सरळ रेषेत चालत,इतरांच्या लेखी नगण्य असू शकेल इतकं अतिसामान्य आयुष्य ते सारे जगताहेत.त्या अतिसामान्य जीवनातला त्यांचा तो संघर्ष नी परिस्थितीशी जुळवून घेत केलेली वाटचाल मात्र मुळीच क्षुद्र नाहीये.मुळात जग्गूचं नी त्याच्या कुटुंबाचं विश्व ते केवढं !परीघ तो केवढा!पण संकटांची छोटी-छोटी वर्तूळं त्यांच्याभोवती सदोदित मोठं रिंगण धरतात. जग्गूच्या नी त्या सर्वांच्या आयुष्याच्या इवल्या-इवल्याश्या डोहांत अडचणींचे अनंत छोटे छोटे भोवरे कमालीची उलथापालथ घडवतात.पुढे जे जे घडत जातं,ते सारं बघताना प्रेक्षक कमालीचा सुन्न होतो.बॅंड किंवा हलगी वाजवणारा, त्याचं कुटुंब ह्या साऱ्या व्यक्तिरेखा तशा प्रातिनिधिक.त्यांच्या माध्यमातून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतल्या- कुठलंही अन्य छोटं-मोठं काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या अतिसामान्य व्यक्तीसमूहाच्या असामान्य जीवनसंघर्षाचं आणि भावविश्वाचं  अत्यंत हृदयस्पर्शी चित्रण 'बाबू बॅंड बाजा' या चित्रपटात घडलंय. बँड वाजवण्याचं काम पारंपारिकपणे ज्या समाजात केलं जातं,त्याचं जातीनिहाय चित्रण-एवढच काय-उल्लेख ही नं करता हा व्यक्तिनिहाय जीवनसंघर्ष चित्रपटाला आगळं-वेगळं परिमाण देतो,माणूस म्हणून त्या बँडवाल्याकडे बघण्याचं,त्याचं जीवन जवळून बघण्याचं परिप्रेक्ष्य (perspective )देतो.चित्रपटात घडणाऱ्या सगळ्या घटना इतक्या परिचयाच्या आणि अवतीभवती सहज घडणाऱ्या असतात,की त्या सगळ्याचा आपणही एक घटक होतो.चित्रपट आणि प्रेक्षक ह्या दोन वेगळ्या वेगळ्या entities च उरत नाहीत.तो  द्वैतभाव नष्ट होतो नी दोन्ही एकाकार होतात.   
 
चित्रपट संपल्यावर दिग्दर्शक आणि प्रेक्षक यांच्यांतल्या जाहीर संवादात भाग घेताना प्रेक्षकांतला एक युवक सांगू लागला- त्याचं आयुष्य मुंबईतल्या लोखंडवाला या उच्चभ्रूंच्या वस्तीत गेलं, तरीही बाबूच्या व्यक्तिरेखेत त्याला स्वत: तो कुठेतरी दिसला.एवढ्यातच तो दिल्लीतल्या मेडिकल कॉलेजमधून पदवीधर झाला,(हेसुद्धा त्यानं कमालीच्या विनयानं सांगितलं.)आपल्याजवळ असलेलं  हे backpack हे आयुष्यात पहिल्यांदाच नवंकोरं मिळालंय,तेही आत्ता मिळालेल्या स्टायपेंडच्या पैशातून विकत घेतलंय.अन्यथा आतापावेतो सगळ्या गोष्टी इतरांनी वापर्लेल्याच वापरलेल्या आहेत.त्यामुळे बाबूशी तो चटकन 'कनेक्ट'झाला असल्याचं त्यानं सांगितलं. इतर अनेक प्रेक्षकांचं  मनोगतसुद्धा भावपूर्ण होतं.चित्रपट समजायला भाषेची अडचण येत नाही असं एकजात साऱ्या अमराठी प्रेक्षकांनी सांगितलं.चित्रपट हा स्वत:च भाषा होतो! 

मुळात हे सगळं इतकं तरलपणे नी प्रभावीपणे मांडणारे दिग्दर्शक राजेश पिंजानी हे सिंधी आहेत.त्यातून 'बाबू बँड बाजा' हा त्यांचा पहिलाच चित्रपट.त्यांच्या चित्रपट पदार्पणाला राष्ट्रीय पुरस्कार(Best Debut Film) , सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- Best Actress आणि सर्वोत्कृष्ट बालकलाकार- Best Child Artist  असे तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळालेत.त्यांतून प्रेक्षकांशी संवाद साधताना त्यांच्यातला विनम्रपणा,सुसंस्कृतपणा दृगोचर होत होता-तो असा मारून मुटकून वा कृत्रिमपणे आणता येत नाही.शिवाय काय,की अवघ्या एकदोन वाक्यांच्या संभाषणावरून समोरची व्यक्ती अंतर्बाह्य कळते.त्याची प्रगल्भता,बहुश्रुतता,परिपक्वता,आचार-विचारांची खोली,जीवनातल्या मूल्यांकडे त्याचा बघण्याचा दृष्टीकोन सारं सारं त्याच्याही नकळत ठसठशीतपणे समोर येतं.जाहीर संवादानंतर मी त्यांच्याशी ऐसपैस संवाद साधला. 
"मी नागपूरजवळच्या कामठीचा.आता तीन वर्षांपूर्वी मी पुण्याला आलो असलो तरी माझं कुटुंब नागपूरलाच आहे. तीन भाऊ आणि चार बहिणी अशा सिंधी परिवारातला मी आहे.मी एवढ्यात मराठी शिकलो."राजेश पिंजानी सांगतात, "नागपूरला मी जरी लोकल टीव्ही साठी जाहिराती करत असलो,तरी चित्रपटाशी माझा दूरान्वयेही संबंध नव्हता.चित्रपटाशी संबंधित शिक्षण वा प्रशिक्षणही मी घेतलं नाहीये.किंबहुना 'स्टोरी टेलिंग' ही मी कधी केलेलं नाहीये.हा चित्रपट मी करीत असताना माझा स्वत:चाच ह्यावर विश्वास बसत नव्हता की आपण  चित्रपट करतोय!" ते गजानन महाराजांचे भक्त आहेत,त्यांच्या निर्मितीसंस्थेचं नाव जय गजानन productions  आहे.हा चित्रपट मराठीतच का करावासा वाटला,ह्यावर ते सांगतात,की हा चित्रपट केवळ मराठीतच होऊ शकेल, अन्य कुठल्याही भाषेत नाही,कारण त्या कथेचा परिवेश नी पार्श्वभूमी वैदर्भीय आहे, घटनांचे संदर्भ वैदर्भीय आहेत.ती कथा ह्या पद्धतीने केवळ मराठीतूनच सांगितली जाऊ शकते.

चित्रपटात वैदर्भीय ग्रामीण बोलीभाषा व्यक्तिरेखेचा भाग बनून आलीय.आणि एक! मराठी चित्रपटानं तमाशापटाचा मुखवटा उतरवला,जिभेवर विसावलेल्या केवळ ग्रामीण कोल्हापुरी बोलीभाषेला अंमळ उतरवून इतर बोलीभाषाही आत्मसात केल्या,म्हणू नये,पण हिणकस मानून महाराष्ट्रात जिची कायम खिल्ली उडवली जाते,ती वैदर्भीय ग्रामीण बोलीभाषाही ह्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या तीन मराठी चित्रपटांतून त्यांतल्या संवादातून कानी आली, हेही नसे थोडके !

" पुण्यालगत,भोरलगतच्या एका गावात सलग २०-२५ दिवस ह्या चित्रपटाचं शूटिंग झालं.आमचं सगळं युनिट एखाद्या मोठ्या कुटुंबासारखं होतं,अगदी घरच्यासारखं वातावरण होतं.सगळे कलाकार प्रोफेशनल होते.अगदी आमच्या स्पॉटबॉयनं सुद्धा सहा चित्रपट केलेले होते.मीच काय तो नवखा होतो." राजेश पिंजानी चित्रपट करताना आलेले अनुभव सांगतात.

ही काल्पनिक गोष्ट असूनही खरीखुरी असल्याचा प्रत्यय प्रेक्षकांना येतो,ते त्यामागे त्यांचे परिश्रम आहेत,म्हणून. दीड-दोन वर्षे त्यांनी बँडवाल्याचं जीवन  जवळून अभ्यासलं,हे नंतर जग्गू साकारणाऱ्या मिलिंद शिंदे यांच्याशी फोनवर नोएडाहून फोनवर विस्तृत बातचीत केली,तेव्हा कळलं.

मिलिंद शिंदे यांनी जग्गू जिवंत केलाय.त्यांनी अभिनय केलेला नाहीच,तर ती भूमिका ते जगलेत. "मी मूळचा अहमदनगरचा!दिल्लीत राष्ट्रीय नाट्य विद्यालयात १९९५ ते १९९८ मध्ये मी तीन वर्षांचा अभिनयाचा कोर्स केला, नंतर पुण्याला एक वर्ष  फिल्म इनस्टीट्यूट मध्ये कोर्स केलं.त्यानंतर मी व्यावसायिक नाटकांकडे वळलो."ती फुलराणी" मध्ये वडिलांची भूमिका केली. त्या पहिल्याच भूमिकेसाठी मला पुरस्कार मिळाला.त्यामुळे माझी एक ओळख निर्माण झाली.सुदैवानं मला कधी माझा पोर्टफोलियो अथवा फोटो घेऊन फिरावं लागलं नाही.माझी ती भूमिका गजेंद्र अहिरे यांनी पहिली होती. त्यांनी मला म्हटलं,जेव्हा केव्हा मी सिनेमा करीन,त्यात तुझी भूमिका असेल.ती फुलराणी नंतर तीन वर्षांनी मी त्यांचा " नॉट ओन्ली मिसेस राऊत" हा सिनेमा केला.पुढे अग्निहोत्र, लक्ष्मणरेखा वगैरे सिरियल्स केल्या. "नटरंग" मध्ये खलनायक साकारला.पिंजानी यांनी जेव्हा ह्या सिनेमासाठी फोन केला,तेव्हा मी काही त्यांना गंभीरपणे घेतलंच नाही.लोक सिनेमासाठी विचारणा करणारे फोन करत असतात,ते पुढे जातातच असं नाही.त्यामुळे मी त्या फोनचा गंभीरपणे विचार केलाच नाही.मात्र त्यांनी म्हटलंच आहे,तर भेटू,असा विचार करून मी नगरहून मुंबईला गेलो.त्यांनी narration उत्तम दिलं.आमची केमेस्ट्री जुळली. दोन वर्षे त्यांनी परभणीला बँडवाल्यांचा बारकाईनं अभ्यास केला.मात्र पिंजानी यांनी चित्रपटात जातीय रंग येऊ दिला नाही.मीही त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास केला.बँड वाजवताना तो पाय कसा वाकडा करतो, हलगी कशी वाजवतो...मी हलगी घेतली,वैदर्भीय बोलीची कॅसेट ऐकून ऐकून ती बोलीभाषा आत्मसात केली.तुमचा अनुभव,निरीक्षण या सगळ्या आधीच्या गोष्टींचा परिपाक आणि अभ्यास असा दोन्हींचा समन्वय व्यक्तिरेखा रंगवताना  साधला जातो.स्क्रिप्ट आपलंसं केलं,की आपोआप व्यक्तिरेखा जिवंत होते. हा अभिनेता अमुक एका व्यक्तिरेखेचा अभिनय करतोय असं प्रेक्षकांना जाणवता कामा नये,ते प्रयत्न दिसता कामा नयेत.तो अभिनय सहज घडला पाहिजे. म्हणजे कसं,प्रेक्षकांना रंगमंचावरचं नेपथ्य दिसतं, backstage च्या बांधलेल्या दोऱ्या,फळ्या असल्या त्यामागच्या गोष्टी दिसत नाहीत.तसंच अभिनय जाणवला पाहिजे, त्यामागचं तंत्र नाही,असं मला वाटतं, म्हणजे कसंय पहा-माधुरी  सहज नाचते,पण ऐश्वर्या म्हणते -पहा,मलाही तसंच छान नाचता येतं.माधुरी सहजपणे नाचते,ऐश्वर्याला प्रयत्न करावा लागतो. हा प्रयत्न,effort दिसला की अभिनय natural ,सहज घडलेला वाटत नाही." मिलिंद शिंदे त्यातला तपशील उलगडून सांगतात.ते आता स्वत:एक चित्रपट दिग्दर्शित करताहेत,पण त्यात कुठेही  कमर्शियल angle  नाही,व्यावसायिक नफ्या-तोट्याचा दृष्टीकोन नाही, असं ते सांगतात.
"पुणे फेस्टिवलमध्ये ह्या चित्रपटाचा शो होता,त्यावेळी मी तिथे उपस्थित होतो. खेळ संपल्यानंतर प्रेक्षकांनी मला गराडा घातला.त्यात वयस्कर मंडळीही होती. साठ वर्षाचे प्रेक्षक मोठ्या आत्मीयतेनं माझ्या गालावरून हात फिरवत होते. त्यांचं म्हणणं असं,की मिलिंद शिंदे आहेत,तेव्हा त्यांची भूमिका,अभिनय चांगला असणारच. त्यांच्या अपेक्षांमुळे माझ्यावरची जबाबदारी वाढते.जग्गूनं त्यांच्या हृदयात स्थान मिळवलं,मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो,याचा मला अतिशय आनंद आहे,"मिलिंद शिंदे प्रेक्षकांबद्दलच्या कृतज्ञतेनं नी आपुलकीनं त्यांच्या आयुष्यातला हा अविस्मरणीय प्रसंग सांगतात.

अगदी असाच अनुभव बाबू बँड बाजा चित्रपटात शिरमी साकारणाऱ्या नी त्यासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेल्या मिताली जगताप- वराडकर हिलाही आला.मिताली शिरमीची व्यक्तिरेखा जगलीय.मितालीशी नोएडाहून दूरध्वनीवर विस्तृत बातचीत केली,तेव्हा ती भरभरून ह्या अनुभवाबद्दल सांगू लागली. 
"हा चित्रपट हाच मुळी माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.पुणे फेस्टिवलमध्ये ह्या चित्रपटाचा शो होता,त्यावेळी मी तिथे उपस्थित होते.चित्रपट संपल्यावर हजारेक प्रेक्षक जवळ आले.प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू होते.एक पंच्याऐंशी वर्षांचे कोट्याधीश डॉक्टर आले.ते माझ्या खांद्यावर डोके ठेवून ढसाढसा रडत होते.ते म्हणाले,माझ्या आईनं माझ्यासाठी जे कष्ट घेतलेत ते मला आठवले. सर्वच प्रेक्षकांनी मोठ्या आत्मीयतेनं माझ्याजवळ येऊन सांगितलं की माझ्यामुळे  त्यांना आज त्यांची आई आठवली.त्या सगळ्यांचे हे उद्गार,त्यांच्या डोळ्यातले ते अश्रू नी प्रेक्षकांनी केलेलं कौतुक हे माझ्यासाठी कुठल्याही पुरस्काराहून अधिक मोलाचे आहेत."मिताली सांगते." माझ्या आई -वडीलांची इच्छा होती की मी स्मिता पाटीलसारखं काम करावं.'स्मिता पाटीलसारखं काम कर बुवा!' असं ते सारखं म्हणत.कसंय पहा- स्मिता पाटील ही अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी पहिली मराठीभाषिक अभिनेत्री,पण तिला तो हिंदी चित्रपटासाठी मिळालाय.अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेली मी पहिली मराठीभाषिक अभिनेत्री आहे,जिला मराठी चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालाय," मिताली अगदी सहजपणे सांगते.तिच्या आवाजात कुठे गर्वाचा लवलेश नसतो."अर्थात स्मिता पाटील हे खूप उत्तुंग व्यक्तिमत्व होतं.थोडीशी का होईना,तिच्या कुठेतरी जवळपास मी जाऊ शकले,याचा मला आनंद आहे." 

 "मी औरंगाबादची आहे.माझे वडील साहित्यिक आहेत,समाजकार्य करणारे आहेत आणि आई शिक्षिका आहे.चित्रपटाची कुठली पार्श्वभूमी नव्हती.आईला मात्र कलेची खूप आवड होती.मुलगी व्हावी,तिला आपण शास्त्रीय नृत्य शिकवावं हे आईचं स्वप्न माझ्या रूपानं पूर्ण झालं.मी बारा वर्षं भरतनाट्यम शिकले.त्यात नृत्याबरोबर अभिनयसुद्धा आहे.हे मला आवडू लागलं,परदेशांत डान्स फेस्टिवल्सना गेले.औरंगाबादमध्ये नाटकांत अभिनय केला,त्यात 
बक्षिसं मिळाली.मात्र दरवर्षी पुढे तेच तेच घडत होतं,मुंबईशिवाय पर्याय नव्हता.खरं तर दिल्लीत NSD -राष्ट्रीय नाट्य विद्यालयात जाण्याचं माझं स्वप्न होतं,पण दिल्ली आवाक्याबाहेर होती.औरंगाबादहून मुंबई जवळ होती. पहिल्यांदा मुंबईत आले,वडिलांनी एके ठिकाणी पेइंग गेस्ट म्हणून मला जागा शोधून दिली.मात्र आई वडिलांवर आपला आर्थिक बोजा टाकायचा नाही,त्यांना त्रास होऊ द्यायचा नाही असं मी ठरवलं होतं.मुळात मुंबईचं राहणीमान,तिथला चकचकाट,तिथला प्रोफेशनल approach  ह्या सगळ्याशी जुळवून घ्यायलाच मला दीड एक वर्ष  लागलं.कुणाची ओळख नाही,रस्ते माहीत नाहीत,पैसे नाहीत,अशा परिस्थितीत वडापावावर,प्रसंगी उपाशी राहून मी स्ट्रगल केला. मात्र त्या आर्थिक संकटातून खूप शिकायला मिळालं.उपाशी राहिले;त्यामुळे यशाची चव चांगली चाखता आली .मुंबईत पुढे नाटकांत अभिनय केला,हिंदी सिरियल्समधून सुरुवात केली.पण तो कारखाना होता,ते एकसाची काम करण्यात मला स्वारस्य नव्हतं. मग मी मराठीत आले.२-३ वर्ष काम केलं.  सिरियल्स,दोन-तीन चित्रपट केले.कॅमेरामन संदीप वराडकर यांच्याशी दरम्यान माझं लग्न झालं.मुलगी झाली.तेव्हा मात्र मी ब्रेक घेतला.मी माझ्या आई-वडिलांना सोडून दूर आले होते.आता मुलगी झाल्यावर तिला मी पूर्ण वेळ द्यायचं ठरवलं.नवव्या दिवसापासून मी माझ्या बाळाला आंघोळ घातली.आज माझी मुलगी चार वर्षांची आहे."मिताली सांगते. 

"बहुधा माझ्यातली हीच छटा पिंजानी यांना दिसली असावी.ते जेव्हा भूमिकेबाबत विचारणा करायला आले,तेव्हा ओवीशी- माझ्या मुलीशी माझी जी जवळीक आहे,ती त्यांना भावली.मातृत्वाचा,मायेचा हा पदर त्यांना शिरमीच्या भूमिकेसाठी अभिप्रेत होता,तो त्यांना गवसला.ही भूमिका तूच करशील,असं त्यांनी सांगितलं.मला आश्चर्य वाटलं, कारण मुलीकडे लक्ष देण्यासाठी मी जवळ जवळ २-३ वर्षे ब्रेक घेतला होता.मात्र मला माझ्या नणंदेचा खूप मोठा आधार होता.तिनंच मला ब्रेकनंतर काम करायला प्रोत्साहन दिलं.लेकीला सांभाळलं. तिच्यामुळे मी निर्धास्त होऊन चित्रपट केला.शिरमीचं तिच्या मुलाशी असलेलं जीवाभावाचं नातं हे आतून आलं.मुळात जमिनीशी माझं नातं आहे.वडील मला चपला काढून काळ्या ढेकळावरून चालायला लावायचे.मात्र भूमिकेसाठी मी अभ्यास केला नाही.भरतनाट्यममध्ये,परात डान्स मध्ये balance -तोल सांभाळायची सवय होती.मात्र डोक्यावर टोपली घेऊन चालायचा सराव वगैरे केला नाही.प्रसंगानुसार चुंबळ वेगवेगळी तसंच प्रसंगानुसार टोपलीतली भांडी नी कपडे कमी-अधिक असल्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं तोल सांभाळायचा असायचा.ते सर्व तिथल्या तिथे उत्स्फूर्तपणे घडत गेलं.सगळी दृश्यही कुठल्याही रिटेकविना चित्रित झालीत.सबंध चित्रपटाच्या चित्रीकरणात मोजून एक वा दोन रिटेक झाले असतील.सबंध चित्रपटात, लेकाला कागदांची वही शिवून देतानाचा प्रसंग अभिनयाच्या दृष्टीकोनातून माझ्यालेखी खूप भावस्पर्शी होता.दिग्दर्शकांनी 'कट 'म्हटल्यावर मी पाहिलं तर सगळे रडत होते.प्रत्येकाला आपली आई आठवत होती."मिताली सांगते.

एकूणच,राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो आला,त्यानं पाहिलं,त्यानं जिंकलं,असं "बाबू  बँड बाजा" चित्रपटाच्या बाबतीत झालं होतं.आता पुन्हा एकवार त्यानं कोल्हापूरला झालेल्या थर्ड आय एशियन चित्रपट महोत्सवात, मराठी सिनेमाच्या कॅटेगरीत सर्वोत्कृष्ट फिल्म,सर्वोत्कृष्ट डायरेक्टर,र्वोत्कृष्ट अभिनेता,सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट बालकलाकार यासाठीचे एकूण पाच पुरस्कार मिळवून ते सिद्ध केलं.
    
चित्रपटाला भाषेचे अडसर नसतात,कुठल्याही भाषेतला चांगला चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो,असं अमराठी प्रेक्षकांनी सांगितल्यामुळे त्याचा प्रत्यय घेण्यासाठी आणि आडुकलम(Adukalam )ह्या तमिळ चित्रपटाला दिग्दर्शन,अभिनेता, पटकथा,संकलन,कोरिओग्राफी ह्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेत,तेव्हा तो नक्की बघा,इथे पाय ठेवायला जागा नसेल,एवढी गर्दी असेल असे लोकांच्या  आग्रहपूर्वक सांगण्यावरून तमिळ कळत नसताना आडुकलम हा तमिळ चित्रपट बघायला गेले.कोंबड्यांच्या झुंजी हा तमिळनाडूच्या खेड्यातला लोकप्रिय क्रीडाप्रकार.त्यात प्रवीण असलेल्या आता वयस्कर झालेल्या पेट्टईकारन आणि पोलीस अधिकारी रत्नस्वामी ह्या प्रतिस्पर्ध्यांतल्या लढतीत करुप्पुमुळे पेट्टईचा विजय होतो.करुप्पू पेट्टईला गुरूस्थानी मानत असला तरी पेट्टईच्या मनात करुप्पुबद्दल आकस असतो.....तमिळ चित्रपटाच्या परंपरेला साजेसाच तो चित्रपट होता.करुप्पुचीभूमिका धनुष ह्या अभिनेत्यानं चांगलीच केली आहे.त्याचा इनोसन्स हा त्याचा प्राण आहे.हा धनुष म्हणजे वेंकटेश प्रभू कस्तुरी राजा हा सुपरस्टार रजनीकांतचा जावई.आता त्यानं " व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी?"म्हणत काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंतच्या तरुणाईला वेड लावलंय. पेट्टईची भूमिका जयबालन ह्या अभिनेत्यानं फारच प्रभावीपणे केलीये...(श्रेयनामावलीत कलानिधी मारन वगैरे नावे वाचली.)चित्रपट समजायला भाषेचे अडसर नसतात,ह्याचं प्रत्यंतर आलं.  
                            
---------------------------------------------------------------------------------------
रश्मी  घटवाई 
डी-१/७०१,
भारत पेट्रोलियम हाऊसिंग कॉम्प्लेक्स,
सेक्टर- ५६,नोएडा -२०१३०१
दूरध्वनी क्र:०१२०-२४९०१९०
मोबाईल:०९८७१२४९०४७

Tuesday, April 24, 2012


मृत्युनंतरचं जीवन  
                                                   -रश्मी घटवाई 
                

 अमेरिकेतल्या एका मेडिकल कॉलेजला संलग्न हॉस्पिटलमध्ये लेबॉरेटरी टेक्नीशियन म्हणून कॅथरीन काम करत होती.कॅथरीनला अंधाराची , पाण्याची, विमानात बसण्याची, औषधाच्या गोळ्या गिळताना आपला  श्वास  घुसमटेल, याची अतोनात भीती वाटायची...पुलावरून ती कार चालवत जात असताना तो पूल  कोसळल्याचं, तिची कार पाण्यात कोसळून त्यात अडकलेली ती कारसह पाण्यात बुडत असल्याचं अशी  भीतीदायक,विचित्र स्वप्नं तिला सतत पडत. तिच्या वडिलांना दारूचं व्यसन होतं,मुलीवर त्याचं  जराही प्रेम नव्हतं.तिची आई एकाएकी, कासवानं अंग आक्रसून कवचात शिरावं,तसं  वडिलांच्या दारू पिण्याच्या व्यसनाला कंटाळून, कुटुम्बापासून, सांसारिक जबाबदारीपासून भावनिकरीत्या अलिप्त होउन  बसली होती.भयगंडानं ग्रस्त कॅथरीनला हॉस्पिटलमधल्या एडवर्ड या डॉक्टरनी डॉ.ब्रायन वाईस यांच्याकडेच उपचारांसाठी जाण्याविषयी  सांगितलं होतं. चिंता,भयगंडानं ग्रासलेली  २७ वर्षीय कॅथरीन(Catherine), १९८० सालीं Dr.Brian Weiss -डॉ.ब्रायन वाईस यांच्याकडे उपचार घेण्यासाठी आली. 
 
 डॉ.ब्रायन वाईस  हे कोलंबिया  युनिव्हर्सिटी , न्यूयार्क मधून  १९६६ सालीं ग्राज्युएट झाले होते.नंतर येल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडीसिन मधून एम्.डी.सायकीयाट्री झाले.रेसीडंसी तिथेच केली. त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग मध्ये,नंतर मेडिकल स्कूल ,युनिव्हर्सिटी ऑफ मायामी,फ्लोरिडा मध्ये सायकीयाट्री विषयाचे असोसिएट प्रोफेसर म्हणून आणि नंतर युनिव्हर्सिटीशी संलग्न तिथल्या एका मोठ्या हॉस्पिटल मध्ये सायकीयाट्री विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केलं.त्यांचे तोपर्यंत ३७ सायंटिफिक पेपर्स प्रसिद्ध झाले होते.

डॉ.ब्रायन वाईस यांनी कॅरीन(Catherine) ला १८ महीने औषधोपचार दिले,पण त्यानं काही फायदा होईना.अखेरीस भयगंडामागे तिच्या लहानपणी  घडलेल्या घटना कारणीभूत असाव्यात,म्हणून संमोहन देऊन त्याचा इलाज करण्याचं त्यांनी ठरवलं .मानवी मनात प्रचंड मोठी सुप्त शक्ति दडलेली आहे.ती आपल्यासारख्या  सर्वसामान्य लोकांच्या आकलन शक्तीच्या पलिकडली आहे.त्यांनी कॅथरीन(Catherine) ला संमोहन दिल्यावर ती या जन्मातल्याच नव्हेत,तर मागच्या अनेक जन्मातल्या आठवणी सांगू लागली. सुमारे पाच महीने चाललेल्या त्यांनी विकसित केलेल्या या थेरपी मुळे केथरीनचच नव्हे,तर डॉ.ब्रायन वाईस यांचं पण आयुष्य बदललं. या सर्वाची सुरसकथा  डॉ.ब्रायन वाईस यांनी "Many Lives Many Masters"  या  पुस्तकातून सांगितली आहे. प्रत्येकानं आवर्जून वाचलच पाहिजे असं हे पुस्तक आहे.


एका 
कॉन्फ़रन्ससाठी कॅथरीन आणि हॉस्पिटल मधले डॉक्टर स्टुअर्ट गेले असताना त्या शहरातल्या इजिप्शियन कलावस्तू-पुराणवस्तू संग्रहालयात गेल्यावर ,गाईड सांगत असलेली माहिती  चुकीची असल्याचं सांगून,एव्हढया लोकांसमोर त्या वस्तूंबद्दलची अचूक माहिती कॅथरीननं घडाघडा सांगितली होती.
डॉ.ब्रायन वाईस यांनी संमोहित केल्यावर कॅथरीन आपल्या लहानपणीच्या घटना सांगू लागली.ती पाच वर्षाची असताना तिला कुणीतरी स्विमिंग पूल मध्ये  पोहोण्यासाठी ढकलून दिले होते.तेव्हा नाका-तोंडात पाणी जाऊन ती गुदमरली  होती.संमोहित अवस्थेत तो प्रसंग सांगत असतानाही ती तश्शीच गुदमरली होती, श्वास घेण्यासाठी तडफडत होती,अगदी तश्शीच ,जशी तेंव्हा श्वास घेण्यासाठी तडफडत होती. ती तीन वर्षांची असताना, दारू पिऊन तर्र झालेल्या वडिलांनी  अंधारात  तिच्या खोलीत येउन तिच्याशी घाणेरडे चाळे केले होते,हे  सांगत असताना पंचवीस वर्षांनंतर कॅथरीन स्फून्दून-स्फून्दून रडत होती .वडिलांनी प्यालेल्या दारूचा उग्र वास तिला त्या क्षणीही जाणवत होता.

आता ज्याची -ज्याची भीती वाटते ,ती भीती का,कधी  निर्माण झाली,त्या काळात जा,म्हणून डॉ.ब्रायन वाईस यांनी संमोहित अवस्थेत तिला आज्ञा करताच ती सांगू लागली:" हे ख्रिस्त-पूर्व १८६३ वर्ष आहे.माझं नाव आरोंडा (Aaronda) आहे.मी १८ वर्षाची आहे....आता मी २५  वर्षाची आहे,माझी मुलगी आहे,तिचं नाव क्लिस्त्रा (Clistra )आहे...ती आताची रेचल आहे...(रेचल  ही कॅथरीनची भाची होती,तिच्याशी तिचं खूप जीवा-भावाचं नातं होतं.)गावात  पूर आलाय...जोरजोरात लाटा धड़कताहेत,त्यात झाडं उन्मळून पडताहेत, पळून जायला वावच नाहीये.पाणी अगदी थंडगार आहे...मला माझ्या बाळाला वाचवायचंय...मी  आता बुडतेय...खारं पाणी माझ्या नाका-तोंडात  जातंय, मला श्वास घेता येत नाहीये,मी गुदमरतेय,माझं बाळ माझ्या हातातून निसटून गेलय ..."हे सांगताना कॅथरीन श्वास घ्यायला तडफडत होती.तडफडत असताना अचानक तिचं शरीर शिथिल झालं , तिला श्वास नीट घेता येऊ लागला.   "I see clouds...माझं बाळ,माझे इतर परिचित गाववाले सारे माझ्या समवेत आहेत." ती सांगू लागली.तिची ती जीवनलीला समाप्त झाली होती.
  कॅथरीननं तिच्या  तब्बल ८६ पूर्व-जन्मांबद्दलची सम्पूर्ण माहिती,त्यांतले प्रसंग सांगितले. अनेक  जन्मांमध्ये मृत्यु येत  असताना नेमकं काय घडलं, मृत्युनंतर काय घडलं,हे तिनं इत्यंभूत, सविस्तर सांगितलं.त्या सर्व जन्मांची कहाणी डॉ.ब्रायन वाईस यांनी "Many Lives Many Masters"  या  पुस्तकातून सांगितली आहे. 
 
"I just feel the peace.It's a time of comfort.The soul finds peace here. You leave all the bodily pains behind you.Your soul is peaceful and serene.It's a wonderful feeling,like,the sun  is always shining on you.The light is so brilliant ! Everything  comes from the light! Energy comes from the light! Our soul immediately goes there.It's like a magnetic force that we are attracted to.It's like a power source.It knows how to heal.It has many colours ....

"We choose when we will come into our physical state and when we will leave.We know when we have accomlished what we were  sent down here to accomlish.We know when the time is up,for you know that you can get nothing more out of this lifetime.When you have had the time to rest and to re-energize your soul,you are allowed  to choose your re-entry back into the physical state.Life is endless,so we never die;we were never really born.We just pass through different phases.Humans have many dimensions. But time is not as we see time,but rather in lessons that are learned."

"To be in the physical state is abnormal ! When you are in spiritual state,that is natural to you." 
भगवदगीतेतलंच तत्वज्ञान कॅथरीन सांगते...By knowledge we approach God,,,of what use are material possessions,or power?...
"There are different levels of learning.We must learn them in the flesh.We must feel the pain...When you are a  spirit you feel no pain.

"We have debts that must be paid...There are seven planes, through which we must pass before we are returned.You must learn to overcome greed.If you donot,when you return ,you will have to carry that trait as well as another one in your next life." कॅथरीननं त्यात सांगितले आहे.गम्मत म्हणजे,भगवदगीतेतलंच तत्वज्ञान तिला स्पिरीटसनी म्हणजे आत्म्यांनी सांगितलंय.
कॅथरीननं त्या संमोहित अवस्थेत  जे काही सांगितलंय,ते अर्थातच भगवद्गीतेत भगवंतांनी फार तपशीलवार सांगितलेलं आहे.श्री .अरबिंदो घोष यांच्या द सायकिक बीइंग (The Psychic Being: Soul,Its Nature,Mission and Evolution) ह्या पुस्तकातही आत्मा,त्याचं स्वरूप,त्याचं या जगात येण्याचं नी इथून जाण्याचं प्रयोजन ह्या सगळ्या विषयावर फार सुंदर विवेचन आहे.  
..
डॉ.इयान स्टीवेनसन हे युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनिया मध्ये   सायकीयाट्री चे प्रोफ़ेसर होते.त्यांनी २ हजार पेक्षा अधिक मुलांचे पुनर्जन्माच्या,आधीच्या जन्मातल्या आठवणी तसेच अनुभव गोळा केले होते.त्या अनेक मुलांना सद्य जन्मात ज्या भाषेचा परिचय झालेला नव्हता,त्या भाषाही बोलता येत होत्या. (Xenoglossy ).त्यांचे या विषयावरचे शोध-प्रबंध फार महत्वाचे मानले जातात.  
अलीकडे  आपल्याकडे टीव्हीवर रिअलिटी शो मध्ये.सम्मोहनाद्वारे गतजन्मींच्या स्मृति जागविण्याचे प्रकार सुरू झाले होते. डॉ.ब्रायन वाईस यांनी सम्मोहनाद्वारे  ज्या प्रकारे पेशंटच्या गतजन्मींच्या स्मृति जागवून त्यांच्यावर उपचार केले,त्या सदृश्य हा प्रकार  असल्याचे  कळते.  सम्मोहनाद्वारे एखाद्या व्यक्तीच्या मनात असलेली भीती घालवून टाकणे, एखाद्याचा गेलेला आत्मविश्वास जागविणे सहज शक्य आहे.सम्मोहनाद्वारे मानसिक भीती,भयगंड यांवर उपचार करणारे हरियाणातल्या हिसार इथले , डॉ.नरिंदर खेतरपाल(Dr.N.K.Khetarpaul) हे प्रसिद्ध सायकीयाट्रीस्ट आहेत. सम्मोहनाद्वारे उपचार याबद्दल ,टीव्हीवर रिअलिटी शो मध्ये.सम्मोहनाद्वारे गतजन्मींच्या स्मृति जागविण्याचे  जे प्रकार  चालले आहेत त्याबद्दल  त्यांच्याशी फोनवर सुमारे तासभर विस्तृत बातचीत केली. (त्यांची वेबसाइटwww.khetarpaul.com ईमेल khetarpaul@gmail.com
 
"मै १९७१ से हिप्नोसिस कर  रहा हूँ.The first public demonstration of hypnosis I gave as a medical student in 1972 before science society forum headed by then Professor Dr G.S. Shekhon of PGIMS Rohtak. Since then I have been practising hynosis on friends and patients for treatment.It is an effective tool to treat some patients with psychological and psychosomatic problems like insomnia, anxiety, phobias, hysteria, bed wetting, headache, back ache, peptic ulcers, ulcerative colitis, migraines, obsessions, menstrual problems, dental extractions, painless child birth, behaviour problems, addictions and many varied symptoms that are grouped under psychosomatic problems."  ते  सांगतात. 
"Regression to previous life ,थोडक्यात एखाद्या व्यक्तीच्या पूर्वजन्मांच्या  स्मृतीजागविणे-ह्याचा कुठला prooved  data  नाहीये.त्याला शास्त्रोक्त आधार नाहीये.मी स्वत: कधीच convinced झालो नाहीये.  some people who practice hypnosis, glorify it because they make money out of it. The cons are not brought forward due to selfish reasons too.  It is time consuming and not possible on 100 % patients. माझा ह्यावर  विश्वास
 नाहीये,त्यावर मला वेळही वाया घालवायचा नाहीये.  Lately I have started using narco test ( Injection thiopentone) for the same purpose to save time with good success ."  ते  सांगतात.
" सम्मोहनाद्वारे पेशंटला पाच वर्षाचा, दोन वर्षाचा,अगदी सहा महिन्याचे तान्हे बाळ ह्या स्थिति पर्यंतही  नेता येतं.त्या वयाला साजेसं वर्तन, उदाहरणार्थ अंगठा चोखणे -  ही पेशंट करू लागतो.काहींना जन्माच्या वेळेचीही  आठवण  आहे. मात्र लाइफ फॉर्म कधी झाली,ह्याबद्दल ते सांगू शकले नाहीत.समजा कुणी लहानपणी लैंगिक शोषण अनुभवलं असेल,मनावर आघात झालेला असेल,तर  सम्मोहनाद्वारे कोन्शस  लेव्हल वर त्या व्यक्तीला ट्रीट केलं जातं.अगदी एकाच सब्जेक्टला ( व्यक्तीला )वेगवेगल्या  वेळी सम्मोहित केलं,तर तो सांगत असेल ते वेगवेगलं असतं.एखाद्या लहान मुलाला समजा मी सम्मोहित केलं,तर आपल्या लहानपणच्या अनुभवाबद्दल तो आता  सांगेल,ते वेगलं असेल,नी पंधरा वर्षांनी सांगेल ते वेगलं असेल.कारण ते त्याच्या त्या त्या वयाच्या,वेलेच्या कोन्शसनेस  ला अफेक्ट करेल.सम्मोहन सर्वांवरच परिणामकारक राहील असे नाही.लहान मुले ,गर्भवती स्त्रिया यांच्यावर परिणामकारक होवू शकेल,मात्र mentally ill ,dull  लोक,पागल यांच्यावर परिणामकारक होवू  शकणार नाही.regression च्या म्हणजे deep stage  मध्ये तर फार थोडेच लोक जावू शकतात. सम्मोहनाद्वारे जे सांगितलं जातं,त्यावर कोन्शस माईंड तसच विचार करतं.मात्र ट्रान्स मध्ये,deep stage  मध्ये सुद्धा कोणी कुणा कडून  चोरी,रेप वगैरे चूक कामे  करवू शकत नाही. conscious  mind गलत काम नाही कर सकता."ते सांगतात.
मध्यंतरी जणू सम्मोहित करून एका वयस्कर बाईंच्या अंगावरचे सोन्याचे दागिने त्यांनी स्वत: काढून  भामट्यांच्या स्वाधीन केल्याची घटना दिल्लीत घडली होती.ते कसे ,ह्यावर डॉ.खेतरपाल म्हणतात की जर कुणी ब्रेनवाश केला असेल,तरच हे संभव आहे.चोरी,bomb ठेवणे,आतंकवाद हे सर्व ब्रेनवाश केला असेल तरच शक्य आहे.अन्यथा सम्मोहनाद्वारे कुणी चूक कामे  करवू शकत नाही.
सध्या टीव्हीवर रिअलिटी शो मध्ये, सम्मोहनाद्वारे गतजन्मींच्या स्मृति जागविण्याचे  जे प्रकार  चालले आहेत ,त्यातून भोंदुगिरिचे,अंधश्रद्धा बोकाळण्याचे प्रकार ही घडतील,त्यातून psychological प्रोब्लेम्स पण उद्भवू शकतील असं त्यांना वाटतं."एखादा डॉ कडे जातो, डॉ.त्याला म्हणतो,ये दवाई खाईये,आप ठीक हो जाएँगे.,त्याला ठीक वाटतं.तसलंच काहीसं हे आहे.ह्याला  Placebo treatment म्हणतात. Placebo treatment म्हणजे ज्यात प्रत्यक्ष औषध दिलेलंच नसतं ,दुसराच एखादा पदार्थ उदाहरणार्थ कैल्सियम पावडर,glucose वगैरे असलं,तरीही रुग्नाची श्रद्धा असते,की डॉ.नी दिलेलं हे औषध घेवून मी बरा होणार, आणि तो बरा होतोही. औषध बाजारात येण्यापूर्वी medicine  trials मध्ये दोन  सारख्या  कैप्सूल्स मध्ये, एकात औषध नी दुसरयात  अशा पद्धतीने दुसराच एखादा पदार्थ घालून टेस्ट केलं जातं.स्वीडन मध्ये स्टडी झालीये की होमियोपाथी अशी वेगळी म्हणून काही नसतेच,पेशंट Placebo treatment  मुळे   बरा होतो."ते सांगतात.
नार्को टेस्टचा वेगवेगल्या गुन्ह्यान् मध्ये सापडलेल्या गुन्हेगारानकडून सत्य बाहेर काढण्यासाठी   कसा वापर होतो   हे सांगताना ते म्हणतात की नार्को चे इंजेक्शन दिल्यावर "conscious  mind  सो जाता है. subconscious  level   पर  संकोच ख़त्म होता है.जरूरी नाही है कि व्यक्ति सच ही बताएगा. "  
 
एक मात्र खरं,की गतजन्मींच्या  स्मृती कुणाला जागवता आल्याही,तरी सध्याचं  आजूबाजुचं चित्रच इतका गोंधळ माजवणारं आहे,की ह्याच जन्मी आहे तेव्हढे पुरेसे नाही का,त्यात आणखी गतजन्मींच्या कटू आठवणी कशाला,  असे वाटावे!
 दा विन्ची कोड
                                                                                             - रश्मी घटवाई
                                                      

लिओनार्दो-द-विन्ची हे नाव उच्चारताच वाचकाच्या डोळ्यापुढे 'मोनालिसा,'द लास्ट सपर'ही जगप्रसिद्ध चित्रे तरळू लागतात.अर्थात इटालियन चित्रकार म्हणून लिओनार्दो-द-विन्चीची ओळख सर्वात अधिक असली तरी तो अत्यंत कुशाग्र बुद्धीचा इंजिनीअर,वस्तूशास्त्रज्ञ,गणितज्ञ, संगीतकार, शास्त्रज्ञ,अनेक कल्पनांचा जनक  म्हणूनही विख्यात होता.लिओनार्दो-द-विन्ची ह्या  एकाच  व्यक्तीमध्ये कितीएक कलागुण एकवटलेले  होते.

१५ एप्रिल १४५२ रोजी इटलीतील विन्ची या   खेड्यात लिओनार्दो जन्मला.त्याची आई सोळा वर्षाची कॅटरीना ही त्याचे वडील सर पिएरो यांच्याकडे नोकर म्हणून कामाला होती.त्यांचा विवाह झाला नव्हता.वडील नोटरी होते.पुढे त्यांचा विवाह अल्बीएरा नावाच्या मुलीशी  झाला नी  कॅटरीनाचा विवाह दुसऱ्या कुणा गरीबाशी.त्यामुळे लिओनार्दोला वडील नी सावत्र आईजवळ राहावे लागले.पुढे ते कुटुंब खेड्यातून फ्लोरेन्स या शहरात स्थलांतरीत झाले.तिथे Verrocchio-वेरोचिओ या त्यावेळच्या विख्यात चित्रकाराकडे कलेचं शिक्षण   लिओनार्दो घेऊ लागला.त्याच्यासारख्या शिकाऊ पोरासोरांना-discepolos  ना  रंग घोटणे,ब्रश तयार करणे,चित्रांसाठी लाकडी panels  तयार करणे अशी कामे करावी लागत.पुढे चित्रकार गुरू चित्र काढी नी त्यात रंग भरायचं  काम शिष्यांना देई. लिओनार्दो हा शिष्य चांगला 'तयार' झाला आहे,हे लक्षात आल्यावर, गुरू वेरोचिओ येशू ख्रिस्तावरचे एक अतिमहत्वाचे चित्र काढत होता,त्यातला एक देवदूत काढून रंगवायचे काम त्यानी लिओनार्दोवर सोपवले.त्याचे पूर्ण झालेले काम गुरूच्या चित्रापेक्षाही अत्यंत सरस झालेले  बघून  गुरूने हे पाणी काही वेगळेच असल्याचे जोखले.
लिओनार्दोने sfumato -स्फूमातो -हे स्वत:चे नवीनच तंत्र चित्रात आणले-त्याचे रंग हळूहळू एकमेकात ब्लेंड होऊन आकार वा प्रतिमा, धुराचा पडदा मध्ये  असल्यागत धूसर  होत जात उत्कृष्ट परिणाम साधत.  chiaroscuro - किअरोस्कूरो हे  स्वत:चे नवीनच तंत्र   लिओनार्दोने चित्रात वापरून छाया-प्रकाशाच्या परिणामानं त्रिमिती (3 - D Effect).साधली. त्यानं चित्रात पर्स्पेक्टीव्ह  आणला-ज्यायोगे लांबवर जाणारी एखादी गोष्ट(उदा.नदी) vanishing spot वर चित्रात लुप्त होताना दिसते.
आपल्या चित्रांमध्ये मानवी शरीर  अचूकपणे  रेखाटलं  जावं, यासाठी मानवी शरीराबद्दल  अंतर्बाह्य माहिती व्हावी म्हणून,तो अंत्यविधी झाल्यानंतर प्रेतांची चिरफाड करून, आतल्या  अवयवांची,स्नायूंची रचना समजावून घेत असे.Vitruvian Man ह्या त्याच्या रेखाचित्रात हात नी पाय पसरून उभ्या असलेल्या पुरुषाच्या दोन सुपरइम्पोझड  प्रतिमा वर्तुळ व चौकोनात  दाखवून मानवी शरीरात प्रत्येक अवयवाचे एक निश्चित प्रमाण असते,हे त्याने दाखवून दिले नी १.६१८  या प्रमाणात मानवी शरीर बद्ध असते हे सिद्ध केलं.
भविष्यातल्या अनेकविध मशीन्सची  रेखाटने त्याने आपल्या वह्यांमध्ये काढून ठेवली होती.त्या  मशीन्स त्याला तयार करून प्रत्यक्षात आणायच्या होत्या.काळाच्या अगदी शेकडो वर्षे तो पुढे होता.तो अतिशय देखणा होता.खेळाडू, उत्तम  घोडेस्वार,तलवारबाज होता. त्याला  दोन्ही  हातांनी  लिहिता  येत  असे,त्याहीपेक्षा  गमतीदार  म्हणजे  त्याला  मिरर-इमेज   मध्ये  लिहिता  येत असे. वाचणाऱ्याला  ते   आरशात धरून  वाचावं  लागे.  त्याला कागदांवर सतत काहीतरी लिहिण्याची,रेखाटणे काढायची सवय होती.असे सुमारे तेरा हजार कागद त्यानं  रेखाटले,टिपण काढून ठेवलेले होते.
 त्यानं नकाशे बनवले.घोड्यांचे तर त्याला अतोनात आकर्षण होते.घोडा धावताना  घोड्याचे स्नायू कशा प्रकारे हलतात,हे चित्रात अचूकपणे रेखाटण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली.त्यानं रणगाड्याची  डिझाइन्स   बनवली, पुढे १९१६ मध्ये पहिला रणगाडा बनला,तो उणा-अधिक   लिओनार्दोच्या  डिझाइन्सनुसार.  अनेक पक्ष्यांचा त्यानं अभ्यास केला.ते उडतात कसे नी का,ह्याचा अभ्यास केला.त्या आधारावर त्यानं उडणाऱ्या मशीन्सची -म्हणजे विमानांची-डिझाइन्स  रेखाटली.
रेनेसाँच्या-Renaissance च्या काळातल्या मायकेल एंजेलो  (Michelangelo),बोतीसेली (Botticelli), ह्यांच्यापेक्षा लिओनार्दो -द-विन्ची  अधिक सरस नी लोकप्रिय आहे. या अद्वितीय चित्रकाराची केवळ २७  चित्रे  जगभरात आहेत.२ मे १५१९ रोजी त्याचा मृत्यू झाला.६७ वर्षाच्या त्याच्या एकट्याच्या  आयुष्यात  तो जणू अनेक व्यक्तींची आयुष्ये समृद्ध्पणे जगला.  

Dan Brown डॅन ब्राऊन ह्या लेखकाचं "The  Da  Vinci Code " -द दा विन्ची कोड हे पुस्तक हाती घेण्यापूर्वी लिओनार्दो -द-विन्ची   ह्या महान व्यक्तिमत्वाची किमान एवढी ओळख वाचकाला असणे नितांत गरजेचे आहे.त्याखेरीज ह्या पुस्तकाचा खरा आस्वाद घेता येणार नाही.मुळात कादंबरीचे हे कथानक वास्तव आहे की काल्पनिक आहे ह्याचा संभ्रम व्हावा इतके त्यातले तपशील वास्तव आहेत.ती प्रचंड वेगवान रहस्यकथा आहे.मात्र गम्मत म्हणजे Jacques Saunière ह्या ख्यातनाम क्युअरेटरचा  खून कोणी केला ते सुरुवातीलाच लेखकानं लिहिलं आहे.त्यातलं रहस्य वेगळ्याच गोष्टींमध्ये आहे.ते जसं-जसं उघड होत जातं,तसा-तसा  वाचक ह्या साऱ्यात कमालीचा गुंतत जातो नी स्वत: तो गुंता सोडवण्यासाठी जणू   सज्ज होतो.आरंभ बिंदुपासून सुरुवात करून अंतिम बिंदूपर्यंत घडलेल्या वर्तुळाच्या या चित्त थरारक प्रवासात वाचक श्वास रोखून आता पुढे काय घडणार या उत्सुकतेनं वाचत जातो.

Jacques Saunière -जाक सौनिएर   ह्या ख्यातनाम क्युअरेटरचा चित्रकलेच्या,संग्रहालयांच्या क्षेत्रात विलक्षण दबदबा  आहे. मोठ्या-मोठ्या चित्रकारांच्या चित्रांचा,त्यांच्या चित्र-शैलींचा तो गाढा अभ्यासक आहे. पॅरीसमधल्या  लूव्र म्युझियम मध्ये त्याच्या आलिशान gallery मध्ये तिथला मास्टरपीस भिंतीवरून ओढून Jacques Saunière -जाक सौनिएरनं म्युझियमला धोक्याचा संदेश दिला आहे.  त्याचा  पांढराधोप  अल्बिनो  मारेकरी  त्याच्यावर बंदूक रोखून, आतापावेतो त्यानं  प्राणपणानं   दडवून ठेवलेलं रहस्य सांगण्यास  बाध्य करतो आहे.अखेर खरं भासेल असं खोटं रहस्य तो त्याला सांगतो."इतर तिघांना मारलं,त्यावेळी त्यांनीही मला हेच सांगितलं." सिलास हा अल्बिनो  मारेकरी  जाक सौनिएरला सांगतो,तेव्हा भीतीची  थंड लहर जाक सौनिएरच्या शरीरभर  पसरते. आपला जीव गमावण्याइतकं  ते रहस्य महत्वाचं आहे का असं सिलास जाक सौनिएरला विचारतो.तुझ्या बरोबरच तुझे  रहस्यही नष्ट होणार असं म्हणून तो त्याच्या पोटात गोळी झाडतो.नी तिथून निघून जातो.रक्तानं माखलेल्या Jacques Saunière-जाक सौनिएरला आपला अंत पंधरा मिनिटात होणार हे कळून चुकतं. " म्युझियमचा अधिकारी वा पोलीस येईपर्यंत किमान वीस मिनीट  लागतील.माझ्याबरोबर माझे रहस्य नष्ट होता कामा नये.ते अन्य लायक व्यक्तीला कळले पाहिजे. "त्या तशा जखमी अवस्थेत  जाक सौनिएर विचार करतो,"आता प्रत्येक सेकंद लाख मोलाचा आहे."

 ह्या साऱ्या मागचा सूत्रधार असलेल्या  टीचरकडे सिलास जातो.सिलास चांगलाच धार्मिक आहे.अर्थातच येशूवर त्याची नितांत श्रद्धा आहे." ग्रॅन्ड मास्टर  नी  त्याचे इतर तिघे सह-अधिकारी-  senechaux -या  चौघांनाही मी  वेगवेगळं संपवलं.Clef de vo^ute - keystone-म्हणजे ज्यात  ते  रहस्य  लपवलय असा एक कळीचा  पत्थर अस्तित्वात असल्याचं नी तो  पॅरीसच्या प्राचीन चर्चमध्ये आहे,असं चौघांनीही मरतेसमयी खात्रीपूर्वक  सांगितलं." सिलास  टीचरला सांगतो."येशू हा देव नाहीच हे सांगणारं  त्यांचं ते रहस्य असलेला दस्तावेज त्यांनी चक्क चर्चमध्ये ठेवून केवढा विरोधाभास  साधलाय.शेवटी मृत्यू समोर  दिसताच  नास्तिकांनाही देव आठवतो म्हणायचा!" टीचर सिलासला  म्हणतो.

Robert  Langdon रॉबर्ट  लान्गडॉन हा अमेरिकेतल्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीत रीलीजियस सिम्बोलोजी (Religious Symbology)म्हणजे संकेत चिन्हांचा,  गूढ सांकेतिक भाषेचा प्रथितयश प्रोफेसर  नी  विख्यात अभ्यासक  फ्रान्समध्ये  पॅरीसमधल्या अमेरिकन  युनिव्हर्सिटीत भाषण देण्यासाठी आलेला होता.भाषणानंतर पेयपानासाठी त्या संध्याकाळी  पॅरीसमध्ये लूव्र म्युझियमचे क्युअरेटर  Jacques Saunière-जाक  सौनिएर बरोबर त्याची भेट ठरली होती.मात्र  जाक  सौनिएर आलाच नाही.
आपले  भाषण आटोपून हॉटेलमध्ये विश्रांती घेत असताना मध्यरात्री फ्रान्सचे ज्युडीशिअल  पोलीस येऊन त्याला एक फोटो दाखवू लागले.त्या फोटोतल्या व्यक्तीची जशी गत झाली होती,तसाच एक फोटो आपण यापूर्वीही पहिला असल्याचं(deja vu)त्याला जाणवलं. ह्या फोटोतल्या व्यक्तीनं जाणीवपूर्वक स्वत:ला तशा पोझिशनमध्ये ठेवून घेऊन मगच अंतिम श्वास घेतला होता. "मला कळत नाहीये कुणी असं का पडून मरेल?" रॉबर्ट  लान्गडॉननं पोलीस अधिकाऱ्याला विचारलं."तुम्हाला कळत नाहीये!श्रीमान जाक  सौनिएर ह्यांनी स्वत:च ह्या विशिष्ट प्रकारे स्वत:चं  शरीर ठेवून मग अंतिम श्वास घेतलाय." पोलीस अधिकाऱ्यानं लान्गडॉनला सांगितलं.फ्रान्सचे ज्युडीशिअल  पोलीस त्याला   लूव्र म्युझियममध्ये घेऊन गेले.
आयफेल टॉवर  पार करून पोलीस रॉबर्ट लान्गडॉनला लूव्र म्युझियमजवळ घेऊन आले. म्युझियमच्या  प्रवेशद्वाराचा परिसर त्या म्युझियमपेक्षाही अधिक प्रेक्षणीय होता.I M.Pei (पेई)  या चीनमध्ये जन्मलेल्या अमेरिकन आर्टीस्टनं बनवलेला  काचेचा,पारदर्शक  ७१ फूट उंच, भव्य पिरामिड  (Pyramid )तिथे उभा होता.मित्रां(फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष  François  Mitterrand)  यांनी तो उभारून घेतल्यानं, ते  इजिप्शियन कला नी वास्तुकलेचे भोक्ते आहेत,म्हणून "स्फिंक्स" म्हणून  त्यांच्यावर कडाडून टीका झाली होती.ते पिरामिड कसले,paris च्या चेहेऱ्यावरचा तो व्रण आहे  ही फ्रेंचांची धारणा होती.
रॉबर्ट लान्गडॉनला आत प्रवेश करण्याची सूचना देण्यात आली.Bezu  Fache -बेझू फाश   हा उंचापुरा,धिप्पाड फ्रेंच पोलीसप्रमुख  रॉबर्ट  लान्गडॉनची तिथे वाट पाहत होता.पिरामिड कसा वाटला,अशी त्यानं रॉबर्ट लान्गडॉनजवळ विचारणा केली. भव्य आहे,असे लान्गडॉनने सांगताच paris च्या चेहेऱ्यावरचा तो व्रण आहे,असे फाश उद्गारला.'हे  पिरामिड ६६६ काचेची तावदाने वापरून बनवलेले आहे-नी ६६६ हा सैतानाचा आकडा आहे,हे ह्याला माहितेय की नाही कोणास ठावूक!' लान्गडॉनने विचार केला.त्याचं लक्ष आतल्या,जरा कमी लोकांना माहीत असलेल्या  La Pyramide Inversée ह्या उलट्या पिरामिड कडे गेलं.
Jacques Saunière-जाक सोनीएर ची नी रॉबर्ट  लान्गडॉनची भेट त्या संध्याकाळी व्हायची होती,ती कशासाठी ठरली,कोणी ठरवली होती,त्यात नेमकी कशाबाबत चर्चा व्हायची होती,त्याबद्दल बेझू फाश रॉबर्ट  लान्गडॉनजवळ मुद्देसूद चौकशी करू लागला. बेझू फाशच्या  टाय-पिनवर जीझस   ख्राइस्ट व त्याचे बारा धर्मदूत -apostles -दर्शवणारा क्रॉस व त्यावर तेरा काळे रत्नाचे खडे होते.ह्या चिन्हाला crux gemmata -क्रूक्स  जेमाटा असं संबोधलं  जाई.फ्रान्सच्या पोलीस-प्रमुखानं  अशा प्रकारे आपल्या धार्मिकतेचं जाहीर प्रदर्शन करावं ह्याचं लान्गडॉनला आश्चर्य वाटलं.
Jacques Saunière-जाक सोनीएरचं संपूर्णपणे विवस्त्र  अचेतन शरीर समोर बघून रॉबर्ट  लान्गडॉनला प्रचंड धक्का बसला.मृत्यू समोर उभा ठाकला असतानाही त्यानं आपल्या जिवंतपणीच्या शेवटच्या क्षणांमध्ये प्रचंड मेहेनत केलेली दिसत होती.पोटात गोळी लागूनसुद्धा एवढ्या लांबवर  ग्रॅन्ड  gallery पर्यंत Jacques Saunièरे-जाक सोनीएर चालत आलेला होता,अंगावरचा एकूण एक कपडा उतरवून,  (लिओनार्दो द विन्चीच्या  vitruvian man प्रमाणे) आपले दोन्ही हात नी दोन्ही पाय पसरून त्यानं स्वत:ला जमिनीवर ठेवून घेतलं होतं.त्याच्या पोटाच्या जखमेतून वाहणाऱ्या रक्ताचा शाई म्हणून वापर करत त्यानं डाव्या हाताच्या बोटानं पोटावरच, पाच रेषा एकमेकींना छेदून  तारा दर्शवणारं  एक चिन्ह काढलं होतं.
"हे pentacle म्हणजे तारा  आहे.पृथ्वीतलावरचं सर्वात प्राचीन चिन्हानपैकीचं एक.ख्रिस्तपूर्व चार हजार  वर्षांपेक्षा जास्त काळापासून ह्याचा  वापर केला  जात आहे."रॉबर्ट  लान्गडॉननं सांगितलं.
"त्याचा अर्थ काय होतो?"बेझू फाशनं विचारलं.
"ते निसर्गपूजेशी निगडीत असलेलं  ख्रिस्तपूर्व काळातलं  पगान धार्मिक  चिन्ह आहे. प्राचीन काळी हे विश्व पुरुष आणि स्त्री अशा  दोन अर्ध्यांमध्ये विभाजित आहे असं मानलं जाई.देव आणि देवी!यिन आणि यांग!जेव्हा निसर्गात स्त्री व पुरुष यांच्या मध्ये समतोल राखलेला असतो, तेव्हा जगात शांती नांदते.जेव्हा असा समतोल नसतो,तेव्हा एकच  गोंधळ  माजतो.  pentacle म्हणजे तारा हा sacred feminismचं-स्त्रीचं प्रतीक आहे.तो व्हीनस देवतेचं प्रतीक आहे.व्हीनस देवतेला स्त्री सौंदर्याची,शृंगाराची देवता मानलं जातं." लान्गडॉननी सांगितलं.व्हीनस  म्हणजे शुक्राची चांदणी. आकाशात  दर आठ वर्षांनी ती अशा जागी येते की अचूक  pentacle -पाच टोके असलेला ताऱ्याचा आकार  तयार होतो.(आपल्या दिवाळीतल्या आकाश कन्दिलासारखा आकार) ग्रीकांनी ह्या शुक्र ताऱ्याचं दर आठ वर्षांनी  नेमानं होणारं आगमन बघून त्यावरून ऑलिम्पिक  खेळ बेतले.ऑलिम्पिकचं  प्रतीकचिन्ह  ही आधी जवळजवळ  पाच  टोकांचा ताराच निश्चित झाला होता.मात्र पगानकालीन प्रतीकचिन्ह  मिटवून  टाकण्यासाठी चर्चनं कंबर कसली. 
हे मात्र  लान्गडॉननी मनात म्हटलं.
Jacques Saunière-जाक सोनीएरनं मृत्युसमयी स्वत:चं शरीर पाच   टोकांच्या ताऱ्याच्या आकारात ठेवलं,पोटावर तसाच तारा-pentacle काढला नी  त्यावरताण  म्हणजे  त्यानं  जमिनीवर  अदृश्य  शाईनं काही  लिहून ठेवलं होतं.त्यावर उजेड पडताच जांभळ्या रंगातली ती अक्षरं दृगोचर झालीत.बेझू फाशनं लान्गडॉनला  तो संदेश दाखवून म्हटलं."हे काय आहे,त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच तुम्हाला इथे   आणण्यात आलंय."
जाक   सोनीएरचा खून  रॉबर्ट  लान्गडॉननंच केला आहे अशी  बेझू फाशला खात्री होती.दोघे संध्याकाळी भेटणार होते आणि जाक सोनीएर मारेकऱ्याला ओळखत होता,हेही उघडपणे कळत होतं.
13-3-2-21-1-1-8-5
O,Draonian devil!
Oh,lame saint!
Jacques Saunière-जाक सोनीएरनं मृत्युसमयी लिहून  ठेवलेला गूढ संदेश  लान्गडॉनला  उलगडायचा   होता."आमचे क्रिप्टोग्राफर(cryptographers)  त्यावर काम करताहेतंच."बेझू फाशनं म्हटलं.लान्गडॉननं त्यावर बरंच डोकं खपवलं,पण त्याला समाधानकारक उत्तर मिळेना.
"ओह!Jacques Saunière-जाक सोनीएरनं स्वत:चं शरीर लिओनार्दो-द-  विन्चीच्या  vitruvian man प्रमाणे ठेवलंय."रॉबर्ट  लान्गडॉनला साक्षात्कार होताच त्याचा वरचा श्वास वर नी खालचा श्वास खाली राहिला.
फ्रेंच पोलिसांच्या क्रिप्टोलोजी विभागातली  Sophie Neveu -सोफी नेव्यू  ही बत्तीस वर्षीय पोलीस युवती सभोवती भरभक्कम पोलीस बंदोबस्त असून नी कुणालाही आत येऊ देण्याची  परवानगी नसताना वादळासारखी तिथे आली.
सिलास हा कैदी म्हणून तुरुंगात शिक्षा भोगत असताना आलेल्या प्रचंड भूकंपात त्याच्या कैद्खान्याच्या वरचं छप्पर कोसळून पडलेल्या खिंडारातून तो पळून गेला.अखंड रात्रभर तो पळत होता.थकव्यानं नी अचानक  मिळालेल्या स्वातंत्र्यानं तो बेशुद्ध झाला.बाहेर, त्याचं पांढरंधोप  शरीर हा त्याच्याविषयीच्या  तिरस्काराचा  नी कुचेष्टेचा विषय होता.त्याचे डोळे उघडले तेव्हा  त्याच्यासमोर   एक ख्रिस्ती मिशनरी  उभा होता. त्यानंच त्याला  सिलास हे नवं नाव नी नवी  ओळख दिली.बायबलमधला उतारा काढून त्याला वाचायला दिला:...'आणि अचानक एकदम जोरदार  धरणीकंप झाला. तुरुंगाच्या  पायव्यासकट सगळी इमारत जोरजोरात  हलू लागली...आणि तुरुंगाची सारी दारे सताड उघडली...'माझं नाव बिशप मॅन्युएल अरीन्गरोसा' ख्रिस्ती धर्मगुरूनं त्याला सांगितलं.
Bishop Manuel Aringarosa -बिशप मॅन्युएल अरीन्गरोसा हा ख्रिस्ती धर्मगुरूOpus  Dei-  ओपस डी ह्या  ultraconservative christian society/catholic  churchचर्च चा सदस्य होता.ओपस डीचे सदस्य असलेले  विवाहित लोकही कौटुंबिक  कर्तव्ये  पार पडत असतानाच  कॅथोलिक प्रथांचं पालन मोठ्या  कट्टरपणे  करतात नी देवाधर्माचं कार्य करतात, असा त्यांचा  दावा होता.ओपस डीला वाटीकन (vatican )चा वरदहस्त होता. 
अरीन्गरोसा टीचरच्या मर्जीतला होता.चर्चला विरोध करणाऱ्या,येशू हा देव नव्हे,सर्वसामान्य माणूस होता ह्या मताच्या 'ब्रदरहूड'च्या  चार  प्रमुखांची  नावे त्याला  कळली होती.मात्र काम पूर्ण होईपर्यंत अरीन्गरोसानं सिलासला ओळख द्यायची नाही की त्याच्याशी बोलायचे नाही, ही अट  टीचरनं अरीन्गरोसाला घातली.  
"हे आकडे म्हणजे कुठला टेलिफोन नंबर वगैरे नसून गणिताचे आकडे आहेत."फ्रेंचमध्ये Sophie Neveu -सोफी नेव्यू बेझू फाशला म्हणाली. मृत्युच्या क्षणी कोण वेड्यासारखी गणिताची आकडेमोड करेल,ह्या कल्पनेनं बेझू फाश चक्रावला.त्यानं तिची कल्पनाच फेटाळून लावली.ती कितीही उच्च दर्जाची  क्रिप्टोग्राफर असली तरी त्या क्षणी ते सारं विसंगत भासत होतं.
" जाक सोनीएरला ठावूक असणार की ह्या आकड्यांकडे नजर जाताच आपल्याला कळेल..." सोफी नेव्यू म्हणाली."ह्याचा अर्थ हा आहे."तिनं काही आकडे कागदावर लिहिले-
१-१-२-३-५-८-१३-२१
"ह्यात काय विशेष आहे?तू  केवळ चढत्या भाजणीत हे आकडे लिहिले आहेत." बेझू फाश कुरकुरला.
"तेच!हा जो नंबर सिक्वेन्स,म्हणजे ठराविक पद्धतीनं चढत्या भाजणीत हे आकडे लिहिलेले आहेत,त्याला अपार महत्व आहे.ह्याला Fibonacci Sequence म्हणतात.विख्यात गणितज्ञ लिओनार्दो  फायबोनाती    ह्यानं तेराव्या शतकात आकड्यांची ही विवक्षित शृंखला तयार केली. त्यात जसजसे पुढे जावे,पहिल्या दोन आकड्यांची बेरीज तिसऱ्या आकड्याएवढी येते.  A progression in which each term is equal to the sum of two proceeding terms" तिनं बेझू फाशला सांगितलं.
"हा खून तूच केल्याचा बेझू फाशला संशय आहे.तुझ्या हालचालींवर त्याची बारीक नजर आहे.तू संकटात आहेस" सोफी नेव्यू रॉबर्ट लान्गडॉनला म्हणाली."  "बेझू फाशनं तुला जमिनीवर लिहिलेल्या गूढ संदेशाच्या उर्वरित ओळी तुझ्यापासून लपवून ठेवल्यात.तू त्या पाहू नयेस म्हणून मिटवून टाकल्यात.मूळ संदेशाचे,खुनाच्या ठिकाणाचे जे फोटो त्यानं  आमच्या  खात्याला  पाठवलेत ते हे बघ." असं म्हणून तिनं तो संदेश त्याला दाखवला- 
13-3-2-21-1-1-8-5
O,Draonian devil!
Oh,lame saint!
P.S.Find Robert Langdon
लान्गडॉनला आपल्या पायाखालची जमीन सरकत असल्याचा भास झाला. जाक सोनीएरनं आपला उल्लेख त्यात का करावा,हेच गूढ त्याला उमगलं नाही.
"मला ठावूक आहे की तू निर्दोष आहेस.पण तुझे नाव त्यात लिहिलेले असल्यामुळे केवळ बेझू फाश तुला यात गोवतो आहे.हा संदेश माझ्यासाठी आहे!"सोफी नेव्यू रॉबर्ट लान्गडॉनला म्हणाली.
"तुझ्यासाठी?"विस्मयचकीत होऊन लान्गडॉन म्हणाला..
"हो.माझ्यासाठी!जाक सोनीएर हे माझे आजोबा होते. मी  गेल्या .दहा वर्षांपासून त्यांच्यापासून वेगळी राहतेय.p.s.म्हणजे प्रिन्सेस सोफी.ते मला ह्याच नावानं संबोधायचे."
सोफी नेव्यू रॉबर्ट लान्गडॉनला बेझू फाशच्या  तावडीतून सोडवण्यासाठी जिवाचं  रान करते.बेझू फाशनं त्याला सर्विलांस मध्ये ठेवलाय.त्याची प्रत्येक हालचाल, बोलण,त्याच्या खिशात गुपचूप सरकावलेला  कॅमेरा टिपतो आहे.अखेरीस सोफी नेव्यू बेझू फाशला हुलकावणी देण्यात यशस्वी होते.
"आजच दुपारी जाक सोनीएर हे माझे आजोबा मला त्यांचं रहस्य सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते,मात्र मी त्यांच्यावर रागावून घर सोडलं होतं,नी ते ह्या ना त्या मार्गानं त्यांचं ऐकावं,म्हणून खूप प्रयत्न करीत होते. मी त्यांना भेटावं,अशी इच्छा व्यक्त करीत होते. मी लहान असताना ते मला अशाच प्रकारची कोडी घालायचे...बघता बघता अशा  गूढ  संदेशांतून,चिन्हांतून,सांकेतिक  भाषेतून मला नेमकं काय,ते अचूक उलगडता  यायला लागलं,नी तो छंद  मोठेपणी चक्क माझं करियर  बनला".सोफी नेव्यू  रॉबर्ट लान्गडॉनला सांगते.
"दा  विन्ची,फायबोनाती  सिक्वेन्स,pentacle -शुक्रतारा,p .s .सोफी हे तिचं नाव SoPHI असं लिहिल्या जाऊ शकतं.PHI -फी हा विश्वातला सर्वात सुंदर आकडा आहे.१.६१८-हे डिव्हाईन प्रपोर्शन आहे. जिथे-तिथे चराचरात हे प्रमाण दिसतं.   मधमाश्यांच्या पोळ्यातल्या  मादी मधमाश्यांच्या संख्येला  नर  मधमाश्यांच्या संख्येनं  भागलं तर उत्तर येतं 1.618 शिंपल्यातल्या प्रत्येक   चक्राकार रेखांचं  त्याच्या पुढल्या  चक्राकार रेखांशी प्रमाण असतं  १.६१८ सूर्यफुलांच्या बिया  ह्याच  प्रमाणात प्रत्येक चक्रात रचलेल्या असतात.  फार कशाला मानवी शरीर रचनेत जिथे-तिथे PHI -फी म्हणजे  १.६१८ प्रमाण आढळतं. ह्याचा अतिसूक्ष्म अभ्यास केला,तो  लिओनार्दो-द-विन्चीनं. आणि  जाक सोनीएर तर  लिओनार्दो-द-विन्चीचा परम भक्त होता.अगदी मरतेसमयीही  त्यानं sacred feminism दर्शवणारा  pentacle-शुक्र- तारा  काढला.  लिओनार्दो-द-विन्चीनं  आपल्या प्रसिद्ध चित्रांमध्ये अगदी उघड दिसू नये या पद्धतीनं sacred feminism,sacred feminine फॉर्म्स रेखाटले  आहेत. "लास्ट  सपर "  ह्या   चित्रात   त्यानं  पवित्र  स्त्रीत्वाला   मानवंदना  दिली  आहे.-"रॉबर्ट  लान्गडॉन विचार करू लागतो. 
O,Draonian devil!
Oh,lame saint!
 रॉबर्ट लान्गडॉन ह्या संदेशातली  ती उलट-सुलट लिहिलेली अक्षरं  सरळ करून बघतो,तर त्याला हर्षवायूच व्हायचा बाकी राहतो. 
Leonardo da Vinci!
The Mona Lisa!
हा  संदेश त्याच्या हाती लागतो.
सोफी नेव्यूचे आजोबा जाक सोनीएर नेहेमी तिला अशा प्रकारचे अनाग्राम किंवा कोडी सोडवायला  द्यायचे. उलटसुलट  लिहिलेल्या  शब्दांमधून अर्थपूर्ण  शब्द, वाक्य तिला शोधायला लावायचे.आताही त्यांनी तेच केलेलं होतं.
मोनालिसाचं  प्रख्यात चित्र दाखवायला तिला आजोबानी लूव्र म्युझीयमच्या ऑफिसमध्ये  बोलावून घेतलं होतं.तिच्या गूढ हास्याबद्दल त्यांनी तिला सांगितलं होतं.तिला ते चित्र धूसर वाटलं होतं.लिओनार्दो-द-विन्चीनं sfumato - स्फूमाटो तंत्र वापरून चित्र रेखाटलं,म्हणून ते तसं धूसर दिसतं,असं  तिला आजोबानी सांगितलं होतं.
"मोनालिसा-फ्रांस मध्ये ते 'ला जोकोंड' ह्या नावानं  ओळखलं जातं-जगातलं सर्वात प्रसिद्ध चित्र आहे. लिओनार्दो-द-विन्ची जिथे जाईल,तिथे सतत स्वत:बरोबर हे चित्र बाळगत असे.ते आपलं सर्वोत्तम चित्र असल्याचं सांगत असे. लिओनार्दो-द-विन्चीनं डावीकडचं दृश्य जरा खाली घेऊन रंगवून   मोनालिसा डावीकडून अधिक मोठी नी उजवीकडून छोटी दिसेल असं चित्र काढलं. प्राचीन संकल्पनेनुसार डावी बाजू  स्त्रीतत्वाची  नी उजवी बाजू पुरुष तत्वाची मानली जाते.  लिओनार्दो-द-विन्ची "  प्रायरी ऑफ सायन" -Priory of Sion ह्या संस्थेचा प्रमुख होता.निसर्गपुजेत पवित्र स्त्रीत्व, ह्या तत्वाची उपासना करणारा,goddess iconology  मानणारा   होता.  त्यामुळे त्याचा   चर्चला विरोध होता. तो स्वत:homosexual होता,पण जोवर पुरुष तत्व नी स्त्री तत्व हे दोन्ही घटक नसतील,तर मनुष्यात्मा  प्रबुद्ध  (enlightened )होणारं नाही,असं तो मानीत असे." रॉबर्ट लान्गडॉननं पूर्वी वर्गात  शिकवत असताना  सांगितलं होतं," एक प्रवाद असा आहे की मोनालिसा हे दस्तुरखुद्द  लिओनार्दो-द-विन्ची ह्याचंच स्त्रीवेषातलं चित्र आहे.मोनालिसा स्त्रीही नव्हती नी पुरुषही नव्हती.  ते दोघांचं फ्युजन आहे-androgynous !iतुम्ही वेटोळेदार शिंगे असलेल्या  मेंढ्याच डोकं असणाऱ्या 'आमोन'  ह्या इजिप्शियन देवाचं नाव ऐकलय का कधी?  ""
"हो तर!God of masculine fertility "एक विद्यार्थी उत्तरला होता. 
"आणि आयसीस-Isis  ही इजिप्शियन goddess ऑफ  fertility ,तिला
L'isa असं ही संबोधलं  जाई.अमोन लिसा -AMON LISA  ...त्या अक्षरांपासून MonaLisa हे नाव आलं .MonaLisa  चा चेहेरा ही androgynous ,नाव ही androgynous -हे सिक्रेट त्या व्यक्तीला ठावूक आहे,म्हणून त्याच्या ओठावर गूढ स्मित उमटलंय." रॉबर्ट लान्गडॉननं सांगितलं होतं.

लिओनार्दो   द  विन्चीचं  आणखी   एक  मौल्यवान  पेंटिंग  लूव्र  म्युझियममध्ये  आहे -madonna   of the rocks .इटलीतल्या,मिलानमधल्या सानफ्रांसेस्को  चर्चमध्ये  लावण्यासाठी  व्हर्जिन  मेरी,बेबी  जॉन -बाप्तीस्त , उरीएल ,बाल  येशू   यांचं 
 चित्र  बनवण्यासाठी  लिओनार्दो - द-विन्चीला  सांगण्यात  आलं.मात्र  त्यानं  जे  चित्र  रेखाटलं ,ते   भयानक  होतं-निळ्या  अंगरख्यातली   व्हर्जिन मेरी  मांडीवर  बाल  येशूला  घेऊन  बसली  होती .तिच्या  समोर  उरीएल   बेबी  जॉन
-बाप्तीस्तला  घेऊन  होता.आणि  नेहेमीच्या  –बाल  येशू  ख्रिस्तानं जॉनबाप्तीस्तला   आशीर्वाद  देण्याच्या  दृष्याऐवजी  त्यात  अगदी 
 उलट  दृश्य -बाल  जॉन -बाप्तीस्त  हा  बाल  येशू    ख्रिस्ताला  आशीर्वाद  देताना  लिओनार्दो  द विन्चीनं दाखवलं होतं !
 So dark the con of the man- ह्या  जाक  सोनिएरनं  लिहिलेल्या  पुढच्या  संदेशातल्या  अक्षरांची   उलटा - पालट  करून  सोफी नेव्यूनं त्यातला  खरा  संदेश  शोधून  काढला- madonna  of the rocks
सोफी नेव्यूला  तिथे  आजोबांनी  तिच्यासाठी   ठेवलेली  एक  अनोखी  किल्ली  मिळते.ती  किल्ली  कशाची  आहे,ते  शोधण्यासाठी  आजोबांनी अशीच  घातलेली   वेगवेगळी  कोडी  सोडवत  अखेर  प्रचंड   उरस्फोड  केल्यावर  सोफी  नेव्यूनी  रॉबर्ट   लान्गडॉनला   तो सर्वात  मौल्यवान   keystone  -कळीचा  दगड  मिळतो.दोघेही   तो  घेऊन  प्रचंड   सव्यापसव्य  करीत  Sir Leigh Teabing -सर  लेह  टीबिंग  कडे  येऊन  पोहोचतात.  
Sir Leigh Teabing -सर  लेह  टीबिंग  ह्या  ब्रिटीश  इतिहासकारानं  आपलं  संपूर्ण   आयुष्य   holy grail  होली  ग्रेलच्या शोधावर  वाहून  घेतलंय . holy grail  होली  ग्रेल हा  या  पृथ्वीतलावरचा  सर्वात  अधिक  शोधला  जाणारा  मौल्यवान  ऐतिहासिक  दस्तावेज  आहे . तो  ज्यात  ठेवलाय ,असा  keystone-कळीचा दगड अस्तित्वात  आहे  ही    त्याची  खात्री   आहे .
 “holy grail  होली  ग्रेल ही  वस्तू  नाही.  बायबल  हे  काही   आभाळातून  आलेलं  नाही . ते  मनुष्यरचित आहे .जिझस  ख्राइस्टच्या  देवत्वाविषयी -divinity of Jesus वर  बरीच  प्रश्नचिन्ह  उठ्लीत,पण  तो  son of god –ईश्वराचा  पुत्र  असल्याचं  मानून   त्यावेळी   Constantine the great-  कॉनस्टनटाइन   ह्या  पगान  धर्म संस्कृतीच्या    रोमन  सम्राटानं  रोमन  साम्राज्य  एका  छत्राखाली  आणण्यासाठी  Christianity  खिश्चन धर्माचा  आधार  घेतला  ,नी  त्या   धर्माला  खूप  महत्व  दिलं .त्यानं  आपला  स्वार्थ   साधण्यासाठी  divinity of Jesus -जिझस  ख्राइस्टच्या  देवत्वाचा  वापर  केला . येशू   ख्रिस्त  हा  कोणी  दैवी  युगपुरुष  नसून  साधासुधा  विवाहित  माणूस  होता  हे  पुराव्यानिशी  सांगणारा   दस्तावेज  म्हणजेच  ते  रहस्यमय  होली  ग्रेल  .साहजिकच   हे  रहस्य  उघड  होऊ  नये  यासाठी  चर्चनं  जीवाचं रान   केलं .” सर  लेह  टीबिंग   सोफी  नेव्यूला  सांगतो ." लिओनार्दो   द   विन्चीला  ठावूक  होतं   की  होली  ग्रेल   कुठे  आहे ,ख्रिस्ताचा  कप ,chalice-चालीस काय आहे."
"The last Supper “ द लास्ट सपर  ह्या लिओनार्दो   द   विन्चीच्या  पेंटिंग  मध्ये  Jesusजिझस आणि  त्याचे  Disciples- शिष्य  दाखवले   असून  त्या क्षणी  जिझस  सांगतोय  की  त्यांच्यापैकी  एकजण  त्याचा  विश्वासघात  करेल !” सोफी   नेव्यू  सांगते.  
“ त्यात  ते  काय  खाताना  दाखवले  आहेत ?” टीबिंग   सोफी  नेव्यूला विचारतो.
“Bread-ब्रेड’सोफी   नेव्यू  सांगते.
“ त्यात   ते  काय पिताना दाखवले  आहेत  ?”
“Wine -वाइन ”
"किती  वाइनग्लास  टेबलवर  आहेत ?"
":एक ..एक  कप.ख्रिस्ताचा कप.चालीस .होली  ग्रेल" .
...तिथे  १३  कप  होते.
"होली  ग्रेल ही  स्त्री  आहे ".टीबिंग   सोफी  नेव्यूला सांगू लागतो."स्त्री  नी  पुरुष  या  दोघांसाठी  प्राचीनकाळी  जी  प्रतीक-चिन्ह   वापरली  जात,ती  ग्रहांच्या  स्वामीसाठीची      खगोलशास्त्रीय प्रतीक-चिन्ह  होत. .पुरुषासाठी  planet- God Mars नी  स्त्रीसाठी  planet- God  Venus.मंगळ नी शुक्र!
^  -हे   .पुरुषासाठीचं  प्रतीक-चिन्ह  म्हणजे  phallus -लिंग  आहे .V हे स्त्रीसाठीचं प्रतीक-चिन्ह  म्हणजे  कपाच्या  आकाराचं -किंबहुना  स्त्रीच्या  गर्भाशयाच्या  आकाराचं  आहे .तिची  निर्मितीची,सृजनाची ,मातृत्वाची शक्ती  अधोरेखित  करणारं  चिन्ह  आहे .प्राचीन  मान्यतेनुसार  होली  ग्रेल  हा  ख्रिस्ताचा  कप ,Chalice -चालीस  आहे .पण  त्यामागच  वास्तव  लपवण्यासाठी  तसं दाखवलं  गेलंय…वस्तुत: त्या   चालीसच्या- कपाच्या  माध्यमातून  त्याही   पलीकडचं  सूचित  केलं  गेलंय. The Holy grail is literally the ancient symbol for womanhood…जे  चर्चला  पूर्णत:  अमान्य आहे.” टीबिंग  सांगतो .
 Dan Brown डॅन ब्राऊन ह्या लेखकाचं "The  Da  Vinci Code " -द दा विन्ची कोड हे पुस्तक  वास्तव आहे की काल्पनिक आहे ह्याचा संभ्रम व्हावा इतके त्यातले तपशील वास्तव आहेत.ती प्रचंड वेगवान रहस्यकथा आहे.ह्यांनी  त्यात  इतका  जीव   ओतलाय .पुढे  काय  होणार  ह्याची   उत्कंठा  क्षणोक्षणी  वाढत  जाते.पुस्तक वाचून संपल्यावर वाचक दोन गोष्टी करतो.एक म्हणजे लिओनार्दो   द  विन्ची ह्या महान व्यक्तीला मनोमन साष्टांग दंडवत घालतो,Dan Brown डॅन ब्राऊन ह्या लेखकाला मनोमन दंडवत घालतो... नी दुसरं म्हणजे लिओनार्दो   द  विन्चीची ती  दोन प्रख्यात चित्र कुठे छापलेली सापडतील..त्यांना  बघायचा दृष्टीकोन घासूनपुसून लख्ख करतो.