Thursday, August 14, 2014

Whirlpool...Whirlpool...We are sick with the service standard of Whirlpool...

We are sick with the service standard of Whirlpool...

I have heard that the companies strive hard to retain and further grow their customer base,whereas here,I am seeing a company,which is hellbent upon losing its customers.I have already decided that in future I am not going to buy any Whirlpool product and have advised my relatives and friends for the same,which they have promptly acted upon.I would be very soon writing an extensive article,on how the customer-though deemed as king,is actually being treated as a beggar by the companies and that they forget that their very existence depends upon the customers.

Tuesday, August 12, 2014

भारताच्या स्वातंत्र्यदिना निमित्त लेख:​​भळभळणाऱ्या जखमा,ठसठसणारी वेदना…

भळभळणाऱ्या जखमा,ठसठसणारी वेदना… 
​​
विद्यार्थीदशेत असताना रुक्ष भासणारे विषय व्यवहार्य जगात पाऊल ठेवल्यावरच खऱ्या अर्थानं आपल्याला कळतात. इतिहासातल्या घटनांमध्ये त्यावेळी आपल्याला भले स्वारस्य वाटलं नसलं, तरी इतिहासानं घडवलेला भूगोल नंतर अनेकविध माध्यमातून कल्पनेपलिकडचं भीषण वास्तव आपल्याला उलगडून दाखवतो,त्यावेळी मनाला विलक्षण चटका बसतो. 

ईस्ट इंडिया कंपनीनं व्यापार -उदिमाच्या मिषानं इ.स.१६०० मध्ये भारताच्या भूमीवर ठेवलेलं पाऊल शतक-दर शतक घट्ट रोवत गेलं आणि साम्राज्यावरचा सूर्य नं ढळणाऱ्या ब्रिटीश राजसत्तेनं आपली पकड आणखी मजबूत करत ह्या देशाचं वैभव,अस्मिता,स्वातंत्र्य हिरावून घेत त्याला हीन-दीन अशा भुकेकंगाल अवस्थेप्रत आणून ठेवलं. 'डिव्हाइड अ‍ॅण्ड रूल'- दोन धर्मांमध्ये वैमनस्य आणि तेढ उत्पन्न करून राज्य करण्याचं तंत्र अवलंबित अखेरीस देशाचे तुकडे केले.हा इतिहास आपल्या मनावर कायमचा कोरला गेला आहे .
भारताला स्वातंत्र्य मिळून बघता-बघता ६७ वर्षे झाली. आपल्या देशानं स्वातंत्र्याची फार मोठी किंमत फाळणीच्या आणि फाळणीदरम्यान झालेल्या नरसंहाराच्या रुपानं चुकवली.स्वातंत्र्य मिळवताना देशाचे तुकडे होणं,अपिरिमित नरसंहार होणं आवश्यक होतं का हा प्रश्न आजही प्रत्येकाला पडतो. त्यावेळच्या अपिरिमित नरसंहाराबद्दल आणि अत्याचारांबद्दल कुणाही संवेदनाशील व्यक्तीच्या मनात कालवाकालव व्हावी!फाळणी टाळता आली असती,अशा अर्थाची विधानं फाळणीला जबाबदार असलेल्यांनी स्वत: केली आहेत. फाळणी टाळता आली असती का,ह्यावर अनेक विचारवंतांनी अनेक पुस्तकांतून विचारमंथन केलं आहे.
""If British governments had been prepared to grant in 1900 what they refused in 1900 but granted in 1920,or to grant in 1920 what they refused in 1920 but granted in 1940;or to grant in 1940,what they refused in 1940 but granted in 1947-then nine tenths of the misery,hatred and violence,the imprisonings and terrorism, the murders,flogging,shootings,assassinations,even the racial massacres would have been avoided;the transference of power might well have been accomplished peacefully,even possibly without Partition.भारतीयांनी सन १९०० मध्ये जी मागणी केली,ती ब्रिटीश सरकारनं तेव्हा नाकारली आणि जे मागितलं ते सन १९०० ऐवजी १९२० सालीं देऊ केलं,१९२० सालीं जी मागणी केली,ती तेव्हा धुडकावून ते १९४० सालीं देऊ केलं आणि १९४० सालीं मध्ये केलेली मागणी फेटाळून ते १९४७ सालीं भारतीयांना देऊ केलं. ब्रिटीश सरकारनं भारतीयांची मागणी तेव्हाच पूरी केली असती तर दु:ख,द्वेष,हिंसा, हत्या, अत्याचार, कारावास, दहशतवाद, खूनखराबा,गोळीबार,एवढंच काय धर्मांधतेतून झालेला नरसंहार,हे सगळं टळलं असतं.सत्तेचं हस्तांतरण शांततापूर्वक आणि कदाचित फाळणी नं होतासुद्धा झालं असतं," असं प्रशासकीय अधिकारी आणि लेखक लिओनार्ड वूल्फ (लेखिका व्हर्जिनिया वूल्फ यांचे पती )यांनी लिहिलंय.  

ते अर्थातच अगदी खरं आहे.कारण इतिहासाच्या पुस्तकांचा मागोवा घेतला तर दिसतं,की  फाळणी होण्यामागे केवळ एका व्यक्तीचा अहंकार आणि आडमुठेपणा होता.'द मॅन हू डिव्हायडेड इंडिया 'हे रफ़िक झकारिया यांचं पुस्तक ह्यावर सखोल विवेचन करतं.फाळणी झाली;ती महंमद अली जिन्ना यांच्या दुराग्रहामुळे! 'भला तेरी कमीज मेरी कमीज से सफ़ेद कैसी ?'ह्या ईर्षेतून, महात्मा गांधींवर कुरघोडी करण्याच्या आणि स्वत:चं राजकीय महात्म्य रुजवण्याच्या दुर्दम्य लालसेपोटी जिन्नांनी आपली आधीची भूमिका पूर्णपणे बदलली आणि द्विराष्ट्रवादाचा हट्ट धरला.भारतीय राजकीय आणि सामाजिक पटलावर महात्मा गांधींच्या तोडीचं स्थान आणि आदर मिळवण्यासाठी त्यांनी जिवाचं रान केलं.त्यांनी पद्धतशीरपणे हिंदू आणि मुस्लिम धर्मियांमध्ये दरी निर्माण केली आणि रूढार्थानं धर्माचं पालन न करूनसुद्धा आपणच मुस्लिम धर्मियांचे एकुलते एक तारणहार अशी आपली प्रतिमा निर्माण केली.हिंदू आणि मुस्लिम धर्मियांमध्ये काहीच साम्य नाही,वस्तुत: ती दोन भिन्न  राष्ट्रे आहेत,अशा प्रकारे प्रचार करून त्यांनी वातावरण कलुषित करून हटवादीपणे भारताच्या फाळणीची मागणी लावून  धरली. गांधी ट्राइड टु विन ओव्हर जिन्ना सेव्हरल टाईम्स…सिन्स द अ‍ॅडव्हेन्ट ऑफ गांधी,जिन्ना स्ट्रगल्ड हार्ड टु  अ‍ॅव्हेन्ज हिज ह्युमिलियेशन अ‍ॅन्ड सक्सीड इन अ‍ॅक्वायरिंगअ पोझिशन व्हिच इक्वलड्  दॅट ऑफ गांधी…ही सक्सेसफुली इनक्रीजड् द रिफ्ट बिटवीन द टू कम्युनिटीज,कन्व्हिन्सड् द वर्ल्ड  दॅट हिंदूज  अ‍ॅन्ड मुस्लिमस् हॅ नथिंग इन कॉमन बिटवीन देम…दॅट हिंदूज अ‍ॅन्ड मुस्लिम वेअर टू डिफरन्ट नेशन्स…हॅविंग विलफुली पॉइझनड् द अ‍ॅटमॉस्फिअर ऑफ युनिटी ,ही पुट फोर्थ हिज डिमांड  फॉर द पार्टिशन ऑफ इंडिया". फाळणीची मागणी करणारा हा माथेफिरू आणि फाळणी ही मोठीच आपत्ती असेल असं ठाम मत असणाऱ्या लॉर्ड माऊंबॅटननं मात्र फाळणीला मूर्तस्वरूप का द्यावं, असा सवाल करीत झकारियांनी कुठलीही भीडभाड नं ठेवता जिन्नांचा ताळेबंद मांडला आहे.    
मात्र ज्यांनी भारताची फाळणी केली ,दस्तुरखुद्द त्यांनीच त्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त केल्याबद्दल, नवी दिल्लीत ऑस्ट्रेलिया चे राष्ट्रदूत -हाय कमिशनर म्हणून काम केलेले आणि नेहरूंचे परिचित वॉल्टर क्रॉकर यांनी 'नेहरू,-अ कन्टेम्पररी'ज एस्टीमेट'ह्या आपल्या पुस्तकात  नेहरू ह्या आपल्या समकालीनाचा लेखाजोखा मांडताना उल्लेख केलेला आहे. पाकिस्तानची निर्मिती करणं ही चूक झाली आणि पाकिस्तानच्या निर्मितीपेक्षा स्वातंत्र्य उशिरा मिळालं असतं ,तर ते अधिक योग्य झालं असतं,असं जिन्ना म्हणाल्याचं जिन्नांच्या जीवनाच्या अखेरच्या कालावधीत,त्यांच्या आजाराच्या शेवटच्या टप्प्यात त्यांच्यावर  उपचार करणाऱ्या भारतीय डॉक्टरांनी म्हटलं होतं . "According to one of the Indian Doctors attending Jinnah in the later part of his fatal illness Jinnah said that the creation of Pakistan was a mistake and that rather than create it the better course would have been to delay independence."'(Nehru -A Contemporary's Estimate'-by Walter Crocker) 

'फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट ' हे डॉमिनिक लापियर आणि लॅरी कॉलिनस् (Freedom at Midnight -Dominique Lapierre , Larry Collins )या लेखकद्वयीचं अत्यंत गाजलेलं पुस्तक. भारतात ब्रिटीश राज्यसत्तेची सुरुवात कशी झाली,इथल्या राजघराण्यांचा राजेशाही थाट आणि कारभार कसा चालत होता, ब्रिटन मध्ये काय घडत होतं इथपासून ते  स्वातंत्र्यप्राप्तीचा संघर्ष, प्रत्यक्ष स्वातंत्र्यप्राप्ती, फाळणी  आणि त्यापायी  झालेला नृशंस नरसंहार हे आपल्यासमोर जणू दृश्य रूपात ते उभं करतात. 
जिन्ना यांना टीबी झालेला असून जिन्ना केवळ सहा महिन्याचेच सोबती असल्याचं निदान डॉक्टरांनी केल्याची अत्यंत महत्वाची माहिती  १९४७ सालीं माउंटबॅटन यांच्यापासूनलपवून ठेवण्यात आली होती. जर  ही बातमी  माउंटबॅटन यांना कळली असती,तर माउंटबॅटन यांनी वेगळा निर्णय घेतला असता,वा  जिन्नांच्या  मृत्यूपश्चात निर्णय घेतला असता;कदाचित पाकिस्तान अस्तित्वातच आलं नसतं .  
'देअर वॉज वन व्हायटल पीस ऑफ नॉलेज डिनाइड टू माऊंबॅटन इन द समर ऑफ १९४७… दॅट जिन्ना वॉज डाइंग ऑफ टी.बी. अ‍ॅन्ड दॅट ही हॅड लेस दॅन सिक्स मंथस् टु लिव्ह.हॅड ही नोन दॅट,ही वुड हॅव अ‍ॅक्टेड क्वाइट डिफरन्टली…माऊंबॅटन वुड हॅव बीन सोअरली टेम्प्टेड टु अवेट हिज डेथ.देन , परहॅप्स, पाकिस्तान वुड नेव्हर हॅव कम इनटु बीईंग!' लेखकद्वयी लिहिते.
मजूर पक्षाचे  ब्रिटनचे पंतप्रधान क्लीमंट अ‍ॅटलींनी सहा फूट उंची आणि प्रभावी व्यक्तिमत्व असलेल्या,४६ वर्षीय माऊंबॅटनना भारताचे व्हॉईसरॉय  म्हणून भारतात पाठवलं. माऊंबॅटन व्हिक्टोरिया राणीचे पणतू होते. माऊंबॅटननी  भारताला तडकाफडकी स्वातंत्र्य देऊ केलं आणि घाईघाईनं सत्तांतरण केलं , तसंच नरसंहार होऊ नये म्हणून त्यांनी काहीच काहीच केलं नाही,असा माऊंबॅटन यांच्यावर आरोप केला जातो. 
लाहोरमध्ये काँग्रेसनं  पूर्ण स्वराज्याचा प्रस्ताव मांडून १९३० सालच्या  जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी,म्हणजे २६ जानेवारी १९३० हा स्वातंत्र्यदिन म्हणून  मुक्रर करून दरवर्षी साजरा करण्याचं ठरवलं . अखेरात अखेर ३० जून १९४८ रोजी भारताला स्वातंत्र्य देण्याचं ब्रिटीशांनी निश्चित केलं होतं .  मात्र अधिक उशीर केला तर भारतीय उपखंडात सिव्हिल वॉर -जनक्षोभ उसळेल असं माऊंबॅटन यांना वाटत होतं .माऊंबॅटन यांचा नवा मसूदा तयारच होता,त्यावर ३ जून १९४७ रोजीच्या अत्यंत महत्वाच्या,ऐतिहासिक  बैठकीत मोठ्या चतुराईनं आणि नाटकीय पद्धतीनं माउंटबॅटन यांनी जवाहरलाल नेहरू,वल्लभभाई पटेल,जे.बी.कृपलानी हे काँग्रेसचे नेते,महम्मद अली जिन्ना,लियाकत अली खान,अब्दुर रब निश्तर हे मुस्लिम लीगचे नेते आणि शिखांचा प्रतिनिधी म्हणून सरदार बलदेव सिंह अशा ७ नेत्यांची स्वीकृती मिळवली. माऊंबॅटन प्लान प्रमाणे देशाची -भूभागाची फाळणी तर  होणारच होती;स्थावर जंगमाची ,पैशा -अडक्याची,साहित्य सामुग्रीची ,कैद्यांची,सैन्याची -साऱ्या -साऱ्याची वाटणी होणार होती.त्या दिवशी संध्याकाळी ऑल इंडिया रेडियोवरून माउंटबॅटन,जवाहरलाल नेहरू, महम्मद अली जिन्ना यांनी,फाळणी होऊन दोन स्वतंत्र,सार्वभौम राष्ट्रे निर्माण होण्यास त्यांची स्वीकृती असल्याची अधिकृतरीत्या घोषणा केली. 

व्हॉईसरॉय  माऊंबॅटन यांनी फाळणीच्या घोषणेबद्दल घेतलेल्या पत्रकार परिषदेला जगभरातले ३०० पत्रकार उपस्थित होते. सत्तांतरणासाठी तुम्ही तारीख निश्चित केलीच असेल ना,असे एका पत्रकाराने विचारले,त्यावर  माऊंबॅटन यांनी होकार दिला.मग ती तारीख कोणती अशी त्या पत्रकारानं पृच्छा केली.खरं तर  माउंटबॅटन यांनी अशी कोणतीच तारीख वगैरे मनात ठरवली नव्हती .मात्र आपण जिवंत ज्वालामुखीवर बसलो आहोत,त्या ज्वालामुखीचा कधीही उद्रेक होईल,कधीही जनक्षोभ उसळू शकेल , याची त्यांना जाणीव होती. "सत्तांतरणासाठी तारीख निश्चित केली आहे",त्यांनी घोषणा केली.वेगानं त्यांच्या डोक्यात चक्रं फिरू लागली.कुठली बरं तारीख सांगावी?क्षणभर ते विचार करू लागले आणि एका तारखेपाशी येऊन थांबले.त्यांच्यालेखी यापेक्षा अधिक सयुक्तिक तारीख दुसरी नव्हती,कारण दोन वर्षांपूर्वी त्या दिवशी बर्मामध्ये त्यांना विजयश्री मिळाली होती,जपाननं दुसऱ्या महायुद्धात अलाईड फोर्सेस-ब्रिटनच्या संयुक्त फौजांसमोर शरणागती पत्करली होती.त्या विजयाचा उद्गाता भारताच्या पारतंत्र्यातून होणाऱ्या मुक्तीचाही उद्गाता ठरणार होता.माऊंबॅटन यांनी घोषणा केली,"भारताच्या हातात सत्तेची सारी सूत्रे १५ ऑगस्ट १९४७ रोजी सोपवण्यात येतील!"अशा प्रकारे आधी काहीही नं ठरवता त्यांनी उत्स्फुरपणे तारीख घोषित करून टाकली.मात्र तो दिवस ज्योतिष्यांच्या मते अत्यंत अशुभ होता आणि त्या दिवशी स्वातंत्र्य मिळाल्यास त्याचे भयंकर आणि दूरगामी परिणाम होतील , मोठा विध्वंस होईल,असं सगळ्या ज्योतिष्यांनी भाकीत वर्तवलं होतं.  
आणि तसंच झालं.सिरिल रॅडक्लिफ यांनी आखलेल्या रेषांवरून देशाचं द्विभाजन झालं आणि देशात संतापाचा आगडोंब उसळला.विद्वेषाच्या त्या अग्नीत पंचवीस तीस लाख लोकांचे प्राण गेले,स्त्रियांची अब्रू गेली आणि लाखो संसार उध्वस्त झाले .देशाची शकलं झाली.            
"भारताची फाळणी का झाली ?आणि फाळणी अपरिहार्यच होती,तर त्यात एवढा नरसंहार का व्हावा?" लेखक रामचंद्र गुहा " इंडिया आफ्टर गांधी" ह्या आपल्या पुस्तकात प्रश्न करतात. ह्या नऊशे पानी पुस्तकात त्यांनी सखोलपणे आणि अत्यंत अभ्यासू वृत्तीनी गांधींच्या आधीच्या आणि नंतरच्या भारताच्या इतिहासाचा मागोवा घेतला आहे. त्या नृशंस नरसंहाराचं वर्णन फाळणीच्या भळभळणाऱ्या जखमा मनात ठसठसणारी वेदना जागवतात.नियतीशी झालेल्या त्या कराराचं दु:ख मनात कायमचं व्यापून उरतं .
--------------------------------------------------------------------------------------------
रश्मी घटवाई 
०९८७१२४९०४७

Tuesday, July 8, 2014

किमयागार : "द अ‍ॅलकेमिस्ट"

किमयागार 
-रश्मी घटवाई 

आपल्याला ज्ञानेश्वरी वाचता येणे हा माझ्यामते आपण मराठी असण्याचा सर्वोच्च मानबिंदू आहे आणि भगवद्गीता वाचता येणे हा  माझ्यामते आपण भारतीय असण्याचा सर्वोच्च मानबिंदू आहे.
भगवद्गीता केवळ भारतीयांनाच भावते असे नाही,तर तिनं भारतीयेतरांनासुद्धा तेवढाच लळा लावला आहे.भगवद्गीता आधार असलेलं विदेशी लेखकांचं लेखन व काव्य साहजिकच उत्तुंग आणि रसपूर्ण झालं आणि त्या साहित्यानं जनमानसाचा ठाव घेतला.
    
रुडयार्ड किपलिंग ह्या भारतात ब्रिटीश सत्ता असतानाच्या काळात मुंबईत जन्मलेल्या ब्रिटीश लेखक-कवीची "इफ" ही अतिशय प्रसिद्ध कविता आहे. ती त्यानं १९०९ साली आपल्या मुलाला उद्देशून लिहिली होती,तरी ती आज एकशे पाच वर्षांनंतरही तितकीच प्रेरणादायी आहे.इफ मध्ये मला भगवद्गीता दिसते.(भगवद्गीतेतल्यासारखा)कवितेतला उपदेश असल्यामुळे "यू विल बी अ गॉड ,माय मॅन" असं थट्टेनं विन्स्टन चर्चिल रुडयार्ड किपलिंगला म्हणाले होते.If you can meet with Triumph and Disaster And treat those two impostors just the same ह्या कवितेतल्या ओळी विम्बल्डन मध्ये टेनिस कोर्टवर पण लागलेल्या आहेत. इफ ह्या  कवितेच्या  प्रेमात पडावं!कविता अशी- 

                                                        If
                                                                BY RUDYARD KIPLING
If you can keep your head when all about you   
    Are losing theirs and blaming it on you,   
If you can trust yourself when all men doubt you,
    But make allowance for their doubting too;   
If you can wait and not be tired by waiting,
    Or being lied about, don’t deal in lies,
Or being hated, don’t give way to hating,
    And yet don’t look too good, nor talk too wise:

If you can dream—and not make dreams your master;   
    If you can think—and not make thoughts your aim;   
If you can meet with Triumph and Disaster
    And treat those two impostors just the same;   
If you can bear to hear the truth you’ve spoken
    Twisted by knaves to make a trap for fools,
Or watch the things you gave your life to, broken,
    And stoop and build ’em up with worn-out tools:

If you can make one heap of all your winnings
    And risk it on one turn of pitch-and-toss,
And lose, and start again at your beginnings
    And never breathe a word about your loss;
If you can force your heart and nerve and sinew
    To serve your turn long after they are gone,   
And so hold on when there is nothing in you
    Except the Will which says to them: ‘Hold on!’

If you can talk with crowds and keep your virtue,   
    Or walk with Kings—nor lose the common touch,
If neither foes nor loving friends can hurt you,
    If all men count with you, but none too much;
If you can fill the unforgiving minute
    With sixty seconds’ worth of distance run,   
Yours is the Earth and everything that’s in it,   
    And—which is more—you’ll be a Man, my son!
(Source: A Choice of Kipling's Verse (1943))  

रुडयार्ड किपलिंग,सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ...जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ...असं कवितेतून आपल्या मुलाला म्हणाला असला,तरी भगवद्गीता जशी भगवंतानी जरी अर्जुनाला उद्देशून सांगितली असली ,तरी ती एकट्या अर्जुनासाठी नसून सबंध मानव समुदायासाठी होती,तशीच 'इफ' सगळ्यांनाच उद्देशून आहे.इतक्या वर्षांनंतरसुद्धा ती तेवढीच टवटवीत वाटण्याचं कारण म्हणजे तिचा मूलाधार भगवद्गीता आहे.मूलाधार भगवद्गीता असलेली Paolo Coelho पाओलो कोएल्हो ह्या प्रसिद्ध लेखकाची गीता ह्या शीर्षकाची कवितासुद्धा प्रसिद्ध आहे. त्याहीपेक्षा अधिक लोकप्रिय आहे त्यांनी लिहिलेली  "द अ‍ॅलकेमिस्ट"(The Alchemist )ही सुप्रसिद्ध कादंबरी. तिचाही मूलाधार भगवद्गीता असल्याचा प्रत्यय वाचकाला शब्दागणिक येतो.अ‍ॅलकेमी म्हणजे काय,तर कुठल्याही धातूला सोन्यात रुपांतरीत करण्याची किमया अन अशी लोखंडाचेही सोने करण्याची किमया साधणारा तो किमयागार !अ‍ॅलकेमिस्ट!

एखाद्यानं उरस्फोड करून एखाद्या ध्येयाचा पिच्छा पुरवावा,आपल्याला वारंवार पडणाऱ्या स्वप्नाचा गूढ अर्थ शोधत वणवण फिरावं,वाटेत अनंत अडथळे यावेत,ते पार केल्यावर यशाचं फुलपाखरू अलगद आपल्या हातावर बसलंय असं वाटत असतानाच त्यानं सुळकन निसटावं, हवेतल्या हवेत गिरकी घेत सांगावंं -ज्याचा शोध घेत तू वणवण फिरतो आहेस,ते तर तुझ्याच जवळ आहे.तुझे आहे तुजपासी,परी तू जागा चुकलासी! "तैसी हे जाण माया ,तू भ्रमत आहासी वायां !" 

ही कथा आहे स्पेनमधल्या अ‍ॅन्डेल्युसिया या प्रांतातल्या  सँटियागो या तरुण मेंढपाळाची . त्याला वेडंच मुळी स्वच्छंद भटकंतीचं!तो धर्मगुरूच व्हायचा ,पण स्वच्छंद भटकंतीची आपली इच्छा त्यानं गरीब शेतकरी असलेल्या आपल्या वडिलांना सांगितली,तेव्हा आपल्याप्रमाणे निखळ भटकंतीची त्याची इच्छा अपुरी राहू नये ,म्हणून  आपल्याजवळच्या तीन प्राचीन सुवर्णमुद्रा त्याला देत वडिलांनी त्याला सांगितलं ,दूरवरच्या डोंगरदऱ्या,कुरणं ,माळरानं पालथी घालशील,तरी आपली ही कुरणं,माळरानंच अखेरीस सर्वोत्कृष्ट असल्याचं तुला जाणवेल !केवढं गहन तत्वज्ञान !जे नाही,त्याचा हव्यास धरून लोक त्याच्या शोधार्थ फिरतात ,वर्तमानातल्या सुखालाही मुकतात आणि नंतर जे हाती लागतं ,तेव्हा हळहळतात ,की आधी जे होतं ,तेच किती चांगलं होतं !

वारंवार पडणाऱ्या  स्वप्नाचा गूढार्थ जाणून घेण्यासाठी सँटियागो स्वप्नांचे गूढार्थ सांगणाऱ्या एका स्त्री कडे जातो . "माझ्या स्वप्नात एक लहान मुलगी माझ्या मेंढ्यांशी थोडा वेळ खेळून झाल्यावर माझे दोन्ही हात हाती घेते आणि पुढच्याच क्षणी मला इजिप्शियन पिरामिड्स जवळ आणून म्हणते,की तू जर इथे आलास तर तुला गुप्तधन मिळेल . ती ते गुप्तधन असलेली जागा मला दाखवणार तोच माझी दरवेळी झोपमोड होते . " सँटियागो तिला सांगतो .पुढे त्याला एक वृद्ध भेटतो. आपण सालेमचा राजा मेल्चीझेडेक (Melchizedek )आहोत असे सांगत तो वृद्ध त्याला म्हणतो, तुझ्याजवळ असलेल्या मेंढ्यांपैकी एकदशांश मेंढ्या मला दे,मग मी तुला ते गुप्तधन कसं मिळवायचं ते सांगतो .सालेमचा राजा जवळ पडलेल्या काटकीनं वाळूत सँटियागोच्या आई वडिलांचं ,शाळेचं  आणि वर सँटियागोच्या मनात घर करून बसलेल्या मुलीचं नाव लिहितो,तेव्हा त्या मनकवड्या वृद्धाबद्दल  सँटियागोच्या मनात आदरमिश्रित कुतूहल निर्माण होतं.ह्या राजाला आपल्या मेंढ्या हव्यात कशाला हे त्याला उमगत नाही . 

"तुम्ही कुणीही असा,काहीही करीत असा, तुम्हाला एखादी गोष्ट व्हायला हवी असं तीव्रपणे वाटत असतं ,त्याला कारण म्हणजे ती इच्छा विश्वाच्या आत्म्यात ,गाभ्यात उमटलेली असते.पृथ्वीवरचं तुमचं अस्तित्वच मुळी त्या ध्येयपूर्तीसाठी असतं."तो सालेमचा वृद्ध राजा सँटियागोला सांगतो ,
"And when you want something,all the universe conspires in helping you to achieve it."("अगर किसी चीज को दिल से चाहो ,तो सारी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है ।" ह्या डायलॉगचा उगम हा आहे!)"All things are one...I always appear in one form or another.Sometimes I appear in the form of a solution or a good idea.At other times at a crucial moment,I make it easier for things to happen.There are other things,I do too,but most of the times,people don't realize,I have done them. 

मीच ह्या विश्वाचं मूळ कारण ,सुतापासून बनलेल्या मण्यांची,सुतापासून बनलेल्या धाग्यात ओवलेली माळ जशी एकाच मूळ घटकाची असते,तसं !'मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव।' तुमच्या मनात इच्छा निर्माण करणारा मी ,ती इच्छा स्वयमेव मी, इच्छापूर्तीसाठी तुमच्याकडून धडपड करवणारा मी , ती  धडपड स्वयमेव मी,कर्ता,कर्म मी आणि शेवटी त्या धडपडीची, कर्माची फलश्रुतीही मी !पण अज्ञ, अहंकारी मनुष्य विचार करतो,हे सर्व मीच केले !अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति  मन्यते म्हणूनच, 'कर्मण्येवाधिकारस्ते  मा फलेषु कदाचनमा  कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोत्स्वकर्मणि।तुला केवळ कर्म करण्याचाच अधिकार आहे,त्याच्या फळाचा नाही. तू केलेल्या कर्माच्या फळाची इच्छासुद्धा ठेवू नकोस,तू सर्व कर्मे माझ्यासाठी करतो आहे,असे समजून मला अर्पण कर,सर्व कर्मफलांचा त्याग करून सर्व कर्मफल मलाच अर्पण कर. माझ्याच ठायी मन गुंतव,म्हणजे तू मोक्ष प्राप्त करशील.मलाच येऊन मिळशील !मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु। मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायण:।। 
मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय।निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशय:।।"भगवद्गीतेत भगवंतानं सांगितलंय. भगवद्गीतेतलंच  तत्वज्ञान लेखकानं आपल्या कथानकातून ,त्यांतल्या पात्रांच्या संवादातून सोप्या शब्दांत वाचकांना सांगितलंय .
 All things are one याचा प्रत्यय सँटियागोला ठायीठायी येत राहतो.अनेक संकटं पार करत अखेरीस सँटियागो पौर्णिमेच्या धवलशुभ्र  चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेल्या इजिप्तच्या पिरामिड्सच्या पुढ्यात राहून त्यांची भव्यता अनुभवतो,तेव्हा आनंदातिशयानी त्याच्या डोळ्यांतून आसवे ओघळू लागतात .त्याची स्वप्नपूर्ती होते अथवा नाही,झाल्यास कशी होते ,हे सगळे मुळातून वाचायला हवे. कारण सँटियागोच्या माध्यमातून आपल्यालाही  परिसस्पर्श घडवण्याची किमया "द अ‍ॅलकेमिस्ट" नं, किमयागारानं साधली आहे. 
-------------------------------------------------
रश्मी घटवाई 
०९८७१२४९०४७  

Saturday, June 7, 2014

काश्मीर समस्या : मंथन 
 -रश्मी घटवाई 

काश्मीर हे भारताचं नंदनवन आहे.विधात्यानं ह्या भूभागाला सृष्टीसौंदर्य भरभरून दिलं आहे.मात्र ह्या वैभवाला दहशतवादाचं गालबोट लागलं आहे. काश्मीरमध्ये उघड आणि छुपी युद्धं तसेच रक्तरंजित दहशतवादी कारवायांनी शत्रूनं भारतमातेच्या देहावर केलेली जखम भळाभळा वाहताना उघड्या डोळ्यांनी तिच्या लेकरांना बघावी लागते आहे,नव्हे,हेतुत: ती जखम भळभळती रहावी म्हणूनही अनेक जण प्रयत्नशील आहेत;म्हणून भारतमातेची लेकरं कासावीस आहेत.

भारतमातेच्या अशाच काही सुपुत्रांनी काश्मीरवर आणि काश्मीर समस्येवर अत्यंत तळमळीने लेखन केले आहे.'जंग-ए- काश्मीर 'ह्या पुस्तकाचे लेखक कर्नल श्याम चव्हाण त्यांपैकीच एक. १९४८,१९६२ १९६५,१९७१ सालीं जी युद्धे काश्मीरमध्ये लढली गेली, लेखक स्वत: १९६२ १९६५,१९७१ च्या तिन्ही युद्धांत एक अधिकारी म्हणून लढले.त्यामुळेच 'जंग-ए- काश्मीर ' काश्मीर ह्या विषयावरचंसंस्मरणीय,संग्रहणीय लेखन म्हणून ओळखलं जावं.काश्मीरच्या प्राचीन इतिहासाबद्दल कर्नल श्याम चव्हाण पुस्तकात लिहितात-
"काश्मीरमध्ये असलेल्या सतीसर नावाच्या सरोवरात पार्वती नौकाविहार करीत असल्याची नीलमत पुराणातली आख्यायिका आहे. या सरोवराच्या काठावर नाग लोक राहत असत सरोवरातला जलोद्भव नावाचा राक्षस ह्या नाग लोकांना त्रास देत असे.या त्रासातून मुक्तता करण्याची नाग लोकांनी काश्यप मुनींना विनंती केली.त्यांनी वराहमुलम्(बारामुल्ला)येथे पर्वत फोडून सरोवर रिते केले.पाणी वाहून गेल्याने राक्षस मरण पावला.काश्यप मुनींनी सरोवर आटवून निर्माण केलेली भूमी म्हणून ह्या प्रदेशाला 'काश्यपमीर' असे नाव पडले.काश्यपमीरचे अपभ्रंशित रूप काश्मीर झाले.महाभारतात कश्मीरमंडल या भूमीचा उल्लेख आढळतो.प्राचीन काळी आर्यांपैकी, देखणे,गोरेपान व रेखीव चेहऱ्याचे,मजबूत शरीराचे  'खासास ' जातीचे लोक  काश्मीरच्या प्रदेशात रहात असल्याचे मानले जाते .चौदाव्या शतकापर्यंत काश्मीरमध्ये बुद्ध किंवा हिंदू राजांच्या राजवटी होत्या.त्या राजवटींचे वर्णन कल्हण पंडिताच्या 'राजतरंगिणी' ह्या संस्कृत ग्रंथात आढळते.कल्हणने अगदी प्राचीन काळापासून  ते इ. स. ११४८ (अकराशे अठ्ठेचाळीस)पर्यंतचा इतिहास लिहून ठेवला आहे. कल्हणाची परंपरा काही इतर कवींनी चालू ठेवली.अशांपैकी जीनाराजा याने इ. स.१४२०(चवदाशे वीस),श्रीधराने इ. स.१४८६ (चवदाशे शह्याऐंशी) आणि प्रज्ञा भटाने इ. स.१५८८(पंधराशे अठ्ठ्याऐंशी)पर्यंतचा इतिहास लिहून ठेवला आहे . 

"काश्मीरवर बौद्ध धर्माचे प्रभुत्व आले ते सम्राट अशोकाच्या कारकीर्दीत.काहींच्या मताप्रमाणे श्रीनगरची स्थापना सम्राट अशोकानेच केली(श्रीनगरी).इ. स.४० नंतर बौद्ध धर्माचा प्रसार चीन मध्ये वाढत गेला पण काश्मीरमध्ये त्याचा प्रभाव कमी होऊन तिथे पुन्हा ब्राम्हणी धर्म स्थापन झाला. पाचशे वर्षांनी हूणवंशीय मिहिरकुल हा काश्मीरचा सम्राट बनला."कर्नल चव्हाण लिहितात. 

http://gadyakosh.org ह्या संकेत स्थळावर भारत के इतिहास में हूण ह्यामध्ये रामचन्द्र शुक्ल ह्यांनी दिलेल्या विस्तारपूर्ण विवेचनात उल्लेख आहे-'भारतीय इतिहास में दो हूण राजाओंके  नाम आते हैं-तोरमाण और उसका पुत्र मिहिरगुल -अथवा संस्कृत लेखकोंके अनुसार मिहिरकुल.इसी मिहिरगुल का नाम एक रोमन लेखक ने गोलस लिखा है.'त्याच्या क्रौर्याबद्दल पण शुक्ल ह्यांनी विस्तृतपणे लिहिलंय. 

"मिहिरकुल अतिशय क्रूर आणि अत्याचारी होता.परंतु श्रीनगरच्या सिंहासनावर बसलेला पहिला काश्मीरी राजा म्हणून ओळखल्या जातो,तो ललितादित्य. त्याने इ.स.७२४ ते ७६० पर्यंत राज्य केले. काश्मीरच्या इतिहासातला हा सुवर्णकाळ मानला जातो.त्यानंतरचा राजा अवंतीवर्मा.त्याने इ. स .८५५ ते८८३ पर्यंत राज्य केले.तो पराक्रमी होता.आजचे अवंतीपूर त्यानेच वसवले. प्राचीन उपलब्ध इतिहासावरून कळते की एकंदरीत प्राचीन हिंदू राज्यांच्या काळात भरभराट होती आणि राज्यातील प्रजा समृद्ध जीवन जगत होती. इ.स.१३३९ मध्ये स्वातच्या (स्वात आता उत्तर पाकिस्तानात)शहामीरने काश्मीरवर स्वारी करून राज्य बळकावले.काश्मीरचा हा पहिला सुलतान.त्याच्या नंतर आलेल्या सिकंदरनं काश्मीरमधल्या हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले.पुढे चाक टोळ्यांनी काश्मीरमधल्या लोकांवर अनन्वित अत्याचार केले.या टोळ्यांपासून प्रजेची मुक्तता झाली,ती इ.स. १५८६ मध्ये अकबराची सेना तिथे पोहोचली,तेव्हा!इ.स. १७५२ मध्ये अहमदशहा अब्दालीने काश्मीरवर स्वारी केली आणि काश्मीरमधल्या हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. शिखांना मुस्लिमांच्या तावडीतून मुक्त करणाऱ्या महाराजा रणजीतसिंहानी इ.स. १८१९ काश्मिरी प्रजेलाही मुक्त केले,पण तोपर्यंत हजारो काश्मीरी हिंदूंना बाटवण्यात आले होते. महाराजा रणजीतसिंहानी  जम्मूच्या एका डोग्रा वारसदाराला -गुलाबसिंहाला जम्मूच्या गादीवर बसवले.गुलाबसिंहाने लदाख,स्कर्दू जिंकले,बाल्टीस्तान वर कब्जा मिळवला आणि गिलगीतही जिंकले.शीख सत्तेशी एकनिष्ठ नाही,म्हणून शिखांनी त्याला दंड केला, म्हणून त्याने इंग्रजांना मदत करायचे ठरवले. जबरदस्तीने बाटवण्यात आलेल्या त्याच्या मुस्लिम प्रजेनी इच्छा व्यक्त केल्यावर त्याने त्यांना पुन्हा हिंदू करण्याचे ठरवले ,पण कर्मठ धर्ममार्तंड त्याला कडाडून विरोध करू लागले.गुलाबसिंहाच्या पश्चात राजा हरीसिंह,त्याच्यानंतर राजा प्रतापसिंह, त्याच्यानंतर  १९१५ सालीं राजा हरीसिंह जम्मू-काश्मीर संस्थानाच्या गादीवर आला." 

काश्मीरचा पुढचा साद्यंत इतिहास आणि युद्धांबद्दल कर्नल चव्हाण पुढे लिहितात,
" १९४७ च्या ऑक्टोबर महिन्यात पाच हजार पाकिस्तानी घुसखोर महाराजा हरीसिंहाच्या काश्मीर संस्थानात घुसले.द्विराष्ट्र तत्वावर निर्माण झालेल्या पाकिस्तानला काश्मीरमध्ये मुस्लिम बहुसंख्य आहेत म्हणून काश्मीरची भूमी बळकवायची होती.या घुसखोरांनी प्रथम मुझफराबाद,डोमेल,उरी व शेवटी बारामुल्ला शहर लुटले,मदांध घुसखोर गावातल्या हिंदूंच्याच नव्हे तर मुस्लिमांच्या मालमत्ता पण लुटू लागले,सरसकट सर्वच स्त्रियांवर अत्याचार होऊ लागले तेव्हा सारी काश्मीरी जनता घुसखोरांविरुद्ध उभी राहिली.राजा हरीसिंहाने काश्मीर संस्थान भारतात विलीन करण्याची मागणी केली.…काश्मीरमधली बहुसंख्य जनता मुस्लिम असताना ते संस्थान पाकिस्तानमध्ये विलीन व्हायला राजी नाही ही गोष्ट महंमद अली जीनांना अजिबात रुचणारी नव्हती.धार्मिक तत्वावर दोन राष्ट्रांची मागणी करणाऱ्या जीनांचा हा धडधडीत अपमान ठरणार होता त्यात आता ते पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर  जनरल होते.तेव्हा काहीही करून काश्मीर बळकावलेच पाहिजे असा अट्टाहास त्यांनी धरला आणि कारवाया सुरू केल्या.  
  
 "४७ साली हजारो काश्मिरी मुसलमान आपण होऊन पाकिस्तानात गेले.शेख अब्दुल्ला ह्यांनी एक कायदा  करून त्यांना परत बोलावले व जम्मूमध्ये त्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था केली,सर्वांना त्वरीत नागरिकत्व बहाल करण्यात आले.मात्र फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांपैकी जे २५ हजार हिंदू जम्मूत येउन राहिले,त्यांना चाळीस वर्षांनंतरही काश्मीरचे नागरिकत्व मिळालेले नाही. हे हिंदू लोकसभेसाठी मतदान करू शकतात,पण काश्मीर विधानसभा किंवा स्थानिक नगरपालिका यांसाठी त्यांना मतदानाचा हक्क नाही."  

'शूर सैनिकांनी युद्धात जिंकले पण नेत्यानी शांततेत गमावले', याबद्दल त्यांना खंत वाटते ."दुर्दैवाने भारतावर संयुक्त राष्ट्रातर्फे बरेच दडपण येउन डिसेंबर १९४८ ला युद्धतहकुबी जाहीर झाली.काश्मीरचा पश्चिमे कडचा काही भाग आणि गिलगीत ,हुंझा ,स्कर्दू वगैरे भाग मुक्त करण्याचे राहून गेले.(पुढाऱ्यांना )आपल्या मातृभूमीचा भूभाग शत्रू बळकावून बसला आहे याचे शल्य कुठे टोचतच नाही !शांतिदूताचा जगात बोलबाला झाला पाहिजे हा हव्यास !… म्हणूनच घसा फुटेपर्यंत ओरडून सांगावेसे वाटते -मुझफराबाद,डोमेल,हुंझा,गिलगीत,स्कर्दू ,सियाचेन आणि अक्साय चीन हा सारा आमचा भाग आहे. पाकिस्तान व चीनने तो बळकावला आहे .…२००,००० हिंदूंचे 'छंब' गावतिथल्या अत्यंत सुपीक जमिनीसह भारताने गमावले. १९७१ च्या सिमला कराराप्रमाणे काश्मीरमध्ये जिंकलेली भूमी परत करण्याचे बंधन नसल्यामुळे छंब भारताला परत मिळाले नाही. १७ डिसेंबर १९७१ रोजी भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी एकतर्फी युद्धविराम जाहीर केला.युद्धविराम  झाल्यानंतर छंब चे कित्येक हिंदू रहिवासी नदीच्या पूर्व किनाऱ्यावर बसून आपल्या गावाकडे अश्रूपूर्ण डोळ्यांनी पहात होते.पाकिस्तानी सैन्याने त्यांच्या गावातल्या सर्वात उंच घरावर पाकिस्तानचा झेंडा लावलेला होता व त्या गावाचे नाव ठेवलेले होते -इफ्तिकाराबाद !… पुढे झालेल्या सिमला कराराप्रमाणे ,काश्मीरचा काही भाग वगळल्यास पश्चिम आघाडीवर जिंकलेला सारा प्रदेश भारत सरकारने पाकिस्तानला परत देऊन टाकला. सीमेवरील एकेक इंच जागा लढवणाऱ्या  सैनिकांना तेव्हा काय वाटले असेल याची कुणी पर्वाही केली नाही. युद्धात,जी भूमी जिंकण्यासाठी आमच्या असंख्य सैनिक बंधूंना स्वत:चे बलिदान द्यावे लागले,ती भूमी ,युद्ध संपता क्षणीच राजकीय नेत्यांनी सहजतेने शत्रूला परत देऊन टाकली . राजकीय पुढाऱ्यांना भारतीय जवानांच्या  बलिदानाची किंचितही कदर नाही ही संतापजनक बाब दुर्दैवाने वारंवार अनुभवास आलेली आहे." 'जंग-ए- काश्मीर 'ह्या पुस्तकात लेखक कर्नल श्याम चव्हाण लिहितात .                    

त्रेचाळीस वर्षे दिल्लीत पत्रकारिता केलेले सव्यसाची पत्रकार मो.ग. तपस्वी "नियतीशी करार "ह्या आपल्या पुस्तकात  लिहितात,"वल्लभभाई (पटेल )यांचे नेहरूंशी बिनसण्याचे कारण वैयक्तिक मुळीच नव्हते.काश्मीरचा प्रश्न हे त्यांच्यातील वितुष्टाचे कारण होते.वल्लभभाईंनी साधार दाखवून दिले होते की काश्मीर प्रश्न नेहरू चुकीच्या मार्गाने हाताळत आहेत. काश्मीर प्रश्नावरून वल्लभभाई  आणि नेहरू  यांच्यात तीव्र मतभेद होताच नेहरूंनी पहिले काम कोणते केले असेल,तर त्यांनी काश्मीर प्रकरण गृहखात्याकडून म्हणजे वल्लभभाईंकडून काढून परराष्ट्रखात्याकडे सुपूर्द केले,म्हणजेच स्वत:कडे घेतले,कारण नेहरूच तेव्हा परराष्ट्रमंत्रीही होते.हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठीवल्लभभाईंनी सैनिकी कारवाई केली ही गोष्ट नेहरूंना रुचली नव्हती. म्हणूनच त्यांनी काश्मिरात जिंकत चाललेल्या आपल्या सैन्याला युद्धविराम करण्याचा आदेश दिलाइतकेच नव्हे तर माउंटबॅटन यांच्या दडपणाखाली येऊन त्यांनी काश्मीर- समस्या (संयुक्त) राष्ट्रसंघात दाखल केली. वल्लभभाई फक्त इतकेच म्हणाले -"जवाहरलाल इस भूल पर पछताएगा और रोयेगा." नेहरूंनी केलेल्या त्या घोडचुकीचेच दुष्परिणाम आज इतक्या वर्षांत आपण भोगत आहोत.… देशाची फाळणी पत्करताना नेहरूंनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कधी हे जाणून घेण्याचा आणि सरकारी दप्तरी तसे नोंदवून ठेवण्याचा प्रयत्नच केला नाही ,की भारताच्या सरहद्दी नेमक्या कुठे आणि कशा आहेत ?त्यांना कोणत्या मापाने वा मानदंडाने मोजायचे आहे ?आजदेखील ,पाकिस्तानशी तीनदा प्रत्यक्ष युद्धे होऊनसुद्धा आमची पश्चिम सरहद्द नेमकी आखलेली नाही.कारगिल युद्धाच्या वेळी याचा विदारक प्रत्यय पुन्हा आला.कोणत्या पर्वत शिखरावरून किंवा दरीमधून आपली सरहद्द  जाते,याचा नेमका नकाशा संरक्षण दलाजवळ नव्ह्तच.याचाच फायदा पाकिस्तान घेत होता." तपस्वी लिहितात. 

"इंडिया आफ्टर गांधी" हे लेखक रामचंद्र गुहा यांचं अद्वितीय पुस्तक आहे.जणू हे नऊशे पानी पुस्तक लिहिण्यासाठी रामचंद्र गुहा जन्माला आले असावेत!त्यात त्यांनी गांधी असतानापासूनच भारताच्या इतिहासाचा सखोल आढावा घेतला आहे.ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देऊ केले,तेव्हा भारतात ५५४ संस्थाने होती,वल्लभभाई पटेल ह्यांनी अपार परिश्रमाने व्ही पी मेनन ह्यांच्या मदतीने ती संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन केली.मात्र निझामाची सत्ता असलेलं हैद्राबाद संस्थान आणि ८४४७१ वर्ग मैल व्याप्ती असलेलं, हैद्राबाद संस्थानापेक्षाही मोठं असलेलं काश्मीर संस्थान,ही दोन संस्थाने काही त्यावेळी स्वतंत्र भारतात सामील होण्यास तयार नव्हती. 'On 12 October,the deputy prime minister  of Jammu and Kashmir said in Delhi that "We intend to keep friendly relations with both India and Pakistan...we have no intentions of joining either India or Pakistan...the only thing that will change our mind is if one side or the other decides to use force against us." Two weeks after these words were spoken ,a force of several thousand armed men invaded the state from the north.Most of the raiders were Pathans from what was now a province of Pakistan.That much is undisputed.What is not so certain is why they came and who was helping them.गुहा यांच्या मते,आज साठ वर्षांपेक्षाही अधिक काळ लोटूनही हे दोन प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत. 

२२ ऑक्टोबरला हे घुसखोर काश्मीर मध्ये घुसले,२४ ऑक्टोबरला राजा हरीसिंहाने भारत सरकारला सैनिकी मदतीसाठी तार पाठवली,२६ ऑक्टोबरला व्ही पी मेनन यांनी काश्मीरला त्याच्याकडे जाऊन त्याची स्वाक्षरी असलेला'Instrument of Accession ' भारतात विलीनीकरणाचा दस्तावेज आणला.२६ ऑक्टोबर १९४७ रोजी काश्मीर संस्थान भारतात विलीन झाल्यावर २७ ऑक्टोबर रोजी तडक सकाळच्या पहिल्या प्रहरी विमानांनी दिल्लीहून श्रीनगरकडे सशस्त्र सैनिकांच्या तुकडया रवाना झाल्या. ह्या सगळ्या घडामोडींचा तपशीलवार आढावा -अगदी त्यातल्या दृश्य-अदृश्य बारकाव्यांसकट रामचंद्र गुहा यांनी प्रस्तुत पुस्तकात घेतला आहे . 

११ नोव्हेंबरला नेहरूंनी हरीसिंह याला पत्र लिहून कळवलं की शेख अब्दुल्ला ह्यावर भिस्त ठेवावी,आता मेहरचंद महाजन यांच्याऐवजी शेख अब्दुल्लाला अधिकृतरीत्या पंतप्रधान नेमावं.त्याची अफाट तारीफ करत नेहरूंनी लिहिलं,"The only person who can deliver goods in Kashmir is Sheikh Abdulla." महात्मा गांधी तर आधीच भारावलेले,त्यांनी" Lion of Kashmir"-काश्मीरचा सिंह म्हणून त्याला नावाजित त्याच्यावर स्तुतिसुमने उधळलीत.
" In a letter to Maharaja Hari Singh ,the Indian prime minister outlined the various forms a settlement could take.There could be a plebiscite for the whole state,to decide which dominion it would join.Or the state could survive as an independent entity,with its defence guaranteed by both India and Pakistan.A third option was of partition,with Jammu going to India and the rest of the state to Pakistan.A fourth option had Jammu and the Valley staying with India,with Poonch and beyond being ceded to Pakistan. Nehru himself inclined to this last alternative.He saw that in Poonch 'the majority of the population is likely to be against the Indian Union'.But he was loath to give up the valley of Kashmir,a National Conference stronghold whose population seemed  to be inclined towards India....It shows that the Indian prime minister was quite prepared to compromise on Kasmir." "इंडिया आफ्टर गांधी" ह्या पुस्तकात लेखक रामचंद्र गुहा लिहितात. 
"१ जानेवारी १९४८ रोजी गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन याच्या सल्ल्यानुसार भारतानं काश्मीर समस्या  United Nations -संयुक्त राष्ट्रसंघाकडे नेली.तिथे ५ फेब्रुवारी १९४८ रोजी बोलताना शेख अब्दुल्लानं दर्पोक्ती केली ,"There is no power on earth which can displace me from the position which I have(in Kashmir)",he told the Security Council." As long as the people are behind me ,I will remain there."
आज इतक्या वर्षांनंतरसुद्धा काश्मीर प्रश्न धसाला लागलेला नाही. असे म्हणण्यापेक्षा हा गुंता सुटावा असे,अपवाद वगळता आतापर्यंतच्या सीमेअलीकडच्या नेत्यांना वाटले नाही,सीमेपलीकडच्या नेत्यांना तर वाटायचा प्रश्नच उद्भवत नाही. दरम्यान दहशतवादामुळे जम्मू काश्मीर मधले असंख्य काश्मीरी पंडित विस्थापित झाले.दिल्ली-नोएडा परिसरात अनेक काश्मीर पंडित कुटुंबीयांनी स्थानांतर केलं. त्यांच्याशी त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून संपर्कात आल्यावर त्यांच्याशी झालेल्या बातचितीवर आधारित अनेक लेख लिहिले.आता जेव्हा नरेंद्र मोदी ह्यांनी पंतप्रधानाची शपथ घेताना,शपथग्रहण समारंभाला पाकिस्तानसह ८ देशांच्या प्रमुखांना आमंत्रण दिलं ,२७ मे रोजी , सर्वांचे डोळे ज्या भेटीकडे लागले होते ती,नरेंद्र मोदी-पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ ही भेट घडली,त्यानंतर,पंतप्रधान कार्यालयाचे (PMO )नवनिर्वाचित MoS -राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह ह्यांनी कलम ३७० वर केलेले भाष्य -३७० कलमाचे तोटे, सहमत नसलेल्यांना पटवून देण्यासाठी परिचर्चा व्हावी"His (Mr Modi's) intention and that of the government is that we should have a debate so that we can convince the unconvinced about the disadvantages of Article 370," ह्यावर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री यांचं,'एक तर जम्मू काश्मीर तरी भारतात राहील नाही तर कलम ३७० तरी संविधानात कायम राहील',हे विधान,मेहबूबा मुफ्ती यांनी केलेली टीका,ह्या पार्श्वभूमीवर,ह्या काश्मीर पंडित कुटुंबीयांशी मी नव्यानी संवाद साधला आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.ही सगळी मंडळी कडवी हिंदू तर आहेतच,महाशिवरात्री हा त्यांचा मोठा उत्सव ते अत्यंत भक्तिभावानं साजरा करतात -पहाडांवर राहणारे सारे शिवाचे उपासक असतात - पण त्यांना आपल्या स्थानाहून विस्थापित होण्याचं दु:ख आहे.काश्मीर ही समस्या 'बनवण्या'चं,ती चिघळत ठेवण्याचं काम केलेल्या व्यक्तीबद्दल-नेहरूंबद्दल त्यांच्या मनात रोष आहे. त्यामुळेच,भले काश्मीरी असतील,देशाचे पहिले पंतप्रधान असतील-नेहरू ना रोया ना पछताया,असा ज्येष्ठ मंडळी नेहरूंचा उल्लेख एकेरी करतात -आणि हा सल आजही त्यांच्या मनात आहे.  
"जम्मू -काश्मीर मधल्या नेत्यांचा जनाधार कमी होत चालला आहे,म्हणून राजकीय फायदा मिळवण्यासाठी ही मंडळी तसं बोलताहेत.कलम ३७० वर चर्चा व्हावी,हरकत नाही!पण आजच्या घटकेला हा मुद्दा चर्चेचा नाही. तसं बघितलं तर कलम ३७० मुळे राज्यात आणीबाणी लागू व्हायला नको होती आणि राष्ट्रपती राजवटपण लागू व्हायला नको होती,पण जम्मू -काश्मीर मध्ये ह्या दोन्ही गोष्टी झाल्या."प्रकाशन क्षेत्रातलं प्रस्थापित नाव असलेले दिल्लीतले श्री.हांडू प्रदीर्घ बातचीतीदरम्यान सांगतात."म्हणजे हळूहळू  कलम ३७० निष्प्रभ होत चाललंय.आता मुद्दा सुरक्षेचा आहे. २५ वर्षांपूर्वी काश्मिरी हिंदू तिथून स्थलांतरित झाले.ती एक संपूर्ण पिढी आता नष्ट झाली आहे . जम्मू -काश्मीर मध्ये आता मुस्लिम लोक आहेत आणि २५ वर्षांत आता त्यांची मानसिकता पण अशीच झालीये की हे मुस्लिम राज्य आहे.काश्मीर मध्ये पर्यटक म्हणून ते तुमचं-आमचं स्वागत करतील पण जर का आम्ही राहायला गेलो,तर ते त्यांना खपणार नाही.मी जर त्या ठिकाणी सुरक्षित नसेन,तर मी तिथे राहायला कसा जाऊ शकेन?काश्मीर मध्ये ४-५ हजार हिंदू आहेत,पण त्यांची गत तिथे अक्षरश:बॉंण्डेड लेबर सारखी आहे.त्यांना पगार कमी आहेत,ते कुठे फटकू शकत नाहीत आणि त्यांच्यावर अनेक बंधनेही आहेत.उनकी मजबूरी का फायदा उठाया जा रहा है।फार कशाला,virtually,they are 'converted .' ते हिंदू म्हणून नावालाच आहेत,ही मंडळी जवळ जवळ मुस्लिम असल्यातच जमा आहेत!आणि काश्मीर मधले मुस्लिम आपल्या 'मिशन'मध्ये 'कामयाब 'होताहेत.त्यांना जे हवंय,ते साध्य होतंय!कुणाला  दहशतवादात सामील व्हायचं नसेलही तरी त्याला धाक-दपटशा करून त्यांच्या मताप्रमाणे चालण्यास बाध्य आणि उद्युक्त केलं जातं .तिथली परिस्थिती काही चांगली नाहीय.लोकांना सुरक्षिततेची हमी मिळणार असेल,तरच लोक तिथे परत जातील.'पनून कश्मीर 'ची मागणी आहे -जिथे हजार-दोन हजार हिंदू काश्मिरी पंडित कुटुंब राहतील,आम्ही आमचा लोकप्रतिनिधी निवडून देऊ शकू!" श्री.हांडू  सांगतात.त्यांच्या मते आता नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व खंबीर आणि कणखर असल्याचा संदेश गेला आहे. त्यामुळे अकारण कुरापती काढू बघणारे आता वचकून राहतील !श्री.हांडू यांच्या मते आता जम्मू काश्मीरमध्ये अतिशय चांगली स्वास्थ्य -सुविधा (medical facility ),इंडस्ट्री -कारखाने आणि उद्योग यांची नितांत आवश्यकता आहे .
     
"PANUN KASHMIR is an effort to Save Kashmiri Pandits to Save Kashmir to Save India." असं पनून कश्मीरचं संकेतस्थळ http://www.panunkashmir.org सांगतं.Why a separate portion as Homeland when whole of the valley belongs to us?असा प्रश्न करतं .पाच हजार वर्षांपासून काश्मीर मध्ये राहणारे आम्ही शैव मूळ लोक असताना आम्हाला धर्मांध दहशतवादानं हुसकावून लावलंच कसं अशी संतप्त पृच्छाही करतात.त्याचं उत्तर आपल्याला-अखंड भारताला -त्यांना द्यावंच लागणार आहे.