यासम हा
- रश्मी घटवाई
जगातला सर्वोत्कृष्ट सायकलपटू,"सायकलिंग लेजंड "म्हणून अवघे जग त्याला ओळखत असताना एकाएकी नियती त्याच्याशी क्रूर खेळ खेळली. त्याला संथपणाची सवय नव्हती.प्रत्येक गोष्ट प्रचंड वेगाने करायची त्याला सवय होती -मग ते अगदी श्वास घेणेही का असेना!वय वर्षे अवघे पंचवीस असताना झालेल्या वृषणाच्या कर्करोगाच्या जीवघेण्Linda Mooneyham लिंडा मूनेहाम हे त्याच्या आईचं पूर्वाश्रमीचं नाव.त्याच्या आईशी त्याचं जीवाभावाचं नातं होतं.किंबहुना त्याची आई त्याच्या लेखी सर्वस्व होती नी आईसाठी तो सब कुछ होता.कमी उंचीच्या नी किरकोळ शरीरयष्टीच्या आईच्या पोटी,ती अवघी सतरा वर्षांची असताना साडे नऊ पौंड वजनाचा लान्स जन्मला,मात्र गुंडेरसन ह्या त्याच्या वडिलांशी त्याच्या आईचं फारसं नं पटल्यानं दोघे लगेच विभक्त झाले. आई तिच्या तुटपुंज्या पगारातही भागवत त्याला चांगल्या पद्धतीनं वाढवत होती.अवघा नऊ महिन्याचा होता,तेव्हा तो चालायला लागला.तो तीन वर्षांचा झाला,तेव्हा त्याच्या आईनं टेरी आर्मस्ट्रोन्गशी लग्न केलं.लान्सला त्यानं दत्तक घेतलं, नी लान्स आर्मस्ट्रोन्ग हे नाव त्याला मिळालं. मात्र त्याच्याशी लान्सचं कधी पटलं नाही,कारण किरकोळ कारणांवरून तो त्याला बदडून काढीत असे.पुढे त्याच्या आईनं आर्मस्ट्रोन्गला घटस्फोट दिला.
शाळेत असताना लान्स चांगल्यापैकी पोहोणे शिकला, उत्तमरीत्या सायकलिंग करू लागला.बघता बघता त्या कुमारवयात तो सायकलिंग तसंच Triathlon -ट्रायथलोन-ज्यात स्पर्धकाला पोहोणे,सायकलिंग नी धावणे असे तीन क्रीडाप्रकार करावे लागतात- त्यात भाग घेऊ लागला.सायकलिंग स्पर्धांमध्ये त्या चे सह्स्पर्धक विशीतले असत.त्यावेळी त्या स्पर्धा तो जिंकत नसला तरी पहिल्या पाच स्पर्धकांमध्ये तो असायचा.त्याची दाखल घेतली जाऊ लागली.आई त्याला प्रोत्साहन द्यायची,म्हणायची,तू तिथपर्यंत जाऊन नं जिंकण्यासाठी खचितच स्पर्धांमध्ये भाग घेत नाहीयेस.एकदा एका लांबच्या पल्ल्याच्या स्पर्धेत अंगात पुरेशी शक्ती नं उरल्यानं तो सायकलवरून खाली कोसळला.त्याच्या आईनं त्याला म्हटलं,काही हरकत नाही!मात्र स्पर्धेतून पळपुटेपणा करायचा नाही,माघार घ्यायची नाही,मग तुला हातात सायकल धरून स्पर्धा समाप्तीच्या सीमारेषेपर्यंत पायी चालत जावं लागलं,तरी बेहत्तर!
रोड सायकलीस्टला ताशी २० ते ४० मैल वेगानं तासनतास सायकल चालवावी लागते,सायकल चालवत असतानाच पाणी प्यावं लागतं, कॅन्डी बार खावा लागतो,अगदी देह्धर्मासाठीसुद्धा त्याला थांबता येत नाही की पाऊस येऊ लागला,तर रेनकोट घालण्यासाठी त्याला मध्येच थांबता येत नाही.दिवसाकाठी त्याच्या शरीरातून १० ते १२ लिटर पाणी घामावाटे बाहेर जातं नी ६००० कॅलरी उष्मांक जाळले जातात.लान्स आर्मस्ट्रोन्गला त्याच्या सायकलिंगच्या प्रोफेशननं कणखर बनवलं.त्याशिवाय त्याच्या आईनंही!
" Make ever obstacle an opportunity,A negative,a positive!Give your 110 percent !"ती त्याला सतत सांगत राही.
आईनं घेऊन दिलेली नवी-कोरी Raleiggh ही दणकट सायकल- माउंटन बाईक घेऊन एकदा लान्स आर्मस्ट्रोन्ग सुसाट वेगानं हेल्मेटविना सायकल चालवू लागला.डोक्यात भन्नाट कल्पना,वयानं आलेला बेदरकारपणा नी वेगाचं प्रचंड वेड,याची परिणती त्याच्या अपघातात झाली.त्याचा गुढघा, संपूर्ण पाय त्यात जखमी झाला,त्याला बरेच टाके घातले गेले,त्यावर भलेथोरले ब्रेसेस चढवले गेले. डोक्याच्या जखमेवरही बरेच टाके घातले गेले.सायकलीचाही चेंदामेंदा झाला.
आपण सायकलस्पर्धेची तयारी करत होतो नी आता सहा दिवसांनी ती सायकल स्पर्धा आहे,असं त्यानं डॉक्टरांना सांगताच त्यांनी त्याला त्यात भाग घेण्यास मनाई केली.तीन आठवडे सक्तीची विश्रांती सांगितली.
दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाल्यावर लंगडत घरी गेलेली लान्सची स्वारी दोन दिवसांतच कंटाळली.चवथ्या दिवशी तर आपल्याला फारच बरं वाटत असल्याचा साक्षात्कार झाल्यावर लान्सनं स्पर्धेत भाग घेण्याचा आपला निर्धार आईजवळ व्यक्त केला."I am racing"तो म्हणाला "Okay.Great!"आई म्हणाली.
स्पर्धेच्या दिवशी त्यानं मित्राची सायकल घेतली.पायाच्या जखमांचे टाके स्वत:च कापले.पोहोण्याची टोपी घालायची असल्यानं डोक्याच्या जखमेचे टाके मात्र
त्यानं तसेच ठेवले.पायातले बूट ही जखमेला घासू नयेत,ह्या बेताने फाडले.
Triathlonस्पर्धेत,लान्सच सर्वात प्रथम पाण्यातून पोहून बाहेर आला. सर्वात प्रथम सायकलवरून पोहोचला.त्या स्पर्धेत तो तिसरा आला.वर्तमानपत्रांनी त्याचं खूप कौतुक केलं.त्यानंतर दस्तुरखुद्द त्या डॉक्टरांचं त्याला पत्र आलं-"I can 't believe this !"
अमेरिकेत,टेक्सास प्रांतात राहणारा लान्स आर्मस्ट्रोन्ग (Lance Armstrong)वयाच्या सोळाव्या वर्षी एक उत्तम जलतरणपटू आणि निष्णात सायकलपटू म्हणून ओळखला जाऊ लागला.अमेरिकेच्या सायकलिंग टीमचा अत्यंत महत्वाचा सदस्य म्हणून त्याला सायकलिंग विश्व ओळखू लागलं. लवकरच सरोवराकाठचा,प्रशस्त, भलाथोरला बंगला, Porsche पोर्श कार,भरभक्कम बँक balance अशी सगळी भौतिक सुखं त्याच्या पायाशी लोळण घेऊ लागली.
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये लान्स अमेरिकेच्या टीमचा सदस्य म्हणून भाग घ्यायचा,तर डोमेस्टिक-अंतर्देशीय स्पर्धांमध्ये सुबारू -मॉनटगोमेरी टीमचा सदस्य म्हणून भाग घ्यायचा.अमेरिकेच्या सायकलिंग टीमचा डायरेक्टर व कोच ख्रिस कारमायकेल Chris Carmichael,Jim Ochowicz-ओच ह्या नावानं ओळखला जाणारा मोटरोलानं sponsor केलेल्या टीमचा डायरेक्टर यांचं कोचिंग लान्सला लाभलं.
युरोपिअन सायकल रेसेस-त्यातही इटली,स्पेन व फ्रान्स ह्याच्या सायकल रेसेस-टूर्स अत्यंत महत्वाच्या,अपार मेहनतीच्या मानल्या जातात.लान्सनं पदार्पणातच इटलीची प्रतिष्ठेची मानली गेलेली सायकल रेस जिंकली.तोवर कुठल्याच अमेरिकन स्पर्धकानं ती रेस जिंकली नव्हती,त्यामुळे अमेरिकेत त्याच्या नावाला मोठच वलय प्राप्त झालं.लान्स एक दिवस सर्वात प्रतिष्ठेची मानली गेलेली सायकल रेस टूर डी फ्रान्स -"Tour -de- France"जिंकणारच याची ख्रिस कारमायकेलची खात्रीच पटली.त्यानं तसं बोलूनही दाखवलं.त्याच्या शब्दांनी लान्सला खूप मानसिक बळ मिळालं . मुळात सायकलिंग हा एक प्रचंड मेहनत करायला लावणारा क्रीडाप्रकार आहे.पावसा-पाण्याची परवा नं करता,वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याला तोंड देत सायकलपटूंना मैल-न-मैल ताशी वीस-ते-चाळीस वेगाने सायकल चालवावी लागते.अंगात घट्ट जर्सी व तंग shorts -जणू दुसरी त्वचाच-असे कपडे असतात.अंग घामाने निथळत असतं. बर्फवृष्टी,पाऊस यात ते हाडापर्यंत चिंब भिजलेल्या अवस्थेत सायकल दामटत जातात,धुक्यात वाट हरवली असते,समोरचं काही दिसत नसतं,तरीही त्यांना पुढे जावं लागतं.ते दमतात,पण तसं दाखवायची सोय नसते.अवघ्या अर्ध्या इंचानं मागे असलेला प्रतिस्पर्धी केव्हा कुरघोडी करून पुढे निघून जाईल,हे सांगता येत नसल्यानं चरैवेति-चरैवेति हा एकच घोष स्पर्धेची सीमारेखा पर करेतो त्यांच्या मन:पटलावर गुंजत असतो. निसर्गानं सभोवताल सृष्टी-सौंदर्याची उधळण केलेली असते,पण जीवघेणी स्पर्धा आजूबाजूला बघण्याचीही त्याला मुभा देत नाही,त्या सौंदर्याचा आस्वाद
घेणे दूर!Peleton -पेलेटन हा टीमच्या सदस्यांचा अख्खा दस्ता प्रमुख स्पर्धकाच्या जोडीनं जात असतो. प्रमुख स्पर्धकाला वाऱ्याला तोंड द्यावं लागू
नये,याची खबरदारी ते घेत असतात.
सायकलिंग हा क्रीडाप्रकार लोकप्रिय होता,तो मुख्यत्वे युरोपमध्ये. तरी अमेरिकन सायकलपटू ह्या क्रीडाप्रकारात निष्णात आहेत, हे अमेरिकन सायकलपटूच्या टीमला १९८५साली युरोपमध्ये नेऊन ओचनं सिद्ध केलं होतं. १९८६ साली ग्रेग लेमंड Tour -de -France जिंकला होता. त्यामुळे अमेरिकेत सायकलिंग हा क्रीडाप्रकार लोकप्रिय झाला होता . अमेरिकेतली Tour-Du -Pont ही सर्वात महत्वाची गणली गेलेली सायकल रेस सुरू असताना लान्सला ओचनं हेरलं.ग्रेग लेमंडच्या पावलावर पाऊल ठेऊन Tour -de -France जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगणारा सळसळत्या तरुण रक्ताचा अमेरिकन सायकलपटू ओच शोधत होता. "मला नुसतं चांगला सायकलपटू नव्हे;तर सर्वोत्तम सायकलपटू व्हायचं आहे. मला युरोपमध्ये जायचं आहे,प्रोफेशनल सायकलपटू व्हायचं आहे."लान्सचे ते शब्द ऐकताच ओचला हवं ते गवसलं.लान्सला ओचच्या रूपानं,वडील,मित्र, तत्वज्ञ नी मार्गदर्शक असे सगळे एकत्रितपणे लाभले. मात्र लान्स जरा भडक डोक्याचा आहे.त्यानं जर आपल्या टेम्परामेंटवर-उद्धटपणे वागण्यावर नियंत्रण ठेवलं तर तो भव्यदिव्य कामगिरी करणारा ख्यातकीर्त सायकलपटू होईल,ह्याविषयी ओच आणि ख्रिस ह्या त्याच्या दोन्ही कोचेसचं एकमत होतं.
इटलीतली अन्य एक महत्वाची सायकलरेस सुरू असताना इटलीच्या,वर्ल्ड champion असलेल्या एका नामांकित सायकलपटूला,तो अगदी जिंकण्याच्या जवळ येऊन ठेपला असताना लान्सनं खिजवत खिजवत मात करत आव्हान दिलं.त्याचं ते वागण नं रुचून त्या प्रस्थापित सायकलपटूनं सीमारेखेपासून काहीसे दूर असताना करकचून ब्रेक दाबले आणि त्या स्वत:च्या देशातल्या प्रतिष्ठित सायकलरेसमध्ये,बक्षीस समारंभात पोडीयमवर लान्ससह उभे राहण्या ऐवजी जाणूनबुजून चवथा क्रमांक मिळवणे अधिक श्रेयस्कर मानले.
अमेरिकेतल्या तीन प्रतिष्ठित सायकलस्पर्धा जो जिंकेल,त्याला "सायकलस्पर्धेचा तिहेरी मुकुट"आणि दहा लाख डॉलर्स बक्षिसादाखल मिळणार होते. लान्स आर्मस्ट्रोन्ग बघताबघता लहान वयात सायकलस्पर्धा जिंकू लागला होता,त्यामुळे लान्सनं एक दिवसाची पिट्सबर्गची,सहा दिवसांची वेस्ट व्हर्जिनियाची नी १५६ किलोमीटर अंतर एका दिवसात कापायचे असलेली फिलाडेल्फियातली कठीण अशी "यू.एस.प्रो championship "या त्या तिन्ही स्पर्धा एकामागोमाग एक जिंकायचा निर्धार केला.यक ल स्पर्धा जिंकली.भर पावसात दोघे मायलेक एकमेकांना घट्ट बिलगून आनंदानं रडू लागले.तोच नॉर्वेचे राजेसाहेब विश्वविजेत्या लान्सला भेटू इच्छित असल्याचा निरोप लान्सला मिळाला.लान्स आपल्या आईसमवेत त्यांच्याकडे जाण्यास निघाला.त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी आईला दारात अडवलं.तुला आईला आत नेता येणार नाही,तिला इथे प्रवेशद्वारावरच थांबावं लागेल,असं त्यांनी त्याला सांगताच तो ताडकन माघारी फिरला."मी असं आईला दारावर सोडत नाही"असं बाणेदारपणे उद्गारून लान्स परत जाऊ लागला.नॉर्वेच्या राजेसाहेबांना हे कळताच त्यांनी दोघांना सन्मानपूर्वक बोलावून घेतलं.
त्या पहिल्या दोन स्पर्धा लान्सनं लीलया जिंकल्या. फिलाडेल्फियातली स्पर्धा सुरू होताना लान्सनं आपल्या आईला बोलावून घेतलं.आई त्याचं सर्वस्व होती,तिच्या केवळ तिथे असण्यानं त्याला प्रचंड मानसिक बळ लाभणार होतं.अपेक्षेप्रमाणे लान्सनं ती स्पर्धा जिंकली.दोघा मायलेकांनी एकमेकांच्या गळ्यात पडून आनंदाश्रूंना मोकळी वाट करून दिली.
लान्सचं पुढचं उद्दिष्ट्य होतं"वर्ल्ड championship "जिंकणे.तोपर्यंतच्या विश्व सायकलस्पर्धेच्या इतिहासात कुठल्याच एकवीस वर्षीय सायकलपटूनं विश्व सायकल स्पर्धा जिंकली नव्हती.त्यामुळे ती विश्व सायकल स्पर्धा
जिंकण्याचं त्यानं स्वत:लाच आव्हान दिलं.
निस्सीम मातृभक्त लान्सनं आपल्या आईला बोलावून घेतलं.तिनं त्याची सर्वतोपरी काळजी घेतली.आपली सर्व ताकद नी कौशल्य पणाला लावून अवघ्या एकवीस वर्षाच्या लान्सनं ती विश्व सा१९९६ साली लान्सनं खूप मोठी झेप घेतली.Ardennes मधून जावे लागत
असल्यानं अतिशय खडतर मानली गेलेली नी तोवर कुठल्याच अमेरिकन सायकलपटूनं नं जिंकलेली एक प्रतिष्ठित स्पर्धा त्यानं जिंकली,१६७मैलांच्या अन्य एका एकदिवसीय सायकलस्पर्धेत तो दुसरा आला.१२ दिवस कॅरोलिना पर्वतराजीतून १२२५ मैल जात लान्स अतिशय महत्वाची नी प्रतिष्ठित अशी अमेरिकेतली सायकलस्पर्धा Tour Du Pont जिंकला. आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्या पाच सायकलपटूत त्याची गणना होणार होती.
सारं काही सुरळीत सुरू असताना त्याला मात्र वाटत होतं की आपलं शरीर आपल्याला साथ देत नाहीये. शरीर आंबल्यासारखं झालं होतं.शरीरात वेदना होत होत्या.सायकलपटूला अशा वेदनांची सवयच असते.त्याचे हात,पाय,मान,कंबर, एवढेच नव्हे,तर पार्श्वभाग वेदनांनी ठणकत असतो.तरीही, वेदनांची पर्वा नं करता तो थंडी-वाऱ्याला तोंड देत शरीर एरोडायनामिक स्थितीत ठेवत,साऱ्या तांत्रिक बाजू सांभाळत त्यानं निर्धारित केलेल्या गतीनं जात असतो.मात्र,लान्स अनुभवत होता,त्या वेदना त्याच्यासारख्या कणखर,धडधाकट, सायकलपटूच्याही सहनशक्ती पलीकडच्या होत्या.
२ ऑक्टोबर १९९६ ला डॉक्टरांनी त्याच्या अनेक चाचण्याअंती निदान केलं-२५ वर्षांच्या लान्सला वृषणाचा कॅन्सर झाला असून तो त्याच्या छाती नी मेंदूपर्यंत पोहोचला आहे,कॅन्सर अतिशय पुढच्या -तिसऱ्या अवस्थेत आहे,नी त्याची त्यातून बरे व्हायची शक्यता अगदीच कमी आहे.
ज्या व्यक्तीला सगळ्या गोष्टी वेगानं करायची शक्यता होती,त्याला मृत्यूनं त्याच्याजवळ संथपणाने यावं,हे रुचण्यासारखं नव्हतंच.शिवाय करीअरच्या ऐन शिखरावर तो पोहोचत असताना नियती त्याच्याशी क्रूर थट्टा करत होती.Tour - De -France जिंकायचं त्याचं स्वप्न अर्धच राहणार होतं,आयुष्यातल्या त्या अत्युच्च क्षणासाठी तर तो जगत होता.लान्स आर्मस्ट्रोन्गला आता कॅन्सरचं नवं आव्हान पेलायचं होतं.त्याची इच्छाशक्ती दुर्दम्य होती.सहजासहजी हार मानणाऱ्यांपैकी तो नव्हताच. तो किमोथेरपीच्या सायकल्सना सामोरे जाताना वेदनेची अत्युच्च पातळी काय असू शकते ह्याचा अनुभव घेत होता.किमोथेरपीच्या औषधांनी त्याचं शरीर पोखरल्यागत झालं,डोक्यावरचे,डोळ्याच्या पापण्यांचे केस गेले,अन्नावरची वासना उडाली,खाण्यासारखं काहीच उरलं नाही.त्याला मेंदूच्या सर्जरीला सामोरं जावं लागलं.
ह्या सगळ्याचं तपशीलवार वर्णन एखाद्या त्रयस्थाच्या भूमिकेतून लान्स आर्मस्ट्रोन्गनं आपल्या पुस्तकातून केलंय. कॅन्सरच्या पेशंटना तर त्यातून खूप मार्गदर्शन होण्यासारखं आहे.त्याच्यासाठी सगळ्यात वेदनाप्रद होतं,ते म्हणजे किमोथेरपीच्या ट्रीटमेंटनंतर तो स्टराईल होणार होता.स्वत:चे वडील त्याला दुरावले असताना त्याला मात्र स्वत:ला पिता होण्याची आस लागली होती. त्यादृष्टीने त्याने स्वत: सर्व व्यवस्था करून ठेवली होती.ट्रीटमेंट सुरू होण्यापूर्वी लान्स स्वत: sperm bank मध्ये जाऊन sperm स्टोअर करून आला.
आपल्या प्रत्येक औषधाबद्दल,ट्रीटमेंटबद्दल,पांढऱ्या,लाल रक्तपेशी,त्यांचं कार्य,रक्तातला त्यांचा काउंट,ह्या साऱ्याबद्दल त्यानं प्रचंड अभ्यास केला. कॅन्सर काय करतो,त्याच्यावर उपचार काय...एकूण एक गोष्ट त्यानं आत्मसात केली.कॅन्सरच्या इतर पेशंटना तो मानसिक बळ द्यायचा.
वर्षभराच्या जणू खडतर तपश्चर्येनंतर त्याला त्याचं मधुर फळ मिळालं.कॅन्सरच्या जीवघेण्या रोगातून तो खडखडीत बरा झाला.त्याचा कॅन्सर ज्या थराला पोहोचला होता,ते बघता डॉक्टरांना अजिबात आशा नव्हती.पण त्याच्या जबर इच्छाशक्तीनं कॅन्सरवर मात केली.Tour-de-France जिंकायची जी त्याची उत्कट इच्छा होती,त्या विजीगिषु वृत्तीनं कॅन्सरला त्याच्या शरीरातून हुसकावून लावलं.
त्याचं शरीर कमकुवत होतं,तरीही उपचारांच्या दरम्यानच त्यानं Tour-de-France साठी तयारी करायचा ध्यास घेतला.डॉक्टरांनी त्याला त्यापासून परावृत्त केलं,तरीही तो बधला नाही.हळूहळू त्यानं सराव सुरू ठेवला.ज्या स्थितीत तो होता,त्या स्थितीत त्याला सायकलवर बसता येणे अवघड होते,ती चालवणे तर दूरच!मात्र "NEVER - SAY - DIE " हा मूलमंत्र जपत,भले स्पर्धेत हार पत्करावी लागली तरी हरकत नाही,पण रणांगण सोडून पळ काढायचा नाही,ही त्याच्या आईनं दिलेली शिकवण त्यानं प्रत्यक्ष आचरणात आणली."Son ,You Never Quit " असं त्याची आई त्याला म्हणाली होती.
हळूहळू त्याचं शरीर नीट आकार घेऊ लागलं.Tour-de-France साठी त्यानं सराव सुरू केला.त्यानं स्वत: करून ठेवलेल्या व्यवस्थेनुसार,त्याच्या पत्नीला मातृत्वाची चाहूल लागली.तिच्या उदरात IVF तंत्रानं त्याच्या स्वत:च्या हाडामासाचा इटुकला लान्स लवकरच जन्मला येणार होता.Tour-de-France साठी १९९९ मध्ये त्यानं तयारी केलेली बघून बाकीचे स्पर्धक त्याची हेटाळणीच करू लागले होते.तरी तो विचलित झाला नाही.
कॅन्सरच्या जीवघेण्या रोगातून तो बरा झाल्यावर २२९० मैलांची,भूतलावरची सर्वात कठीण मानली जाणारी Tour-de-France ही सायकल स्पर्धा त्यानं जिंकली.तीही एकदा नव्हे तर दोनदा.१९९९ मध्ये तो पहिल्यांदा जिंकला,तेव्हा किमोथेरपीच्या ड्रग्सचा परिणाम म्हणून फ्रेंच मीडियानं त्याच्याविरुद्ध रान उठवलं. उत्तेजकांच्या चाचण्यातून तो तावून सुलाखून बाहेर आला.तेव्हा मग तो तुक्क्यानं जिंकला,पुन्हा थोडीच जिंकायचाय,म्हणून इतरांनी त्याला तुच्छ लेखलं.पण पुन्हा २००० मध्ये Tour-de-Franceजिंकून त्यानं सर्वांची तोंडे बंद केली.
त्यानं कॅन्सरग्रस्तांसाठी फौंडेशन बनवलं,त्यात स्वत:ला त्यानं झोकून दिलं. स्वत:च्या जिवंत उदाहरणानं त्यानं जगाला दाखवून दिलं-ह्या जगात अशक्य असं काहीच नसतं.
No comments:
Post a Comment